Sunday 26 August 2018

रक्षाबंधनाचा एक आगळावेगळा उपक्रम




 पटवर्धन कुरोली,  पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती येथे एसटी बस व झाडांना राख्या बांधून हा एक आगळावेगळा उपक्रम साजरा करून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला   विद्यार्थिनींनी “रक्षाबंधन पर्यावरणाचे’ हा संदेश समाजाला दिला. श्रावण पौर्णिमेला प्रत्येक वर्षी रक्षाबंधन साजरा होतो. बहिणीने भावाला राखी बांधून आपले रक्षण करावे म्हणून ती भावाला ओवाळते याचा एवढाच अर्थ नसून आदर्श विद्यार्थिनींनी झाडाला राखी बांधून “आम्हा मानव प्राण्यांचे तू रक्षण कर’ असे झाडाला साकडे घालून मानवाला निरोगी आयुष्य मिळावे म्हणून पर्यावरणाचे रक्षण करावे, पर्यावरण ही काळाची गरज आहे. तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
शहरीकरणाप्रमाणे ग्रामीण भागात दिवसेंदिवस झाडे लावण्यापेक्षा वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपोआपच प्रदूषणात वाढ होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. पर्यावरणाचे महत्व सर्वांना कळावे आणि त्यातून समाजजागृती व्हावी, हा हेतूने. . कोणतेही आंदोलन, मोर्चा म्हटलं की लक्ष्य ठरते ती आपली सर्वांची लाडकी " लालपरी "एस टी या एस टी ला  आपण जपले पाहिजे या हेतूने तिला विद्यार्थ्यांनी राखी बांधून आपण तिला जपू या असा संदेश दिला.तसे त्या एसटीत कर्तव्यार्थ असणारे चालक व वाहक यांना त्यांच्या कर्तव्यामुळे हा सण साजरा करता येत नाही म्हणून त्यांनाही राख्या बांधून एक वेगळा संदेश या कार्यक्रमातून दिला.
नवनवीन झाडे तर लावली जातातच, पण या झाडांचे रक्षण राखी बांधून आदर वस्ती शाळेच्या  विद्यार्थिनींनी केले.
तसेच पर्यावरण संरक्षणाच्या हेतूने झाडालाही राख्या बांधून झाडे लावूया  झाडे जगूया  हा संदेश यातून दिला.यावेळी एसटीचे चालक श्री संतोष कांबळे व  शेख तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री बोबडे सर, हरिभाऊ कोळसे , मारुती कोळसे , अकबर आतार,भैरवनाथ गुंड , प्रकाश माने, नवाज आतार उपस्थित होते. सहशिक्षक श्री कैलास सोनवणे यांनी "रक्षाबंधन" याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली

आदर्श विद्यालयाचे तालुका स्तरीय खो खो मध्ये यश

 आदर्श चा 14 व् 17 गटामध्ये दुहेरी धमाका





पटवर्धन कुरोली, ता.२७ शेवते (ता. पंढरपूर) येथील आदर्श विद्यालयाने तालुका स्तरीय खो खो स्पर्धे मध्ये १४ वर्षे वयोगटा मध्ये शांतिनिकेतन कोर्टी तर १७ वर्षे वयोगटा मध्ये यजमान वाडी कुरोलीचा पराभव करून अजिंक्यपद मिळवले दोन्ही संघाचे जिल्हास्तरीय स्पर्धे साठी निवड झाली आहे.
१४ वर्षे वयोगटा मध्ये सलग पाच विजय मिळवून पुन्हा एकदा आदर्शचे खो खो तील वर्चस्व सिद्ध केले.यामध्ये त्यानी सर्वप्रथम तुंगत त्यानंतर जैनवाड़ी, अजनसोंड, आढीव् व् अंतिम सामन्यात शांतिनिकेतन कोर्टिचा पराभव करत हे यश मिळवले या सर्व स्पर्धेमधे  चमकले ते म्हणजे श्रीहरि सुतार, सौरभ खेडेकर,रामचंद्र ढोबळे व् इतर सर्व खेळाडू.
तसेच आदर्श प्रशालेने खो खो च्या आणखी एका विभागात आपला दबदबा सिध्द केला ते म्हणजे १७ वर्षे वयोगटा मध्ये पहिल्याच प्रयत्नात तालुक्यात बलाढ्य संघाचे वर्चस्व मोडून काढत आपला दबदबा सिद्ध केला त्यांनीही सलग पाच विजय मिळवले. त्यानी सर्वप्रथम अजनसोंड त्यानंतर आढीव् ,कोर्टी, लक्ष्मी टाकळी व् अंतिम सामन्यामध्ये यजमान वाडीकुरौली संघाचा डावाने पराभव करत जिल्हस्तरीय स्पर्धेत दिमाखात प्रवेश केला . या संघामध्ये सर्वांचे लक्ष आपल्यावर खेळून ठेवले ते म्हणजे रणजीत तोंडले, पृथ्वीराज तांगड़े,व् स्वप्निल नाइकनवरे या त्रिमूर्तिनी त्याचबरोबर आदेश मोरे व् रोहित विटेकर यांचीही योग्य वेळची खेळी ही वाखाणन्याजोगी होती.
आदर्शच्या या दोन्ही संघाची निवड जिल्ह्यास्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे. खऱ्या अर्थाने आदर्शच्या या शिलेदारानी आपल्या क्रीड़ाशिक्षकाच्या वाढदिवसा ची अनोखी भेट देलेली आहे. या अनमोल अशा यशाला गवसनी घालन्यास जे अहोरात्र झटले ते शंकर सर यांचे कौतुक आणि अभिनंदन करावे तेवढे थोडेच.या दोन्ही संघातील सर्व खेळाडूंचे व् त्यांचे मार्गदर्शक शंकर तोंडले यांचे अभिनंदन मुख्याध्यापक श्री.तोंडले यांनी केले.

