Tuesday 4 April 2023

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली . 



येथील माजी सरपंच मनिषा मोरे यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पदासाठी अध्याशी अधिकारी श्री. ताटे यांनी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलाविली होती. यावेळी सोनाली   साखरे,  मनीषा  मोरे, मनीषा कोयले, आरती  गोसावी, भगवान सर्जे, उमेश गायकवाड ,.दत्तात्रय चव्हाण हे सात हि सदस्य उपस्थित होते. यावेळी मनिषा मोरे व सोनाली साखरे यांच्याकडुन सरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र मनिषा मोरे यांनी छाननीनंतर अर्ज माघार घेतल्याने सोनाली साखरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.  यावेळी ग्रामसेवक चंद्रशेखर गिड्डे यांच्यासह दादासाहेब साखरे, भानुदास गायकवाड, संजय लावर,स्वप्निल राऊत, भैरवनाथ राऊत, शंकर साखरे, प्रतीक साखरे, ज्योतीराम रेडके, गफार शेख, रफिक शेख, कैलास मोरे, राहुल मोरे, रवींद्र मोरे, अभिमान मोरे, गोरख मोरे, सुरेश मोरे, बापू साखरे, माजी सरपंच अरविंद डावरे, समाधान उपासे, मंगेश डावरे, अक्षय इनामदार, औदुंबर गायकवाड, दिगंबर गायकवाड, प्रवीण गोसावी,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Sunday 26 February 2023

पटवर्धन कुरोली प्रशालेत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

मोहन कोळी-पटवर्धन कुरोली
पटवर्धन कुरोली, ता. २७: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर)  येथील पटवर्धन कुरोली प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.                                     
     प्रारंभी सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य एच.यु.लामकाने यांच्यासह श्री.तोरणे, श्री.सुतार, श्री.विभुते, श्री.वगरे, श्री. पाटील उपस्थित होते.  या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या प्रशालेतील शिक्षकांचा शाल व श्रीफळ देेऊन यावेळी सत्कार करण्यात आला. 

 या प्रशालेमध्ये १९९२ ते १९९८ या कालावधील पाचवी ते दहावी पर्यत शिक्षण घेतलेले ७० माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते.   यावेळी शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शाळेचा माजी विद्यार्थी संग्राम डावरे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुंटुबाला आर्थिक मदत केली. व यापुढील काळातही मदत करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांनी दिले. विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमठविणारे अनेक माजी विद्यार्थी  पंचवीस वर्षानंतर एकमेकांना भेटले.  त्यामुळे   शाळेतील जुन्या आठवणींना नव्याने  उजाळा मिळाला. यामधील सर्वच माजी विद्यार्थी आज शिक्षक   डाॅक्टर, वकील, राजकारण, समाजकारण तर काहि शेती व इतर व्यवसायात आपल्या कामाचा ठसा उमठवित आहेत.  

अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र भेटल्यामुळे चेहर्यावरील आनंद दिसून येत होता. यावेळी अनेकांनी हि भेट आणी या आठवणी पुढील आयुष्यात प्रेरणा देत राहतील असे मनोगत व्यक्त केले. या वेळी उपस्थित शिक्षकांनी या स्नेहमेळाव्या बद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  डॉक्टर संदीप काटकर, कृष्णा कुलकर्णी,  मोहन शिंदे,  डाॅ. श्रीकांत अवद्युतराव , सचिन बाबर, मंगेश पासले, सतीश मोरे, अनिल जवळेकर, रामदास नाईकनवरे, एडवोकेट मधुकर नाईकनवरे, सुरेश डावरे,  सतीश डावरे, नवनाथ जवळेकर, दत्ता उपासे,  सुधीर पाटील, सचिन नाईक नवरे, प्रकाश मोरे, शेखर कदम, सुकेशनी पाटील देशमुख, उषा तवटे भादुले, सुंदर नाईक नवरे, सुलताना शिकलकर, सुलभा रोडगे, राणी जाधव बागल, शकुंतला नाईकनवरे, चंदनकर, गंगू नाईकनवरे, पासले,किरण भिंगारे, ब्रम्हदेव जाधव, मारुती पिंजारी यांच्यासह विजय कोळी, बजरंग माने, विठ्ठल नाईकनवरे,  सिध्दार्थ चव्हाण यानी परिश्रम घेतले.

