Friday 22 September 2017

भोसे येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक

भोसे (क. ), 

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक  पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३० व्या जयंती निमित्त भोसे (ता. पंढरपूर)  येथील यशवंत माध्यमिक व् उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन गावातून मिरवणूक काढण्यात आली. 

सकाळी आठ वाजता विद्यालयाचे प्राचार्य एल. एम. कोरे , उपमुख्याध्यापक टी. के. शिंदे, पर्यवेक्षक एस. एस. जगदाळे, माजी मुख्याध्यापक नागनाथ काळे यांच्या हस्ते कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम , टिपरी नृत्य, बाल  नाटिका, ग्रंथ  दिंडी आदी उपक्रमांसह झाडे लावा, झाडे जगवा  हा संदेश ग्रामस्थांना दिला. समतेचा व मानवतेचा संदेश देणारी वारकऱ्यांच्या वेशातील आध्यात्मिक दिंडी काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी मेजर चांगदेव गावडे यांनी बैलगाडी, समाधान सरडे  आणि दशरथ गावडे यांनी ट्रकटर देऊन सहकार्य केल्याबद्दल प्राचार्य एल. एम. कोरे यांनी त्यांचे आभार मानले. मिरवणुकीच्या समारोपानंतर विध्यार्थ्यांना यशवंतभाऊ पाटील पतसंस्थेच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी उच्च माध्यमिक विभागाचे एस. डी. जाधव, एस. एन. सपाटे, के. सी. कोकणी,  पी. डी. घोडके, एम. एस. कारंडे, यु. एस. पावले, पी. आर. मोरे, आर. बी. मुलाणी, के. डी. शिंदे, एस. ए. शिंदे,  एम. व्ही.  भोसले,  डी. एन. अवघडे, [ई. एच. शेडगे, आर. एस. बनाळे , आर. एन. कनाके  यांनी परिश्रम घेतले.

भीमा नदीत 20,000 चा विसर्ग

भीमा नदीत 20,000 चा विसर्ग करण्यात आला अाहे..

उजनी धरण    108% झाले*

दौंडचा विसर्ग 31053

कालवा 1800
बोगदा ..600
विजनिर्मिती .1500
भीमा नदी..20,000

पोलिस पाटील आरक्षण सोडत जाहीर.


पंढरपूर दि. 22 :- पंढरपूर उपविभागातील  रिक्त असलेल्या  पोलीस पाटील पदांसाठी  आरक्षण सोडत सांस्कृतीक भवन, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे काढण्यात आली.  उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील 115 रिक्त पोलीस पाटील पदांपैकी 35 पदे महिलांसाठी आरक्षित झाली.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.विजय देशमुख, सहाय्यक पोलीस  अधिक्षक निखिल पिंगळे, मोहोळचे तहसिलदार अमित माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे,  पोलीस निरिक्षक विठ्ठल दबडे, पोलीस निरिक्षक राजेंद्र मस्के, नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे,  सहाय्यक पोलीस निरिक्षक घनश्याम बल्लाळ,  सहाय्यक पोलिस   निरिक्षक दिपक पाटील यांच्यासह नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
पंढरपुर उपविभागात अनुसुचित जातींसाठी 21, अनुसुचित जमातीसाठी 12, विशेष मागास प्रवर्गासाठी 4,भटक्या व विमुक्त जातीं (अ) साठी 5 , भटक्या व विमुक्त जातीं (ब) साठी 5 , इतर मागास प्रवार्गासाठी 20 जागा आरक्षित झाल्या असून,  48 जागा खुला प्रवर्ग असून एकूण् 115 पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
पंढरपूर उपविभागातील गांवनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे, –
अनुसुचित जातीसाठी-आव्हे, शेवते, विरवडे खु., शिंगोली, पळशी, भंटुबरे, जामगांव खु., मेंढापूर, शिरढोण, तिसंगी, सोनके, आंबेचिंचोली, वाघोली, कोंढारकी आणि येवती
अनुसुचित जाती-महिलांसाठी  शेजबाभुळगांव, खरसोळी, नेपतगांव, वडदेगांव, शेगांव दुमाल आणि सुस्ते, बोपले,  
अनुसूचित जमातीसाठी – वाघोलीवाडी, शंकरगांव, बादलकोट, आंबे, रोपळे, परमेश्वर पिंपरी, चिंचोली भोसे तर
अनुसूचित जमाती महिलांसाठी तरटगांव, मिरी, नारायण चिंचोली आणि तारापुर
विशेष मागास प्रवर्गसाठी पोफळी, बाभुळगांव, आणि नळी तर विशेष मागास प्रवर्ग महिलासांठी कान्हापुरी
भटक्या विमुक्त जाती-अ साठी लमाणतांडा, कोर्टी,देगांव
भटक्या विमुक्त जाती-अ महिलांसाठी गलंदवाडी आणि भंडीशेगांव
भटक्या जमाती-ब साठी,  सांगवी, जळोली, कोरवली
भटक्या जमाती-ब साठी महिलांसाठी उंबरे आणि सरकोली, या पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.
 इतर मागास प्रवर्गासाठी लोणारवाडी, भाळवणी, बार्डी, सिंध्देवाडी, फुलचिंचोली, मगरवाडी, गार्डी, नांदोरे, पट.कुरोली, अनवली, वाखरी, मोरवंची, उपरी आणि विटे
इतर मागास प्रवर्गासाठी महिलांसाठी खेडभोसे, कामती खु., खंडाळी, ओझेवाडी, पेहे आणि पांढरेवाडी  
 खुला प्रवर्गासाठी   मुंढेवाडी (मोहोळ), जाधववाडी, चिलाईवाडी, वाडीकुरोली, डिकसळ, खंडोबाची वाडी, सिध्देवाडी, पिरटाकळी, अरबळी, पुळूजवाडी, शेळवे, भांबेवाडी, एकलासपुर, पिराचीकुरोली, हिंगणी (नि.), खेडभाळवणी, अजनसोंड, तावशी, कासेगांव, शेटफळ, आढीव, इसबावी, औंढी, बोहाळी,  होळे बु.,कातेवाडी, नेमतवाडी, तरडगांव(का.), करोळे, शेंडगेवाडी, सावळेश्वर, कोंबडवाडी, तनाळी आणि ईश्वरवठार
खुला प्रवर्ग   महिलांसाठी  जैनवाडी, देवडे, मुंढेवाडी (पंढरपूर), वाळूज, चिचोंबे, तुगंत, मनगोळी, पुळूज, पोखरापुर, टाकळी, खरातवाडी, कौठाळी, डोक बाभुळगांव आणि खर्डी (खुला प्रवर्ग),
 या पध्दतीने पोलीस पाटील पदासाठी आरक्षण  सोडत जाहीर करण्यात आली. या आरक्षणाची सोडत तेजस सुनिल पवार व महेश रविंद्र फुले या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रांत कार्यालयातील  मनोज श्रोत्री यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Thursday 21 September 2017

उजनीतून विसर्ग केला कमी

उजनी धरणामधुन भिमा नदीत रात्री पासून असणारा ८०,००० चा विसर्ग कमी करण्यात आला असून आज सकाळ सहा च्या आकडेवारी नुसार भीमा नदीत ६०,००० चा विसर्ग करण्यात आला अाहे..
भीमा नदीत  पुन्हा 60,000चा विसर्ग
*अखेर उजनी धरण    109% झाले*
 ..........वीरमधुन नीरेत 7196 विसर्ग
दौंडचा विसर्ग 34688

 *बंडगार्डन येथुन विसर्ग घटला
22/09/2017
सकाळी 6.00 वा.
*एकूण पाणीपातळी *  497.200मी.
*ए.पाणीपातळी*...  3463.36                दलघमी (121.68T.M.C)
*उपयुक्त पाणीपातळी*..-+1643.060                       दलघमी (58.02T,M.C)
*टक्केवारी ..+108.31%* %

*विसर्ग* ....
......दौंड .34688क्युसेक
कालवा 2000
बोगदा ..600
विजनिर्मिती .1500
भीमा नदी..60,000

पटवर्धन कुरोली बंधारा पुन्हा पाण्याखाली

उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे.