Monday 20 August 2018

धैर्यशील पाटील यांची निवड

पटवर्धन कुरोली, ता.०२: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी पंढरपूर बाजार समितीचे माजी संचालक
धैर्यशील पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. सरपंच महादेवी तवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती.  यावेळी पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती दिनकरभाऊ नाईकनवरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

तुकाराम नाईकनवरे यांची चेअरमन पदी निवड

पटवर्धन कुरोली, ता.२०: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर)  येथील विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदी तुकाराम लक्ष्मण नाईकनवरे यांची तर व्हाईस चेअरमन पदी सिकंदर मुबारक शेख यांची निवड करण्यात आली. सोसायटी चे अध्यक्ष समाधान नाईकनवरे व व्हाईस चेअरमन विजय काळे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सावंत  यांच्या अध्यक्षतेखाली संचालकाची बैठक घेण्यात आली.यावेळी समाधान नाईकनवरे, केशव पाटील मेघशाम काटकर, मधूकर जाधव,धर्मराज खेडेकर,बळीराम उपासे, मुरलीधर चव्हाण, तुकाराम नाईकनवरे, सिकंदर शेख, तानाजी मगर, विजय काळे, भामाबाई रामचंद्र उपासे, सुमन गणपत नाईकनवरे हे उपस्थित होते. यावेळी चेअरमन  पदासाठी तुकाराम नाईकनवरे यांचा तर सिकंदर शेख व्हाइस.चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल करण्यात आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सावंत  यानी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर नाईकनवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धैर्यशील नाईकनवरे, पंडित तवटे  ,धर्मराज काटकर, नागेश उपासे, विठ्टल मगर, रमेश जवळेकर भालचंद्र उपासे, पांडुरंग राजमाने यांच्यासह परिचारक गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Wednesday 15 August 2018

स्वातंत्र्यदिन साजरा


 नांदोरे  (ता. पंढरपूऱ) येथील एस.पी. पब्लिक स्कूलमध्ये ध्वजारोहण करताना शिवाजी शिंदे  यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे, अ्ण्णासाहेब कोरके व ईतर.

पटवर्धन कुरोली,ता.१६  पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूऱ) परीसरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा  करण्यात आला

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरसिंहवाडी
येथे ध्वजारोहण तंटामुक्ती अध्यक्ष मा. धैर्यशील नाईकनवरे यांच्या हस्ते  करण्यात आले. शाळेस गॅस कनेक्शन दिल्याबद्दल  पालकांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक दामोदर येरडलावार यांनी प्रास्ताविक केले.   गणेश दिवे  यांनी आभार मानले

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचकरवस्ती
येथे कुंदा मुरलीधर उपासे यांच्या  हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  मुख्याध्यापक धनाजी बोबडे  कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी बाबासाहेब नाईकनवरे, सुजाता नाईकनवरे, गोपाळ नाईकनवरे , कैलास सोनवणे उपस्थित होते. सूत्रसंचालन  गीतांजली बोबडे व प्रणिती जवळेकर यांनी केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरटगांव (भोसे)
येथे  ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासो आयरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संतोष उपासे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गावातील बहूसंख्य नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार  जवळेकर यांनी केले तर मुख्याध्यापक संतोष काळे यांनी  आभार मानले.