Tuesday 26 April 2022

सिध्दनाथ यात्रा सुरु

 

पटवर्धन कुरोली, ता.२६: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील ग्रामदैवत श्री.सिद्धनाथ यात्रा बुधवार (ता.२७) पासून सुरू होत असून दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता सासनकाठी मंदिराकडे वाजत गाजत नेली जाईल. गुरूवारी (ता.२८) सकाळी महाअभिषेक होइल. दुपारी बारा वाजता आरतीनंतर सासनकाठी व पालखीचा छबीना निघेल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Tuesday 8 March 2022

चिंचकर वस्तीशाळेत महिला दिन साजरा

;पटवर्धन कुरोली, ता.०८: येथील चिंचकर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

  यावेळी सावित्रीबाई फुले व माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन पटवर्धन कुरोली केंद्राचे केंद्रप्रमुख  अण्णासाहेब पवार व केंद्रीय मुख्याध्यापक श्री. जमदाडे  यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.

 एक स्त्री काय करू शकते नारी अबला नसून सबला आहे महिलांना ही संधी मिळाली तर आपले कर्तृत्व त्या दाखवून देतात म्हणून समाजात महिलांना संधी मिळाली पाहिजे असे प्रतिपादन केंद्रप्रमुख श्री. पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक श्री सोनवणे  यांनी केले. यावेळी वस्तीवरील बहुसंख्य प्रमाणात महिला अंगणवाडी चे  श्रीमती खेडेकर, श्रीमती  रेडके  यास्मिन आतार इत्यादी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री धनाजी बोबडे सर यांनी आभार व्यक्त केले.


Wednesday 20 October 2021

द्राक्ष बागेतुन घेतले भरघोस उत्पन्न

पंढरपूर : प्रतिनिधी,  मौजे मारापूर (ता. मंगळवेढा ) येथील श्री. विजयकुमार यादव यांनी आपल्या शेतामधे सुपर सोनाका या द्राक्ष वाणाची लागवड करून भरघोस उत्पादन घेतले आहे. तसेच तरुण शेतकऱ्यांनी नियोजनात्मक द्राक्ष करावी असे आवाहन केले आहे. यादव यांच्या द्राक्ष बागेस महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी महाविदयालय, धुळे येथील कृषीकन्या कु. आकांक्षा महादेव जेधे

 यांनी भेट दिली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या यशाची त्रिसुत्री सांगितली की, योग्य नियोजन, तयानुसार अंमलबजावणी, योग्य विक्री व्यवस्था, शेतीवर निष्ठा ही माझ्या यशाची त्रिसूत्री आहे. तरुण शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा कल आणि ग्राहकांच्या मागणीनुसार योग्य पिकांची, फळ बागाची लागवड केल्यास भरघोस उत्पादन घेता येते. सुपीक, निरोगी पिकांसाठी माती परिक्षण, पाण्याचे परीक्षण आणि त्याचे नियोजन योग्य करावी लागते.  खतांची योग्य मात्रा यांचा वापर करून चांगले उत्पादन घेतल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना सांगितले की, तरुण शेतक-यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीसुद्धा फायदेशीर ठरू शकते. आजच्या युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे आवाहन सुद्धा केला. यावेळी कु.आकांक्षा जेधे या विद्यार्थीनीने द्राक्ष बागेची पाहणी करून सखोल माहिती व नोंदी घेतल्या.

Tuesday 7 September 2021

पिराची कुरोली माती परिक्षण मार्गदर्शन


  पिराची कुरोली ,ता.०७:  आधुनिक काळात माती परिक्षण हि काळाची गरज असल्याचे मत ‘ कृषिदुत “ भुई प्रमोद अनिल याने व्यक्त केले आहे.                                                             महात्मा फुले विद्यापीठ राहुरी अंतर्गत श्रीराम कृषि महाविद्यालय पानिव. आयोजीत ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमात सागितले .   यावेली ‘कृषिदुत” भुई प्रमोद याने शेतकर्यामध्ये माती परीक्षणासबंधी जनजागृति व्हावी यासाठी उपक्रम राबिवला. यामध्ये पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपुर्वी ,रासायनिक खते देण्यापुर्वी किंवा खते दिल्यानंतर 3 महिन्याने मातीचा नमुना घ्यावा माती परिक्षणानुसार खत व्यवस्थापन करने गरजेचे आहे .मातीमध्ये असनारे घटक जमिनिचा सामु मातीचा प्रकार याविषय शेतकर्याना योग्य ते मार्गदर्शन करन्यात आले यावेली पिराची कुरोली येथिल प्रगतशील शेतकरी भुई दिलीप ,भुई तानाजी,भुई हरिदास उपस्थित होते यासाठी श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील  ,सचिव श्रीलेखा पाटील, सहसचिव करण पाटील ,अँड अभिषेक पाटील प्राचार्य डॉ. एच.  बी .हाके,कार्यक्रम अधिकारी डॉ.जे.आय.शेख़,डॉ.के.यु.देशमुख प्रा घोगरे यांचे मार्गदर्शन लाभाले .