उजनी तुन ८०,००० चा भीमा नदीत विसर्ग

.
भीमा नदीत  पुन्हा 80,000चा विसर्ग
*अखेर उजनी धरण    110% झाले*
 ..........वीरमधुन नीरेत 7196 विसर्ग
दौंडचा विसर्ग 56284

 *बंडगार्डन येथुन विसर्ग घटला
21/09/2017
सायं6.00 वा.
*एकूण पाणीपातळी *  497.250मी.
*ए.पाणीपातळी*...  3463.36                दलघमी (122.66T.M.C)
*उपयुक्त पाणीपातळी*..-+1660.060                       दलघमी (59.03T,M.C)
*टक्केवारी ..+109.45%* %

*विसर्ग* ....
......दौंड .56284क्युसेक
...बंडगार्डन .13116 क्युसेक
कालवा 2000
बोगदा ..600
विजनिर्मिती .1500
भीमा नदी..80,000
वरील 13 धरणातुन 24000 विसर्ग  सोडला आहे.

पांडुरंग कारखाना दिवाळी साठी १०१ चा हप्ता

श्री पांडुरंग सह सा कारखाना श्रीपूर दिवाळी साठी १०१ रू हप्ता देणार - श्री सुधाकरपंत परीचारक.                                                                                                                    श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा सन२०१७ -१८ बाँयलर अग्न्निप्रदिपन कार्यक्रम पांडुरंग परिवाराचे सर्वसर्वा श्रीमंत सुधाकरपंत परिचारक (मालक) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री वंसतनाना देशमुख साहेब युवानेते प्रणव मालक कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक श्री यशवंत कुलकर्णी साहेब सर्व संचालक मंडळ व्ही एस आय चे ऊस विकास आधिकारी, परिसरातील नेते मंडळी सर्व प्रतिष्ठित नागरिक सभासद शेतकरी सर्व खाते प्रमुख बँकेचे आधिका व सर्व कामगार बंधू उपस्थित होते

उजनीतुन भीमा नदीत ६०,०००. चा विसर्ग

.
भीमा नदीत  पुन्हा 60,000चा विसर्ग
*अखेर उजनी धरण    110% झाले*
 ..........वीरमधुन नीरेत 7196 विसर्ग
दौंडचा विसर्ग 56284

 *बंडगार्डन येथुन विसर्ग घटला
21/09/2017
सायं6.00 वा.
*एकूण पाणीपातळी *  497.250मी.
*ए.पाणीपातळी*...  3463.36                दलघमी (122.66T.M.C)
*उपयुक्त पाणीपातळी*..-+1660.060                       दलघमी (59.03T,M.C)
*टक्केवारी ..+109.45%* %

*विसर्ग* ....
......दौंड .56284क्युसेक
...बंडगार्डन .13116 क्युसेक
कालवा 2000
बोगदा ..600
विजनिर्मिती .1500
भीमा नदी..60,000
वरील 13 धरणातुन 24000 विसर्ग  सोडला आहे.

निराधार आज्जीला मिळाली मायेची उब

पटवर्धन कुरोली, ता. २१: पंढरपूर येथील बसस्थानकावर तीन दिवसांपासून पडून असलेल्या निराधार आजीच्या मदतीला कॉलेजमधील काही तरुण आले. त्यांनी त्या आजीला शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करून मायेची उब मिळवून दिली.
पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील बरीच मुले पंढरपूर येथे शिक्षणासाठी जातात. एस. टी. चा पास असल्याने दररोज त्या मुलांना एस. टी. नेच प्रवास करावा लागतो. नेहमी प्रमाणे ही मुले गावाकडे जायला निघाली असताना त्यांना बसस्थानकावर तीन दिवसांपासून पडून असलेली एक वृद्ध महिला दिसली. दोन दिवसांपासून त्यांना ती वयोवृद्ध आजी दिसत होती. परंतु तिच्याकडे सर्व प्रवाशांप्रमाणे यांनीही दुर्लक्षच केले होते. परंतु त्यांनी आज त्या आजीची विचारपूस करायचे ठरवले. त्यावेळेस त्या आजीकडे असणाऱ्या आधार कार्ड वरून तिचे नाव मालन शामराव जगताप, अर्जुन सिंह नगर, माळेवाडी, अकलूज (ता. माळशिरस) असल्याचे मुलांना समजले. मुलांनी त्या आजीला विचारले असता, मुलगा पुणे येथे नोकरीला असून मुलानेच येथे सोडले असल्याचे त्यांनी सांगितले. दोन – तीन दिवसांपासून पोटात काही नसल्याने त्या आजीच्या तोंडातून शब्दही निघत नव्हते. या मुलांनी पाणी, चहा, बिस्कीट आणून त्या आजीला दिले. त्यांनतर या विद्यार्थ्यांनी बस स्थानकावर असलेल्या अधिकाऱ्याला याविषयी माहिती दिली. त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली परंतु त्यापुढे त्यांनी कोणतेही पाऊल उचलत नाहीत हे लक्षात येताच स्वप्नील राऊत या विध्यार्थ्याने स्लाईस फौंडेशनच्या माध्यमातून निराधारांना आधार देणाऱ्या योगेश मालखरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी संपर्क न झाल्याने १०८ या टोल फ्री वर फोन लावून सदराची माहिती त्यांना दिली. त्यानंतर अवघ्या दहाच मिनिटात शासकीय रुग्णवाहिका त्या ठिकाणी आली. रुग्णवाहिका पाहताच बघ्यांची गर्दी वाढू लागली. या युवकांनी त्या आजीला रुग्णवाहिकेत बसवून शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता पाठवून दिले.
एका निराधार असलेल्या आजीला कर्मवीर भाऊराव पाटील महाविध्यालयातील प्रवीण गोसावी, सचिन नाईकनवरे, बालाजी उपासे, महेश उपासे, गणेश पाटील, जगदीश डावरे, शहाजी नाईकनवरे, रोहित उपासे, स्वप्नील राऊत, राहूल नाईकनवरे, मृणाल मगर, समाधान पाटील, कुणाल वाघमारे यांनी दिलदारपणा दाखत वेळेवर मदत मिळवून दिल्याबद्दल या विध्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Wednesday 20 September 2017

अखेर उजनी धरण झाले ११०₹

.
भीमा नदीत  पुन्हा 40,000चा विसर्ग
*अखेर उजनी धरण    110% झाले*
 ..........वीरमधुन नीरेत 17908 विसर्ग
दौंडचा विसर्ग 8398

 *बंडगार्डन येथुन विसर्ग वाढला
20/09/2017
सायं8.00 वा.
*एकूण पाणीपातळी *  497.095मी.
*ए.पाणीपातळी*...  3409.88                 दलघमी (122.66T.M.C)
*उपयुक्त पाणीपातळी*..-+1607.060                       दलघमी (59.03T,M.C)
*टक्केवारी ..+105.92%* %

