Saturday 9 September 2017

रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी राजूबापू पाटील यांची निवड

आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य, माजी सभापती राजूबापू पाटील यांची निवड संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली आहे.



खा. शरद पवार यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील गरीब आणि होतकरू विध्यार्थ्याच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी सन १९१९ साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज महाराष्ट्रातील पंधरा आणि कर्नाटकातील एका जिल्ह्यात अशा सोळा जिल्ह्यात शिक्षणाचा विस्तार झाला आहे. समाजातील सर्वांगीण विकासासाठी आपण दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे, आपल्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवाचा फायदा रयत शिक्षण संस्थेच्या विध्यार्थ्यांना व्हावा, यासाठी ही निवड करण्यात आली आहे
.
राजूबापू पाटील यांची जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्याचे आज सकाळी समजताच पाटील समर्थकांनी तोफांच्या सलामीने आणि गुलालाच्या उधळणीने एकच जल्लोष केला. 
असाही योगायोग – रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी जेष्ठ नेते (वै.) यशवंतभाऊ पाटील यांनी ४९ वर्षे काम केले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी आता राजूबापू पाटील यांची निवड संस्थेचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी केली आहे. अशा प्रकारे एकाच संस्थेत एकाच पदावर वडील आणि मुलाने काम करण्याचा योगायोग पहावयास मिळत आहे.
पाटील घराण्याच्या कार्याचा शरद पवार यांच्याकडून गौरव –कॉंग्रेस पक्षात असल्यापासून शरद पवार आणि (वै.) यशवंतभाऊ पाटील यांचे स्नेहसंबंध होते. भाऊंच्या निधनानंतर ही खा. शरद पवार यांनी भाऊंच्या कार्याची आणि समाजाशी घट्ट असलेल्या नात्याची जाणीव ठेवत त्यांचे पूत्र राजूबापू पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य केले, मध्य विभाग सल्लागार समितीच्या समन्वय समितीच्या सदस्यपदी राजूबापू यांनी काम केले आहे. आणि आता रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड केली आहे. यावरूनच खा. पवार आणि पाटील घराण्याच्या दृढ संबंधाची कल्पना येते.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...