Sunday 5 September 2021

पटवर्धन कुरोलीत कृषी कार्यानुभव कार्यक्रम

 पटवर्धन कुरोली दि.२७ जुलै-

(प्रतिनिधी) कोरोना च्या पार्श्वभूमीवर कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषी विद्यार्थी आहे त्या मूळ ठिकाणी कार्यरत आहेत याच माध्यमातून धुळे येथील कृषी महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु.नाईकनवरे प्रिती लक्ष्मण, पटवर्धन कुरोली तालुका पंढरपूर येथील शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रण कसे बनवायचे व त्याचे फायदे काय आहेत याबाबत माहिती दिली.

त्या म्हणाल्या-'सध्याच्या वातावरणामुळे द्राक्ष व डाळिंब वर मोठ्या प्रमाणात तेल्या व दावण्यारोग यांचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे'.  कृषी विद्यार्थीनी प्रिती नाईकनवरे यांनी कमी खर्चा मध्ये या रोगावर उपाय म्हणून बोर्डो मिश्रण कसे बनवावे हे गावकऱ्यांना सविस्तर पणे सांगितले.

यावेळी त्यांनी सांगितले की १०० लिटर बोडों मिश्रण बनवण्यासाठी एक किलो मसूद हे ५० लिटर पाण्यामध्ये विरघळावे आणि एक किलो चुन्याचे खडे (प्रमाण १:१) किंवा पावडर असेल तर ती ४०० ग्रॅम एवढी घेऊन पन्नास लिटर पाण्यामध्ये ओतावे हे दोन्ही मिक्स करत असताना त्या मिश्रणाचा pH हा ७(सात) आला पाहिजे याची काळजी घ्यावी.जे मिश्रण तयार झाले आहे. तो द्राक्ष वरील दावण्या व भुरी या रोगासाठी फवारली तरी असे आढळून येईल की द्राक्ष वरील रोग कमी होतात, याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले.

तिला महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सी. डी. देवकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. संदीप पाटील, कार्यक्रम अधिकारी ए. एस. महाले व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन व लाभले असेही प्रिती नाईकनवरे यांनी सांगितले.

Saturday 4 September 2021

पटवर्धन कुरोली येथे ग्रामीण कृषी जागृकता कार्यक्रम

 


पटवर्धन कुरोली दि.२७ जुलै-

(प्रतिनिधी) कोरोना च्या पार्श्वभूमीवर कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषी विद्यार्थी आहे त्या मूळ ठिकाणी कार्यरत आहेत याच माध्यमातून धुळे येथील कृषी महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु.नाईकनवरे प्रिती लक्ष्मण, पटवर्धन कुरोली तालुका पंढरपूर येथील शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रण कसे बनवायचे व त्याचे फायदे काय आहेत याबाबत माहिती दिली.

त्या म्हणाल्या-'सध्याच्या वातावरणामुळे द्राक्ष व डाळिंब वर मोठ्या प्रमाणात तेल्या व दावण्यारोग यांचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे'.  कृषी विद्यार्थीनी प्रिती नाईकनवरे यांनी कमी खर्चा मध्ये या रोगावर उपाय म्हणून बोर्डो मिश्रण कसे बनवावे हे गावकऱ्यांना सविस्तर पणे सांगितले.

यावेळी त्यांनी सांगितले की १०० लिटर बोडों मिश्रण बनवण्यासाठी एक किलो मसूद हे ५० लिटर पाण्यामध्ये विरघळावे आणि एक किलो चुन्याचे खडे (प्रमाण १:१) किंवा पावडर असेल तर ती ४०० ग्रॅम एवढी घेऊन पन्नास लिटर पाण्यामध्ये ओतावे हे दोन्ही मिक्स करत असताना त्या मिश्रणाचा pH हा ७(सात) आला पाहिजे याची काळजी घ्यावी.जे मिश्रण तयार झाले आहे. तो द्राक्ष वरील दावण्या व भुरी या रोगासाठी फवारली तरी असे आढळून येईल की द्राक्ष वरील रोग कमी होतात, याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले.

तिला महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सी. डी. देवकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. संदीप पाटील, कार्यक्रम अधिकारी ए. एस. महाले व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन व लाभले असेही प्रिती नाईकनवरे यांनी सांगितले.