*विसर्ग* ....
......दौंड .8398क्युसेक
...बंडगार्डन .30943 क्युसेक
कालवा 2000
बोगदा ..600
विजनिर्मिती .1500
भीमा नदी..40,000
वरील 13 धरणातुन 40,000 विसर्ग  सोडला)

Tuesday 19 September 2017

भीमा नदीत ४०००० चा विसर्ग सुरू


 उजनी धरणातुन भीमा नदीत  पुन्हा 40,000चा विसर्ग सुरू करण्यात आला असुन वीरमधुन नीरेत 22000 विसर्ग करण्यात आला आहे.
दौंडचा विसर्ग 6300

 *बंडगार्डन येथुन विसर्ग वाढला
20/09/2017
स 10.00 वा.
*एकूण पाणीपातळी *  497.230मी.
*ए.पाणीपातळी*...  3456.42                  दलघमी (122.66T.M.C)
*उपयुक्त पाणीपातळी*..-+1653.61                       दलघमी (59.03T,M.C)
*टक्केवारी ..+108.99%* %

*विसर्ग* ....
......दौंड .6300क्युसेक
...बंडगार्डन .31877 क्युसेक
कालवा 2000
बोगदा ..600
विजनिर्मिती .1500
भीमा नदी..40,000

Sunday 17 September 2017

एस.पी.च्या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

           
जिल्हास्तरीय तायक्वान्दो स्पर्धेत एस.पी. पब्लिक स्कूलचे यश                           महाराष्ट्र राज्य क्रिडा विभागामार्फत दि. 16 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तायक्वान्दो स्पर्धेमध्ये एस .पी. पब्लिक स्कूल नांदोरेच्या 3 विदयार्थ्यांनी विविध वजन गटातून जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला .         यामध्ये27 ते 29 किलो वजन गटातून तेजस वसंत भिंगारे ( प्रथम ), 29 ते 32 किलो वजन गटातून संकेत विठ्ठल सातुरे (प्रथम ) , 32 ते 35 किलो वजन गटातून प्रितम चांगदेव करांडे ( प्रथम ) तसेच 35 ते 38 किलो वजन गटातून संग्राम रघुनाथ जगताप ( द्वितीय ) क्रमांक मिळवून यश संपादन केले.                                   यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ.संतोष वलगे , तालुका क्रिडा अधिकारी दत्ता सांगनुरे, केंद्र प्रमुख रं.ना. घोडके, शाळा विकास समितीचे अध्यक्ष युवराज सातुरे, उपाध्यक्ष आण्णासाहेब पवार , ज्ञानराज क्रिडा मंडळ बोंडलेचे अध्यक्ष  दत्तात्रय पवार,संस्थेचे सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे, सहसचिव बाळासाो चव्हाण, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका   स्वाती चव्हाण, शाळा विकास समितीचे सर्व सदस्य, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी केले.

Friday 15 September 2017

वीर धरणातून विसर्ग केला बंद

वीर धरणातुन निरा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग बंद करण्यात आहे त्यामुळे  नदीची पूर परिस्थिती टळली आहे. तसेच उजनीतील सुरु असलेला 70 हजार क्यूसेक्सचा  पहाटे चार वाजता कमी करून दहा हजार क्यसेक्स करण्यात आला होता. सकाळी सात वाजल्यापासून           विसर्ग कमी करून तो आता फक्त 5 हजार क्यूसेक्स.इतका करण्यात आला आहे
दुपारनंतर चंद्रभागेचे पाणी ओसरणार यामूळे भीमा नदी काठच्या लोकांना दिलासा मिळणार आहे.

उजनी तून भीमा नदीतील विसर्ग केला कमी

उजनीतुन भीमेत सोडलेला विसर्ग कमी केला ,70,हजारावरुन तो 10 हजार केला होता ,सकाळी 7 ला तो आणखी कमी करुन *फक्त 2 हजार ठेवणार आहेत*
.तर दौंड चा पण कमी होउन 9951 क्युसेक झाला आहे.
ईसकाळ साठी अपडेट

उजनी तुन 70 हजार क्युसेक्सचा विसर्ग

♦ _उजनी धरण पाणी पातळी_♦

 *भीमेत ७० हजार क्युसेक्सचा विसर्ग*

15 सप्टेंबर 2017    सायं.  6:00 वा.

पाणी पातळी : 497.210 मी.

एकूण साठा : 3449.48 दलघमी.

उपयुक्त साठा :  1646.67 दलघमी.

टक्केवारी : 108.53 %


दौंड विसर्ग : 28,936 क्युसेक्स

बंडगार्डन विसर्ग : 3,280 क्युसेक्स

कालवा विसर्ग : 2,000 क्युसेक्स

सांडवा (नदी) विसर्ग : 70,000 क्युसेक्स

वीजनिर्मिती : 1,500 क्युसेक्स

बोगदा : 600 क्य

Thursday 14 September 2017

पटवर्धन कुरोली बंधारा पाण्याखाली


उजनी तुन ७० हजार क्युसेक्सचा विसर्ग

♦ _उजनी धरण पाणी पातळी_♦

 *भीमेत ७० हजार क्युसेक्सचा विसर्ग*

15 सप्टेंबर 2017    सकाळी  8:00 वा.


पाणी पातळी : 497.230 मी.

एकूण साठा : 3456.42 दलघमी.

उपयुक्त साठा :  1653.61 दलघमी.

टक्केवारी : 108.99 %


दौंड विसर्ग : 42,345 क्युसेक्स

बंडगार्डन विसर्ग : 3,280 क्युसेक्स

कालवा विसर्ग : 2,000 क्युसेक्स

सांडवा (नदी) विसर्ग : 70,000 क्युसेक्स

वीजनिर्मिती : 1,500 क्युसेक्स

बोगदा : 600 क्युसेक्स


उजनी तुन भीमा नदीत पन्नास हजार क्युसेस विसर्ग


इंदापूर : उजनी धरणातून भिमानदीत विसर्ग वाढवला.

 सायंकाळी साडे अाठ वाजता पन्नास हजार क्यूसेस ने  भीमा नदीत सोडला विसर्ग.

नदी काठच्या लोकांना सावधानतेचा इशारा.