एस.पी. पब्लिक स्कूल, नांदोरे

येथे  ध्वजारोहण शिवाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे, अ्ण्णासाहेब कोरके, प्रकल्प संचालिका वासंती वलगे,मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण यांच्यासह  शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

आदर्श प्राथमिक व् माध्यमिक विद्यालय शेवते
येथे ध्वजरोहन मेजर नितिन जिरेकर च्या हस्ते करण्यात आले. यावेळी तुकाराम गायकवाड़, संपत जवळेकर, श्री.दत्ता खलचे, मुख्याध्यापक श्री.तोंडले, यांच्यासह श्री. पाटील, श्री.लेंगरे, क्रीड़ा मार्गदर्शक शंकर तोंडले उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.लोखंडे सर यांनी केले.  अमर पाटील यानी आभार तर सूत्रसंचालन श्री.संतोष पाटील यानी केले यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता..

Sunday 12 August 2018

तालुकास्तरीय तायक्वान्दो स्पर्धेमध्ये एस.पी. चा दबदबा कायम












 महाराष्ट्र राज्य क्रिडा विभागाच्या वतीने पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या तायक्वान्दो स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एस.पी.पब्लिक स्कूल नांदोरे या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आपला दबदबा कायम ठेवला यामध्ये 14 वर्षाखालील वयोगटातून 38 ते 41 किलो वजन गटातून श्रेयस युवराज सातुरे याने तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चीत केली व 17 वर्षांखालील वयोगटातून 38 ते 41 किलो वजन गटातून संकेत विठ्ठल सातुरे याने तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली तसेच रोहन अनिल भिंगारे याने 29 ते 32 किलो वजन गटातून द्वितीय व रणजित दत्तात्रय भिंगारे याने 32 ते 35 किलो वजन गटातून द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.                               यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, क्रिडा विभागप्रमुख सूरज अलगुडे, अमोल कचरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. या यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे प्रशि

Wednesday 8 August 2018

एस.पी.चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश


.
Add caption
  












 पटवर्धन कुरोली, ता.०८:     नांदोरे (ता.पंढरपूर) येथील एस.पी.पब्लिक स्कूल या प्रशालेच्या इ.8 वी च्या दोन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.यामध्ये अभिषेक गोरख कांबळे याने १८४ गुण मिळवून करकंब केंद्रामध्ये प्रथम क्रमांक तर राज्याच्या यादीमध्ये २१२ वा क्रमांक मिळून यश संपादन केले तसेच अपेक्षा युवराज सातुरे हिने १८२ गुण मिळवून करकंब केंद्रामध्ये द्वितीय क्रमांक तर राज्याच्या यादीमध्ये २३१ वा क्रमांक मिळवून यश संपादन केले.                यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे मार्गदर्शक डॉ. नंदकुमार होनराव, संस्थेचे अध्यक्ष डॉ.संतोष वलगे,  सचिव अश्वराज वाघ, केंद्रप्रमुख रंगनाथ घोडके ,खजिनदार विक्रम भिंगारे, सहसचिव बाळासाहेब चव्हाण,  प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व शाळा विकास विकास समितीचे सर्व सदस्य यांनी केले. यशस्वी विद्यार्थांना अमरनाथ इंगोले , वासंती वलगे यांचे मार्गदर्शन लाभले

Monday 6 August 2018

रत्नाईच्या कृषिदूतांकडून जनावरांचे मोफत लसीकरण......


 


 पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांमध्ये उद्भवणाऱ्या साथरोगांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने रत्नाई कृषि महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जनावरांचे मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले  होते.
      या वेळी कृषिदूतांकडून जनावरांचे विविध आजार व त्यासाठी देण्यात येणाऱ्या वेगवेगळया लसींबद्दल माहिती देण्यात आली. जनावरे आजारी पडल्यानंतरची लक्षणे व आजार होऊ नये यासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाय योजना यासंबंधी चर्चा करण्यात आली.
      पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांना साथरोगांची लागण होण्याची शक्यता असते.गावात लाळ खुरकत रोगाची जनावरांना लागण होण्याचा अनुभव नेहमी येतो. फऱ्या व घटसर्पबाधित जनावरेही आढळतात. त्यामुळे या तीन मुख्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठीची लस देण्यात आली.
       या लसीकरणाव्यतिरिक्त जनावरांना पाण्यातून जंतांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लहान-मोठी जनावरे, शेळ्या, मेंढ्या यांना जंतनाशक औषधांचे डोस देण्यात आले.
       कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.सरपंच दादासाहेब साखरे यांनी भूषविले.पशुचिकित्सक डॉ.समाधान लामकाने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषिदूत ओंकार गायकवाड,राकेश शिंदे,सुदर्शन सुतार,सागर पवार,सुरज गुंड, तेजस मोहिते, साहिल कोठारी, महेश सुर्यवंशी,सृजन पुट्टा आदिंनी परिश्रम घेतले.