Saturday 28 August 2021

ग्रामीण कृषी जागरुकता कार्यक्रम


 पटवर्धन कुरोली, ता. २८: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम २०२१-२२ चे आयोजन करण्यात आले होते.                                                                            यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्ण श्रीराम कृषी महाविद्यालय पाणीव (ता.माळशिरस) येथील चतुर्थ वर्षात शिकणारी विद्यार्थिनी  शुभांगी मुंगुसकर यांनी या कार्यक्रमा अंतर्गत येथील शेतकऱ्यांना ज्वारी पिकासाठी  रासायनिक व जीवाणू संवर्धनाचा वापर करुन बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. शेतकर्यांनी ज्वारी पेरणी करताना बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहण शुभांगी मुंगुसकर हिने यावेळी उपस्थित  शेतकर्याना केले.ज्वारीची उगवण क्षमता वाढावी, पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढावी, हेक्टरी उत्पादन वाढीस मदत व्हावी यासाठी बियाणावर प्रथम सल्फर पावडर २० ग्रॅम प्रति किलो बियाणास लावून त्यानंतर स्युडोमोनास फ्लोरोसेन्स ५० मिली प्रती पाच किलो बियाणासाठी बीज प्रक्रिया करण्याची गरज असते. शिवाय अशा पिकाचे रोगापासून संरक्षण होते. व उत्पादनात भरघोस वाढ होते. त्यासाठी बीजप्रक्रिया हि अत्यावश्यक असल्याची माहिती मुंगुसकर हिने यावेळी दिली. यासाठी तिला श्रीराम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. हरी हाके, कार्यक्रम अधिकारी डाॅ. जबिना शेख, विषयतज्ञ प्रो. वाघ सर यांनी विविध उपक्रमांत मार्गदर्शन केले.

Thursday 15 July 2021

पटवर्धन कुरोलीत रक्तदान शिबीर






पटवर्धन कुरोली :  पटवर्धन कुरोली रक्तदान शिबीरामध्ये पंच्याऐंशी रक्तदात्यानी रक्तदान केले. शिक्षण राज्यमंत्री  बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबीराचे आयोजन  दिपक नाईकनवरे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.  या शिबीराचे उदघाटन तहसीलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबीरास भेट देउन आमदार प्रशांतराव परिचारक व सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील आयोजकांचे कोतुक केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर नाईकनवरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे  जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर यांच्यासह वैभव नाईकनवरे, सुग्रीव कोळी,  सरपंच गणेश उपासे, माजी उपसरपंच पांडुरंग नाईकनवरे आयोजक दीपक नाईकनवरे, सर्कल श्री. ऒसेकर , तलाठी श्री. गवळी , ग्रामसेवक श्री. गिड्डे, पोलीस पाटील गणेशजाधव, राधेशाम पाटील, चैतन्य नाईकनवरे, नागनाथ नाईकनवरे, शिवाजी जवळेकर, गणेश मोरे, संतोष घुले, मदन चिंचकर,मदन पाटील, गणेश देशमुख, शिवाजी नाईकनवरे, निलेश देशमुख, अरविंद डावरे, ओंकार नाईकनवरे,.बापू नाईकनवरे, राहुल नाईकनवरे, धनाजी बोबडे ,सचिन बाबर, नामदेव देशमुख, सुधाकर जाधव , नागनाथ मोरे , सुहास नाईकनवरे, बापू मगर उपस्थित होते.



Saturday 24 April 2021

राज्यातील साखर कारखान्याना कोविड सेंटर उभारण्याच्या सुचना द्याव्यात


 पटवर्धन कुरोली, ता.२४: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्यामुळे साखर कारखान्यांना कोव्हिड सेंटर उभा करण्याच्या सुचना द्याव्यात अशी मागणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर चे जिल्हाध्यक्ष सुग्रीव कोळी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे बेडची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे. त्यामुळे मृत्यू चे प्रमाण वाढले आहे.  त्यामुळे राज्यातील सहकारी तसेच खाजगी साखर कारखान्याना कोविड सेंटर उभा करण्याच्या सुचना द्याव्यात.  त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना बेड उपलब्ध होतील. तसेच सरकारी व खाजगी हाॅस्पीटलचा ताण कमी होउ शकेल. तरी आपण या सर्व गोष्टींचा विचार करुन राज्यातील सर्व कारखानदारांना कोविड सेंटर उभारण्याच्या सुचना कराव्यात अशी मागणी केली आहे.

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...