भीमा नदीत दोनजण वाहून गेले

मुंढेवाडी ते अजनसोंड दरम्यान भीमा नदीवर असलेल्या बंधार्‍यावरून निघालेले पतिपत्नी वाहून गेले आहेत. गुरूवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून पोलीसांनी मदत व शोध मोहिम हाती घेतली आहे.
 सुरेश विष्णू बनकर आणि वंदना सुरेश बनकर अशी वाहून गेलेल्या पती पत्नीची नावे आहेत.
उजनी धरणातून 40 हजार क्युसेक्सचा विसर्ग भीमा नदीला सोडला असल्यामुळे भीमा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. मुंढेवाडी येथील बंधार्‍यावर सुमारे दिड ते दोन फुट पाणी असतानाही सुरेश आणि वंदना बनकर हे पती पत्नी मोटार सायकलवरून नदी पार करण्याच्या प्रयत्नात असताना वाहून गेले आहेत. गुरूवारी सायंकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली आहे.
बनकर पतिपत्नी कडलास रोड सांगोला येथील रहिवासी आहेत. फुलचिंचोली ता पंढरपूर येथील वंदनाच्या आजारी मावशीला भेटण्यासाठी ते दोघे गेले होते, तेथून परत येत असताना अनवली ता पंढरपूर येथील वंदनाच्या माहेरी मुक्काम करण्याच्या हेतूने भीमा नदीवरील मुंढे वाडीच्या बांधाऱ्यावरून येत असताना ते वाहून गेले.
अजनसोंडच्या बाजुने मुंढेवाडी येथील बंधार्‍यावर आल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या स्थानिक लोकांनी त्यांना बंधार्‍यावरून पाणी वाहत असून पाण्याला वेग आहे. त्यामुळे तुम्ही जाऊ नका अशी सुचना केली होती. मात्र आम्हाला अनवली ( ता.पंढरपूर) येथे तातडीने जायचे आहे असे सांगून बंधार्‍यावरून जाण्यासाठी मोटार सायकल तशीच पुढे दामटली. बंधार्‍यावर थोडे पुढे गेल्यानंतर पाण्याच्या वेगामुळे मोटार सायकलसह दोघेही जण वाहून गेल्याचे प्रत्यक्ष घटना पाहणार्‍या लोकांनी सांगीतले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पंढरपूर तालुका पोलीस आणि महसुल विभागाकडे संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहीती दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली तर महसुल विभागाने तातडीने  मदत आणि शोध मोहिम हाती घेतली आहे.

-----------------------------------------

मदत आणि शोध मोहिम सुरू केली आहे

 मुंढेवाडी येथील बंधार्‍यावरून मोटार सायकलसह एक पुरूष आणि एक महिला वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस घटनास्थळी गेलेले आहेत आणि जीव रक्षक यंत्रणा मागवली असून मदत आणि शोध मोहिम हाती घेतलेली आहे.

- मधूसूदन बर्गे

तहसीलदार, पंढरपूर

भीमा नदीच्या विसर्गात वाढ

पुणे जिल्ह्यातील  काही धरणांमधून १५ हजार ४६ क्युसेस विसर्ग सोडण्यात आलेला आहे. यामुळे उजनी धरणात दौंड येथून येणाऱ्या विसर्गातही वाढ झालेली आहे. परिणामी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या पाण्यामध्ये आज दुपारी ४.३० वाजल्यापासून वाढ करण्यात आलेली आहे. ३० हजार क्युसेसने सोडण्यात येत असलेला विसर्ग वाढवून ४० हजार क्युसेस एवढा करण्यात आलेला आहे.

सुरेश दबडे यांची तालुकाध्यक्षपदी निवड

अाव्हे (ता.पंढरपूर) येथील सुरेश विठ्ठल दबडे यांची प्रहार संघटना प्रणित अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी तर तारापूर (ता.पंढरपूर) येथील सुदाम परमेश्वर पाटील यांची तालुका उपाध्यक्ष म्हणून तर गणेश प्रल्हाद ननवरे यांची पंढरपूर शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संस्थापक बच्चू कडू यांच्या हस्ते निवडीचे पत्रे देण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष विठ्ठल कोरके, जिल्हा सरचिटणीस संजय जगताप यांच्या सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

Wednesday 13 September 2017

भीमा नदीच्या विसर्गात घट

उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग कमी करण्यात आला असून दुपारी तीस हजार क्युसेक्स ने पाणी सोडण्यात येत होते.  त्यामध्ये कपात करून विसर्ग पाच हजार करण्यात आला आहे.

लग्नाचे अामिष दाखवून प्रेमसंबंध; त्रासाला कंटाळून युवतीने संपवले जीवन

सोलापूर -वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. अाई मुंबईत केअरटेकर म्हणून कामाला. अाजीकडे एक बहीण भावासोबत राहत होती. गल्लीतीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. लग्नाचे अामिष दाखवून लग्न करता मानसिक त्रास दिल्यामुळे तरुणीने घरी गळफास घेऊन अात्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार एनजी मिल चाळ, मुरारजी पेठ येथे घडला अाहे. प्रीती दत्तात्रय कदरकर (वय २२, रा. एनजी मिल चाळ, सोलापूर) असे मृत तरुणीचे नाव अाहे.
शैलेश ऊर्फ बाॅबी शामराव खुळे (वय ३२, रा. एनजी मिल चाळ, सोलापूर) याला अटक झाली अाहे. तरुणीची अाई वैशाली दत्तात्रय कदरकर (रा. ग्रॅण्ट रोड, मुंबई, मूळ गाव सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिली अाहे. वैशाली या मुंबईत राहतात. एका घरात त्या ज्येष्ठ महिलेची काळजी घेण्यासाठी केअरटेकर म्हणून काम करतात. दोन मुली एक मुलगा सोलापुरात अाजीकडे राहतात. मृत प्रीती या एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या. काॅलनीत राहणाऱ्या खुळे या तरुणासोबत काही महिन्यापासून तिचे प्रेमसंबंध जुळले. लग्नाचा तगादा लावल्यानंतर तो लग्न करता मानसिक शारीरिक त्रास देत होता. सोमवारी रात्री प्रीतीने घरी गळफास घेऊन अात्महत्या केली. या घटनेला खुळे हाच जबाबदार अाहे म्हणून अाईने तक्रार दिली अाहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक रमेश चिंताकिंदी यांना विचारले असता, दोघांमध्ये काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. लग्नाचे अामिष दाखवत होता. पण, लग्न काही करून घेतला नाही. संशयित खुळेला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली अाहे.

यमाईदेवी मंदिराचा बारव ढासळला

माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग येथील यमाईदेवी मंदिरासमोरील बारव ढासळला असून, त्याच्याजवळ असलेली जुनी पुरातन दीपमाळा पडण्याच्या मार्गावर आहे. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे मंदिरासमोरील जुन्या वास्तूला धोका निर्माण झाला आहे.
म्हाळुंगमधील यमाईदेवी मंदिराचे बांधकाम प्राचीन आहे. या मंदिराचा सर्व ताबा केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडे आहे. येथील ग्रामपंचायतीला कोणताही अधिकार नाही. साधी डागडुजी करायची असेल तर पुरातत्व खात्याची परवानगी घ्यावी लागते. यमाईदेवी मंदिरात नवरात्रीत सलग नऊ दिवस मोठा जागर असतो़ अनेक भाविक नऊ दिवस मंदिर परिसरात राहतात़ देवीची पूजाअर्चा करतात, पण जे भाविक नऊ दिवस उपवास करीत मंदिर परिसरात राहतात, त्यांची राहण्याची सोय व्यवस्थित नाही़ ऊन, वारा, पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून भक्तनिवास नाही.
गेल्या दोन वर्षांपासून थोडा-थोडा ढासळत असलेला बारव दुरूस्तीसाठी पुरातत्व विभागाकडे पत्रव्यवहार केला़ तसेच गेल्यावर्षी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यामार्फत दिल्ली येथे पुरातत्व खात्याचे मंत्री डॉ. महेश शर्मा यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले होते़ पण एक वर्ष झाले तरी कोणतीही दुरूस्ती करण्यात आलेली नाही़ गावकºयांच्या वतीने म्हाळुंग ग्रामसभेचा ठराव करण्यात आला़ त्यामध्ये बारव (विहीर) दुरूस्ती करणे, दीपमाळा दुरूस्ती, भक्तनिवास बांधणे, मंदिराभोवती फरशा बसविणे, बैठक व्यवस्था, प्रवेशद्वार यांचा समावेश करून पुरातत्व विभाग मुंबई व दिल्ली येथे दिले आहे़

