Friday 14 December 2018

रेणुकामातेची मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा

पटवर्धन कुरोली, ता.१५: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील ग्रामदैवत रेणुकामातेची मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवार (ता.१७)  रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत करण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार आहे. संध्याकाळी नऊ वाजता कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन भाविकानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

Thursday 13 December 2018

पाण्याच्या टाकीचे भुमीपूजन

पटवर्धन कुरोली, ता.१४: उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून मंजूर झालेल्या पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन पंचायत समिती चे माजी सभापती दिनकरराव नाईकनवरे यांच्या हस्ते करण्यात आले.      उजनीवसाहत येथे  राष्ट्रीय पेयजल योजनेतून साडेसत्तावीस लाख रूपये मंजूर झाले आहेत.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश उपासे, दादासाहेब साखरे,  उजनी वसाहत च्या सरपंच सोनाली साखरे,  ग्रामपंचायत सदस्य हरीदास मोरे, महादेव सावंत, राजेंद्र मगर,गोरख डोके, दत्तात्रय राऊत, राहुल सर्जे, योगेश भंडार, श्री.कवठेकर, भाजपाचे युवा नेते रमेश जवळेकर उपस्थित होते.

पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

 
  पटवर्धन कुरोली ता.१२ पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे मा.कृषीमंत्री  शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त  सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने विविध  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष सुग्रीव कोळी होते
येथील चिंचकर वस्ती जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत  शेतकऱ्यांचा जानता राजा मा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राष्ट्रवादी पदवीधर संघ सोलापूर जिल्हा यांच्य वतीने निबंध,कथालेखन,काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विजेत्याना प्रथम,द्वितीय,तृतीय पारितोषिक देण्यात आले. विशेष उपक्रम म्हणुन गुलाबाची झाडे  भेट देण्यात आली. विद्यार्थ्याना शालेय साहित्य व खाऊ चे वाटप करण्यात आले होते. यावेळी अॅड.संतोष नाईकनवरे, पृथ्वीराज मोरे,विश्वास पाटील, हरीदास जवळेकर,प्रशांत मोरे,भजनदास नाईकनवरे, अशोक कारंडे, धनाजी बोबडे,कैलास सोनवणे उपस्थित होते

Monday 10 December 2018

नांदोरेत जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा

पटवर्धन  कुरोली, ता.१०:     महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन    ( मेस्टा )व एस.पी. पब्लिक स्कूल,नांदोरे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धा रविवार (ता.०९) रोजी एस.पी पब्लिक स्कूल, नांदोरे प्रशालेच्या भव्य प्रांगणामध्ये मोठ्या उत्साहात पार पडल्या.     
  या स्पर्धेचे उद्घाटन पंढरपूर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील, जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे व मा. सभापती दिनकरभाऊ नाईकनवरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी विठ्ठलराव शिंदे सह.सा. कारखान्याचे संचालक पोपटमामा चव्हाण, मेस्टाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हरिष शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश नीळ, जिल्हा कार्याध्यक्ष गणपत मोरे, जिल्हा संघटक डॉ.संतोष वलगे, करमाळा तालुकाध्यक्ष प्रा. संदीपान गुटाळ, हरिदास भिंगारे, सत्यवान करांडे, दत्तानाना बनसोडे, सुनिल भिंगारे, दत्तात्रय पवार, प्रा.संजय मोहिते, सागर सरगर, महादेव झोळ, सचिव अश्वराज वाघ, विक्रम भिंगारे , बाळासाो. चव्हाण, स्कूलच्या प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.       प्रास्ताविकामध्ये डॉ. वलगे यांनी मेस्टाचे कार्य व उद्दिष्ट्ये सांगून इंग्रजी माध्यमाच्या मुलांनासुद्धा लहानपणापासूनच खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन यापुढेही करण्यात येणार असल्याचे सांगितले . यावेळी रणजितसिंह शिंदे यांनी संघटनेच्या तसेच स्कूलच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले व संघटनेच्या पाठीशी कायम उभे राहण्याचे व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.                         अध्यक्षीय भाषणामध्ये सभापती राजेंद्र पाटील यांनी एस.पी.मध्ये पुरविल्या जाणाऱ्या भौतिक तसेच शैक्षणिक सुविधा पाहून समाधान व्यक्त केले व एस.पी.शाळा ही सर्वासाठी एक आदर्श शाळा तसेच प्रेरणादायी ठरेल असे सांगितले. यावेळी गणेश नीळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .                        या स्पर्धेमध्ये खो- खो साठी जिल्ह्यामधून 16 संघानी तर कबड्डीसाठी 21 संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये खो- खो स्पर्धेमध्ये मुले गटातून प्रथम क्रमांक एस.पी. पब्लिक स्कूल नांदोरे , द्वितीय क्रमांक अभिनव पब्लिक स्कूल, वाशिंबे करमाळा तर तृतीय क्रमांक छत्रपती इं. मिडीयम स्कूल,मळोली तसेच खो-खो स्पर्धेमध्ये मुली गटातून प्रथम क्रमांक एस.पी.पब्लिक स्कूल, नांदोरे, द्वितीय क्रमांक जिजाऊ ज्ञानमंदीर, कोंडी ( सोलापूर )तर तृतीय क्रमांक प्रगती विद्यामंदीर, कुर्डू या संघांनी यश संपादन केले तसेच कबड्डी स्पर्धेमध्ये मुले गटातून प्रथम क्रमांक अभिनव पब्लिक स्कूल, वाशिंबे करमाळा, द्वितीय क्रमांक शिवशंभो इं. मि. स्कूल,वेळापूर तर तृतीय क्रमांक ब्रम्हचैतन्य इं.मि. स्कूल, तांदुळवाडी तसेच कबड्डी मुली गटातून प्रथम क्रमांक प्रगती विद्यामंदीर कुर्डू,द्वितीय क्रमांक अभिनव पब्लिक स्कूल वाशिंबे करमाळा तर तृतीय कमांक क्रांती प्रायमरी स्कूल कव्हे (रोपळे ) या संघांनी यश संपादन केले. विजेत्या संघांना चषक तसेच प्रशस्ती पत्रक देवून गौरविण्यात आले तसेच सर्व सहभागी संघांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले.             स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एस.पी. चे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम  घेतले.पंच म्हणून शंकर तोडले, अमोल कचरे, सूरज अलगुडे, गोकुळ यादव व सुप्रिया गुंड यांनी काम पाहिले.

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...