आदर्श प्राथमिक शाळेचे कराटे स्पर्धेत घवघवित यश



    पंढरपूर येथे  महाराष्ट्र राज्य कराटे& एल्बो बॉक्सिंग स्पर्धा यांचे वतीने घेण्यात आलेल्या कराटे स्पर्धेत शेवते (ता.पंढरपूर) येथील आदर्श प्रशालेच्या खेळाडू नी घवघवीत यश मिळवून कराटे तील वर्चस्व सिद्ध केले आहे.
या स्पर्धेत प्रशालेतील मुलांनी  ८ गोल्ड व् ३ सिल्वर मेडलची कमाई केली. यामध्ये१७ वर्षाखालील ३८ ते ४० किलो वजन गटामध्ये कु. सीमा विष्णु ढोबळे ,४० ते ४४ किलो वजन  गटा मध्ये कु. क्षितिजा संजय शेजाळ ,४४ते४८ किलो वजन गटा मध्ये कु.साक्षी रघुनाथ नाइकनवरे ,४८ ते ५२ किलो वजन गटा मध्ये कु.सायली दिलीप तोंडले,५२ ते ५६ किलो वजन गटा मध्ये कु.आकांक्षा शांताराम गूगले अशा सर्व मुलींनी गोल्ड मैडल ची कमाई केलेली आहे तर३०ते ३४ किलो वजन वजन गटा मध्ये रणजीत परमेश्वर तोंडले व् ४० ते ४४ किलो वजन गटा मध्ये पृथ्वीराज भागवत तांगडे या मुलांना गोल्ड मैडल मिळाले आहे.
तसेच १४ वर्षाखालील मुलींमध्ये ४२ ते ४६ किलो वजन गटा मध्ये  कु.वैष्णवी रघुनाथ नाइकनवरे हिला व् ३० ते ३४किलो वजन गटा मध्ये ओमराज धनंजय खेडेकर व्३६ते४० किलो वजन गटा मध्ये अभिजीत शांताराम गूगले यांना गोल्ड मैडल मिळाले आहे.
त्याच बरोबर ३२ ते३६ किलो वजन गटा मध्ये सागर अर्जुन येलपले व् २८ ते ३२ किलो वजन गटा मध्ये श्रीहरी बाळु सुतार यांना सिल्वर मेडल मिळाले आहे.
    अशापद्धतीने नुकत्याच् मिळालेल्या स्कॉलर शीप व् नवोदय सारख्या  स्पर्धापरिक्षेच्या यशाबरोबर या  कराटे सारख्या अतिशय उपयुक्तअशा कराटे स्पर्धेत ही आदर्शच्या खेळाडु नी यश मिळवले आहे.
या यशासाठी लाखमोलाचे मार्गदर्शन लाभले ते म्हणजे शंकर तोंडले सरांचे.स्वत्: चैंपियन असलेल्या शंकर तोंडले सरांनी या मुलांसाठी अहोरात्र कष्ट घेऊन आदर्शचा दबदबा सिद्ध केला ,तसेच
या सर्व यशस्वी खेळाडूंचे व् शंकर सरांचे प्रशालेचे मुख्यध्यापक श्री एम्.डी. तोंडले सर व् सर्व शिक्षक  हार्दिक अभिनंदन केले

मराठा आंदोलनाला दलित महासंघाचे वतीने पाठिंबा

 पंढरपूर येथे सकल मराठा समाज क्रांती मोर्चा पंढरपूर तालुका यांच्या वतीने तहसील कार्यालय येथे सुरू असलेल्या  ठिय्या आंदोलनाला दलित महासंघाचे वतीने पाठिंबा देण्यात आला

यावेळी दलित महासंघाचे महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा मा.नगमाताई शिवपालक यानी ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन  दलित महासंघाच्या वतीने  उपस्थित मराठा बांधवांना पाठिंब्याचे पत्र दिले., यावेळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मा. वसंतराव देशमुख, पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील, श्रमीक मुक्तीदलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट,  बळिराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर, गोपाळ पाटील,  दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष मा.सतिश महापुरे , युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मा.मारूती नाईकनवरे व मराठा बांधव उपस्थित होते.

Saturday 4 August 2018

अनिल सोनवले अादर्श कोतवाल


.

पटवर्धन कुरोली, ता. पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथील अनिल सोपान सोनवले यांना २०१७-१८ या कालावधीत कोतवाल संवर्गात केलेल्या उत्कष्ठ सेवेबद्दल जिल्हाधिकारी महसूल विभाग  सोलापूर यांचेकडून अादर्श कोतवाल प्रशस्तीपत्रक देण्यात आले. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली १ अागस्ट रोजी सोलापूर येथे हे प्रशस्तीपत्रक देण्यात आले. यावेळी  पोलिस अायुक्त महादेव तांबडे,  सोलापूर मनपा आयुक्त अविनाश ढाकणे, डॉ राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर उपस्थित होते.  त्याना मिळालेल्या या प्रशस्तीपत्रका बद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...