उजनी धरणातून भीमा नदीत तीस हजाराचा विसर्ग वाढवण्यास सुरुवात

उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे यामुळे उजनी धरणातून यावर्षी सलग तिसऱ्यांदा पाणी भीमा नदीपात्रात सोडण्याची वेळ आलेली आहे. दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारा विसर्ग जरी कमी असला तरीही उजनी धरणाच्या  क्षेत्रात झालेल्या पावसामुळे उजनी धरणातून या वर्षी दोन वेळा पाणी भीमा नदीपात्रात सोडण्याची वेळ आलेली आहे.
उजनी धरणाच्या क्षेत्रात मागील आठवड्यापासून चालू असलेल्या पावसामुळे पाणी सोडण्यात येत आहे. आज दुपारी १२ वाजे पर्यंत  उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडला जाणारा पाण्याचा विसर्ग  ५ हजार क्युसेक्‍स एवढा होता. यामध्ये दुपारी १२ वाजता वाढ करून तो १५ हजार क्युसेक्‍स एवढा करण्यात आला, तर आज दुपारी २.३० वा यामध्ये वाढ करून तो ३० हजार क्युसेस एवढा करण्यात आलेला आहे.
उजनी अपडेट 
दि.१३ सप्टेंबर२०१७ ,  दुपारी.४ वा.  पाणी पातळी :  ४९७.२७५ मी.
एकूण साठा  :  ३४७२.०४ द.ल.घ.मी. 
उपयुक्त साठा : १६६९.२३ द.ल.घ.मी. टक्केवारी :  ११०. ०२%. 
मुख्य कालवा : २००० क्युसेक्‍स.
बोगदा  : ६०० क्युसेस.
वीज निर्मिती : १५०० क्युसेक्‍स.
भिमा नदी सांडवा : ३००००क्युसेक्‍स

आश्‍वासने न पाळल्याने सत्तेतून बाहेर : खा. शेट्टी

राज्यात आणि देशात भाजपला सत्तेपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकरी संघटनांची मोठी मदत झाली असून निवडणुकीपूर्वी त्यांनी दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. यामध्ये मोदींना शेतीविषयीचे अज्ञान असावे किंवा त्यांनी आम्हाला फसवून सत्ता मिळविण्याचा डाव साधला असावा, अशी आमची आता खात्री पडली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी आम्ही सत्तेतून बाहेर पडलो असून यापुढे तीव्र आंदोलने करून सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी दिला आहे.
मंगळवारी खा. राजू शेट्टी सोलापूर दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविंद्र तुपकर, विभागीय अध्यक्ष प्रकाश भालवडकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोफळे, विद्यार्थी संघटनेचे अमोल हिप्परगे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारवर निशाणा साधला. निवडणुकीपूर्वी शेतकरी संघटनेने काही अटी व शर्ती घातल्या होत्या. यामध्ये उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव कृषी मालाला मिळावा तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात आणि शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशा मागण्या मान्य करण्याच्या अटीवर शेतकरी संघटना राज्यात आणि केंद्रात सत्तेत सहभागी झाली होती. मात्र यापैकी कोणतेच आश्‍वासन शासनाने पाळले नाही. त्यामुळे शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडली असल्याची जाहीर कबुली शेट्टी यांनी दिली. शेतीविषयीची पुरेपूर माहिती मोदी सरकारला नाही. त्यामुळे ते असंवेदनशीलपणाने वागत असून याचे विपरित परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा शेट्टी यांनी दिला. 
राज्य शासनाने 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचा कांगावा सुरू केला असला तरी अद्यापही शासनाकडे बिनचूक माहिती उपलब्ध नाही तसेच निकष आणि अटी घालून अनेक शेतकर्‍यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा घाट शासनाने घातला आहे. दुसरीकडे अशिक्षित शेतकर्‍यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवून त्यांची कुचेष्टा केली आहे. दुसरीकडे ई-सेवा केंद्रांमध्ये शेतकर्‍यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये खरिपासाठी खूपच कमी कर्जवाटप झाले आहे. त्यामुळे सहकारमंत्र्यांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन रब्बी हंगामात तरी हा कर्जवाटपाचा टक्का वाढवावा, असा सल्ला शेट्टी यांनी दिला आहे.

Tuesday 12 September 2017

तायक्वान्दो स्पर्धेत एस.पी.चा दबदबा कायम

एस.पी.च्या सात विद्यार्थ्यांची जिल्ह्यासाठी निवड                               महाराष्ट्र राज्य क्रिडा विभागाअंतर्गत पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय तायक्वान्दो स्पर्धेमध्ये एस.पी. पब्लिक स्कूल , नांदोरेच्या  7 विद्यार्थ्यांनी विविध वजन गटातून तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून  16 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धासाठी निवड निश्चित करुन घवघवीत यश संपादन केले. यामध्ये 24ते 26 किलो वजन गटातून  वैष्णवी पांडूरंग पवार  (प्रथम), 29 ते 32 गटातून अनुजा अनंत गायकवाड (प्रथम) , 27 ते 29 किलो गटातून तेजस वसंत भिंगारे (प्रथम ) , 29 ते  32 किलो गटातून संकेत विठ्ठल सातुरे ( प्रथम ) , 32 ते 35 किलो गटातून प्रितम चांगदेव करांडे ( प्रथम ) ,35 ते 38किलो  गटातून संग्राम रघुनाथ जगताप ( प्रथम ),30 ते 35 किलो गटातून अभिषेक आप्पासाो भिंगारे ( प्रथम ), तर 25 ते 27 किलो गटातून रोहन अनिल भिंगारे (व्दितीय ), 27 ते 29 किलो गटातून रणजित दत्तात्रय भिंगारे  (व्दितीय ), 35 ते 38 किलो गटातून सोहम दादासाो पाटील ( द्वितीय ), 29 ते 32 किलो गटातून स्नेहल यशवंत जाधव( द्वितीय ), या विदयार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले.सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे  अभिनंदन संस्थेचे मार्गदर्शक डॉ.एन.बी. होनराव, संस्थेचे अध्यक्ष डॉ .संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, सहसचिव बाळासाो चव्हाण, खजिनदार विक्रम भिंगारे, प्रकल्प संचालिका वासंतीे वलगे , मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, तसेच सर्व शिक्षक यांनी केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.यशस्वी विदयार्थ्यांना कराटे प्रशिक्षक दिपक माने सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.ळी तसेच सर्व शिक्षक यांनी केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.यशस्वी विदयार्थ्यांना कराटे प्रशिक्षक दिपक माने सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Monday 11 September 2017

मुख्यमंत्री फडणवीस बँकांचे एजंट; कर्जमाफी बोगस; आ. कडू यांचा शेतकरी मेळाव्‍यात घणाघात

अक्कलकोट- राज्य शासनाने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ बोगस असून मुख्यमंत्री बँकांचे एजंट आहेत. या कर्जमाफीत “माफी कमी, वसुली जास्त’ आहे, असा घणाघाती आरोप अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी मेळाव्यात बोलताना गुरुवारी केला.
चुंगी (ता. अक्कलकोट) येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. कडू म्हणाले, कर्जमाफी योजनेत केवळ छत्रपतींच्या नावाचा वापर झाला आहे. प्रत्यक्षात तसे काही नाही. केवळ दीड लाखांची कर्जमाफी करून सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे.

याचा फायदा बँकांना होणार आहे. सरकारला शेतकऱ्यांचा इतका कळवळा असेल तर २०१६-१७ ची कर्जमाफी का केली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज चार लाख असेल तर त्याला सरळ सरळ दीड लाख माफ नाहीत. त्यासाठी त्याला आधी अडीच लाख भरावे लागतात. मग ही कसली माफी ? ही तर वसुली. मुख्यमंत्री फडणवीस हे बँकांचे एजंट आहेत, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. गेल्या ७० वर्षांत केवळ सत्ता बदलली. प्रश्न जैसे थे आहेत. हे सरकार उद्योगपतींबाबत फायदेशीर निर्णय घेते. मुंबई-नागपूर, मुंबई-गुजरात मेट्रोसाठी कोट्यवधी खर्च होतात, मग शेतकऱ्यांसाठीच अटी का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशात, राज्यात धर्म-जातीचे गुलाम झालेले अनेक लोक आहेत, पण तुम्ही कुणाचेही गुलाम होऊ नका, स्वाभिमानाने जगा. आता ही सगळी व्यवस्था बदलण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रस्तावित नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावरही आमदार कडू यांनी टीका केली. शेतकऱ्यांना देशोधडीला लावून उद्योगपतींचा फायदा करण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आराेपही त्यांनी केला.

अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर-19 संघात निवड

मुंबई, दि. 11-  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबई अंडर-19 संघात निवड झाली आहे. 17 वर्षीय अर्जुन तेंडुलकर जे.वाय लेले इंडिया इन्व्हिटेशनल वन डे स्पर्धेत मुंबईकडून खेळणार आहे. याआधी अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील संघातून खेळला आहे. आता तो मुंबईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघातून खेळणार आहे. या संघात निवड होणे ही अर्जुन तेंडुलकरसाठी महत्त्वाची संधी आहे
बडोद्यात 16 ते 23 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी अर्जुन मुंबईच्या चौदा वर्षांखालील आणि सोळा वर्षांखालील संघाकडून खेळला आहे.

अर्जुनने फेकलेल्या यॉर्करमुळे इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरेस्टोच्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे बेअरेस्टोला क्रिझ सोडून जावं लागलं होतं. लॉर्ड्सजवळच सचिन तेंडुलकरने एक घर घेतलं आहे. त्यामुळे जलदगती गोलंदाज अर्जुनला इंग्लंड टीमसोबत सराव करण्याची संधी मिळते.
मुंबई अंडर-19 संघात या खेळाडुंचा समावेश
अग्नी चोप्रा, दिव्यांश सक्सेना, भूपेन लालवानी, अंजदीप लाड, सागर चबेरिया, शोएब खान, सत्यलक्ष्य जैन, वेदांत मुरकर, ध्रुव ब्रिड, तानुश कोटियन, नकुल मेहता, फरहान काजी, अथर्व अंकोलेकर, अभिमन्यू वशिष्ठ, अर्जुन तेंडुलकर, सक्षम पाराशर, सक्षम झा, सिल्वेस्टर डिसुजा.
 

बसचालक व वाहकाला पिस्तूल दाखवून प्रवाशाचे अपहरण


करमाळा
प्रवाशी वाहतूक करणा-या करमाळा आगारातील बसचालक व वाहकाला पिस्तूल लाऊन बसमधील एका प्रवाशाचे अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. एस.पी. गुजांळ असे अपहरण झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ही घटना करमाळा कुर्डुवाडी रस्त्यावर आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, सकाळी कुर्डुवाडीवरून करमाळ्याकडे ही बस येत असताना प्रवाशी घेण्यासाठी बस थाबंली असता पाठीमागुन डस्टर वाहन (एमएच १३ ए एन ७८३९) व दुसरे वाहन इनिव्हा (एम एच १२, पुर्ण क्रमांक नाही) मधुन आलेल्या ८ ते १० लोकांनी सिनेस्टाईल इन्ट्री करत समोरून बी.एस. तळेकर चालकाला तर मागे वाहक एम.बी. पवार याच्या कानाला पिस्तूल लाऊन धाक दाखवत बसमधून प्रवास करत असलेल्या गुजांळला ताब्यात घेऊन वाहनातून निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थानी घटनास्थळी गर्दी केली असून करमाळा पोलीसही दाखल झाले आहेत.
दरम्यान, ही कारवाई कर्नाटक पोलीसांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. याची माहिती कुर्डुवाडी पोलीसांना कर्नाटक पोलिसांनी दिल्याचे कळते. करमाळा पोलीसांकडे मात्र याची माहिती नाही. पोलीसांनी चालक-वाहकांनी अडथळा करू नये म्हणून पिस्तूल दाखवल्याचे बोलले जात आहे. याला आगार प्रमुख संजय भोसले यांनीही दुजोरा दिला आहे. दरम्यान अपहरणकर्त्याची ओळख न पटल्याने अपहरणाचीच मोठी चर्चा चालु आहे.

Sunday 10 September 2017

टिकेनंतर मेधा खोले यांनी तक्रार मागे घेतली

जात लपवून श्राद्ध विधीसाठी सोवळ्यातील स्वयंपाक केला म्हणून डॉ मेघा खोले यांनी केलेली तक्रार अखेर मागे घेतली.
पुणे- जात लपवून श्राद्ध विधीसाठी सोवळ्यातील स्वयंपाक केला म्हणून डॉ मेघा खोले यांनी एका स्वयंपाकी महिलेच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. चहुबाजूच्या टीकेनंतर डॉ मेघा खोले यांनी आपली तक्रार मागे घेतली.
डॉ. खोले यांच्या घरी काही धार्मिक कार्यासाठी ‘सोवळ्यातील’ स्वयंपाक करणारी सुवासिनी असलेली ब्राह्मण स्त्री हवी होती. २०१६ मध्ये मे महिन्यात त्यांच्याकडे निर्मला कुलकर्णी नावाची एक स्त्री आली होती. देवाच्या कार्यक्रमाचे स्वयंपाक करते असे सांगितले होते.
तिच्या माहितीवरुन खोले यांनी प्रत्यक्ष धायरी येथील तिच्या घरी जाऊन चौकशी करून त्या ब्राह्मण आहेत की नाही याची खात्री केली. त्यानंतर लगेचच निर्मला यांना घरच्या धार्मिक कार्याच्या स्वयंपाकासाठी बोलावले. दोन वर्षात त्यांनी एकूण सहा वेळा खोले यांच्या घरी स्वयंपाक केला.
दरम्यान, निर्मला या ब्राह्मण नसून मराठा असल्याचे खोले यांच्या गुरुजींनी त्यांना सांगितले. याबाबत खोले यांनी पुन्हा निर्मला यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी निर्मला यांनी त्यांचे नाव निर्मला यादव असल्याचे सांगितले.
त्यावेळी निर्मला यांना त्यांनी कुलकर्णी असे खोटे नाव का सांगितले, आमच्या घरी केवळा ब्राह्मण समाजातील सुवासिनी बाईने केलेलाच स्वयंपाक चालतो अशी विचारणा केली. यावरून निर्मला यांनी दमदाटी आणि शिवीगाळही केल्याची फिर्याद डॉ. खोले यांनी बुधवारी (६ सप्टेंबर) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिली होती.
त्यानंतर समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. त्यांच्या घरासमोर काही राजकीय संघटनांनीही आंदोलन केले. अखेर चहुबाजूच्या टीकेनंतर डॉ मेघा खोले यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात येऊन आपली तक्रार मागे घेतली आहे.

जन्मदात्या आईनेच केली दोन मुलांची हत्या

आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथे उघडीस आली आहे. चरित्र्याच्या संशयावरून पतीने दोन मुलासह घराबाहेर काढल्याने रागाच्या भरात जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन मुलांना संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे
बालकांचे पिता संजय मिसाळ हे मोल मजूरीच काम करतात.आपली पत्नी सोनाली मिसाळ हिच्याशी त्यांच पटत नव्हतं.पत्नीचे बाहेर असणारे संबंध पती संजय मिसाळ यांना माहित झाल्याने त्याने पत्नी पासुन काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत असत. आठ दिवसापूर्वी सोनल  घर सोडून निघुन गेली. जाते वेळी तिने मुलांना देखील सोबत नेले होते. त्यानंतर गावाजवळील तलावा शेजारी सोनालीने अन्य अरोपींच्या मदतीने दोन्ही बालकांची हत्या केली व त्यांना जमिनीत पुरले. या गुह्यात सोनाली हिला कोणी मदत केली याचा  पोलिस कसुन पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांनी सोनालीला हिला ताब्यात घेतले आहे.आदर्श मिसाळ (वय -२ वर्ष ) आणि प्रशांत मिसाळ ( वय – ४ महिने ) अशी या निष्पाप चिमुकल्यांची नावे आहेत.गेल्या आठ दिवसांपासून ही दोन मुले बेपत्ता होती.पोलिसांना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून हया दुहेरी खुनाचा उलगडा झाला आहे.दोन्ही बालकांचे मृतदेह शवविछ्येदनासाठी सोलापूर येथे पाठवले आहेत.सदर आरोपी  सोनाली मिसाळ हिच्यासह मुलाचा मामा, आजोबा आणि सोनालीच्या प्रियकारावर गुन्हा दाखल केला आहे

Saturday 9 September 2017

वीरपत्नी स्वाती महाडिक आता लष्करात लेफ्टनंट

सातारा : अतिरेक्‍यांशी लढताना हुतात्मा झालेल्या पतीच्या पार्थिवाच्या साक्षीने लष्करात जाऊन देशसेवाच करण्याचा संकल्प सोडणाऱ्या पोगरवाडी येथील वीर पत्नी स्वाती महाडिक या लेफ्टनंट झाल्या आहेत. शनिवारी (ता. नऊ) त्या लेफ्टनंट पदाची शपथ घेऊन लष्करी सेवेत दाखल होणार आहेत.
पोगरवाडी (ता. सातारा) येथील कर्नल संतोष महाडिक जम्मू- काश्‍मीरमध्ये अतिरेक्‍यांशी लढताना हुतात्मा झाले. कर्नल महाडिक यांच्या पत्नी स्वाती या नेहमीच त्यांच्या समवेत लष्करी वातावरणात राहिल्या. त्यामुळे त्यांनाही लष्करी जीवनाची आवड होती. पतीला हौतात्म्य आल्यावर पराक्रमी पतीचे लष्कारातून अपुरे राहिलेले देशसेवेचे कार्य लष्करात भरती होऊन पूर्ण करण्याचा संकल्प स्वाती महाडिक यांनी अनेक वेळा बोलून दाखविला होता.
हा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, तसेच लष्कारानेही त्यांना अधिकारी होण्याची संधी दिली. त्यानुसार ऑक्‍टोबर 2016 मध्ये स्वाती महाडिक चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमीत (ओटीए) प्रशिक्षणासाठी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी गेल्या 11 महिन्यांत खडतर प्रशिक्षण पूर्ण करत लष्कराच्या शिस्तीत स्वत:ला बांधून घेतले आहे. सेना आयुद्ध कोर (आर्मी ऑर्डनन्स कॉर्प) मध्ये त्या अधिकारी होणार असून, येत्या शनिवारी त्या लेफ्टनंटपदाची शपथ घेऊन लष्करी सेवेत दाखल होणार आहेत.

सदाभाऊंचे आव्हान शेट्टी स्वीकारणार काय?




खासदारकीचा मागितला राजीनामा - मंत्रिपद सोडण्यास तयार असल्याचा दावा
कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात संघर्ष सुरू असेपर्यंत मंत्री खोत यांनी तोंड उघडण्याचे टाळले. मात्र, त्यांना संघटनेतून काढून टाकल्यानंतर मात्र त्यांनी खासदार शेट्टी यांच्याविरुद्ध तोंड उघडण्यास सुरवात केली आहे. शेट्टींना निवडून द्या म्हणून यापूर्वी मंत्री खोत यांनी अनेकांवर तोफा डागल्या. आता हेच खोत शेट्टींना आव्हान देऊ लागले आहेत. श्री. खोत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे म्हणणारे खासदार शेट्टी यांना तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या, मी मंत्रिपदाचा देतो’ असे खुले आव्हान दिले आहे. हे आव्हान खासदार शेट्टी स्वीकारणार काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उसाचे असो किंवा दुधाचे आंदोलन असो, प्रत्येक आंदोलनात खासदार शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच लक्ष्य केले.
त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या जवळ जाऊ शकत नव्हते. गेल्या निवडणुकीत खासदार शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांच्यासोबत मंत्री खोत देखील होते. दिल्लीत आणि राज्यातही भाजपची सत्ता आली. त्यामुळे शेट्टी यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा होऊ लागली; पण एक सदस्य असलेल्या स्वाभिमानीची डाळ दिल्लीत शिजली नाही. मात्र, राज्यात सदाभाऊंचा नंबर लागला. तेव्हापासून खासदार शेट्टी यांनी त्यांच्याविरुद्ध रान उठविण्यास सुरवात केली.
मंत्री खोत यांना संघटनेतून बाहेर काढल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार शेट्टी यांना मंत्रिपदासाठी दुसऱ्या कार्यकर्त्याचे नाव देण्याची विनंती केली. याकडे शेट्टी यांनी दुर्लक्ष केले. मंत्री खोत यांना भाजपकडून अभय मिळाल्यानंतर शेट्टी यांनी सरकारमधूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या नावाने खडे फोडत सरकारमधून बाहेर पडल्यानंतर ज्या ठिकाणी भाजपसोबत सत्तेत आहे, त्या ठिकाणी देखील खासदार शेट्टी तसाच निर्णय घेण्याचे धाडस दाखवतील असे वाटत होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या दबावापुढे त्यांना झुकावे लागल्याचे बोलले जाते. त्यामुळे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तांमध्ये तडजोडीची भूमिका घेताना दिसत असतानाच मंत्री खोत यांनी त्यांना थेट आव्हान दिले आहे.
काळच सांगेल...
शेट्टी यांनी खोत यांना मंत्रिमंडळातून काढावे म्हणून जंग जंग पछाडले. जाहीर सभांमधून त्यांनी मंत्री खोत यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ते वारंवार करत होते आणि आजही करत आहेत. यावर मंत्री खोत यांनी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र, अगोदर तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या, असे आव्हान दिले आहे. ज्या दिवशी खासदारकीचा राजीनामा द्याल, त्या दिवशी मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे सांगितले. त्यामुळे दुसऱ्यांना नेहमी सत्तेला गोचडीसारखे चिकटले आहेत, असे म्हणणारे खासदार शेट्टी या आव्हानाला कितपत प्रतिसाद देतात, ते येणारा काळच सांगेल

करमाळ्याचे राहुल तळेकर खुन प्रकरण. सख्या भावानेचं केला खुन .

करमाळा:- केम ता.करमाळा येथे 23 जुलै 2017 रोजी राहुल तळेकर यांचा खुन त्याचा सख्या भाऊ सचिन नाना तळेकर याने मालमत्तेत वाटणी देत नाही आणि अनैतिक संबंधास आड येतो म्हणून कविता पवार हीच्या मदतीने केल्याचे निष्पण झाले आहे . याबाबत सचिन तळेकर रा.केम,ता.करमाळा जि.सोलापुर व कविता पवार रा.कंदर,ता.करमाळा या दोंघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे आणखी साथीदार असण्याची शक्यता असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी व पोलिस निरिक्षक राजेश देवरे यांनी दिली आहे .पोलिसांच्या कामगीरी बाबत केम परीसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिस निरिक्षक राजेश देवरे यांनी सांगितले की
केम (ता.करमाळा)येथिल तळेकर वस्ती येथे ता.23 जुलै 2017 रोजी राञी साडेबारा वाजता डोक्यात लोंखडी ऑगल डोक्यात घालुन राहुल नाना तळेकर( वय -30 ) यांचा खुन करण्यात आला होता.चोरीचा बहाणा करू खुन केल्याचा पोलिसांचा सुरवाती पासुनच अंदाज होता.
खुनाच्या घटनेने परीसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत मयत राहुल तळेकर यांची पत्नी अर्चना राहुल
तळेकर यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली होती.या खुना बाबत सुरवातीला किसन कांबळे रा.केम (हल्ली रहाणार पुणे)
यास संशयितास ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्याचा या खुनाशी काही संबंध नसल्याचे पोलिस तपासात निदर्शनास आल्याने त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. या खूनप्रकरणी पोलिसांनी कसून तपास केला यानंतर या खुनाचा तपास करण्यात आला असुन मयत राहुल तळेकर याचा भाऊ सचिन नाना तळेकर (वय 32) यांचे कंदर येथिल कविता पवार हिच्याशी अनैतिक संबंध होते .मयत राहुल तळेकर यांने माझ्या भावाशी संबंध ठेऊ नको याबाबत कविता पवार हीला समजावण्याचा प्रयत्न केला होता .यानंतर सचिन तळेकर व कविता पवार या दोघांनी मयत राहुल तळेकर हा मालमत्ते हीस्सा देत नाही व अनैतिक संबंधांच्या आड येतो म्हणून नियोजन करून खुन केला . राहुल तळेकर यांनी याबाबत कविता पवार हिला समजावले होते.याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे ,सहाय्यक फौजदार महेबुब शेख, पोलिस कॉन्स्टेबल योगेश चितळे, रविंद्र गोंदे, प्रवीण साठे,श्री. बोराटे,श्री. माने,श्री कौले यांच्या पथकाने या दोघांना अटक केली आहे .पुढील तपासपोलिस निरीक्षक राजेश देवरे करत आहेत.

रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी राजूबापू पाटील यांची निवड

आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य, माजी सभापती राजूबापू पाटील यांची निवड संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली आहे.



खा. शरद पवार यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील गरीब आणि होतकरू विध्यार्थ्याच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी सन १९१९ साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज महाराष्ट्रातील पंधरा आणि कर्नाटकातील एका जिल्ह्यात अशा सोळा जिल्ह्यात शिक्षणाचा विस्तार झाला आहे. समाजातील सर्वांगीण विकासासाठी आपण दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे, आपल्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवाचा फायदा रयत शिक्षण संस्थेच्या विध्यार्थ्यांना व्हावा, यासाठी ही निवड करण्यात आली आहे
.
राजूबापू पाटील यांची जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्याचे आज सकाळी समजताच पाटील समर्थकांनी तोफांच्या सलामीने आणि गुलालाच्या उधळणीने एकच जल्लोष केला. 
असाही योगायोग – रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी जेष्ठ नेते (वै.) यशवंतभाऊ पाटील यांनी ४९ वर्षे काम केले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी आता राजूबापू पाटील यांची निवड संस्थेचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी केली आहे. अशा प्रकारे एकाच संस्थेत एकाच पदावर वडील आणि मुलाने काम करण्याचा योगायोग पहावयास मिळत आहे.
पाटील घराण्याच्या कार्याचा शरद पवार यांच्याकडून गौरव –कॉंग्रेस पक्षात असल्यापासून शरद पवार आणि (वै.) यशवंतभाऊ पाटील यांचे स्नेहसंबंध होते. भाऊंच्या निधनानंतर ही खा. शरद पवार यांनी भाऊंच्या कार्याची आणि समाजाशी घट्ट असलेल्या नात्याची जाणीव ठेवत त्यांचे पूत्र राजूबापू पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य केले, मध्य विभाग सल्लागार समितीच्या समन्वय समितीच्या सदस्यपदी राजूबापू यांनी काम केले आहे. आणि आता रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड केली आहे. यावरूनच खा. पवार आणि पाटील घराण्याच्या दृढ संबंधाची कल्पना येते.

Friday 8 September 2017

ज्ञानदीप मध्ये शिक्षक दिन

ज्ञानदीप” मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा....

देशाला महासत्ता बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये शिक्षकांचे मोठे योगदान राहणार आहे, त्यांच्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यामुळेच सक्षम विध्यार्थी आणि सुजाण नागरिक घडत असल्याचे प्रतिपादन प्रा. सचिन पुजारी यांनी केले.

नांदोरे (ता. पंढरपूर) येथील ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात प्रा. पुजारी बोलत होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष किरण भिंगारे, तुकाराम शिंदे, मुख्याध्यापक तांबोळी, विध्यार्थी मुख्याध्यापक रुपाली कदम, अभिजित भिंगारे, अक्षय कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी किरण भिंगारे, शरद भिंगारे, नागेश इंगोले यांच्यासह विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण शालेय कामकाज आणि अध्यापनाचे कार्य व्यवस्थित पार पाडले. या कार्यक्रमासाठी मस्के सर, कौलगे सर, माळी सर, पुजारी सर, गायकवाड, वाघमारे, साबळे, भिंगारे, शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक, विध्यार्थी उपस्थित होते.

भीमा नदीत ४० हजाराचा विसर्ग

♦ _उजनी धरण पाणी पातळी_♦

 *दौंडचा विसर्ग वाढल्याने भीमा नदीच्या नैसर्गिक वाढ*

8 सप्टेंबर 2017    सायं. 6:00 वा.

पाणी पातळी : 497.280 मी.

एकूण साठा : 3473.78 दलघमी.

उपयुक्त साठा :  1670.97 दलघमी.

टक्केवारी : 110.14 %

-----------------🅰✅🅿------------------

दौंड विसर्ग : 4,764 क्युसेक्स

बंडगार्डन विसर्ग : 38,019 क्युसेक्स

कालवा विसर्ग : 2,500 क्युसेक्स

सांडवा (नदी) विसर्ग : 40,000 (आज सायं. 4:30 वा.)

वीजनिर्मिती : 1,500 क्युसेक्स

बोगदा : 600 क्युसेक्स

अधिक माहितीसाठी bhosenews.blogspot.in ला भेट द्या.

@अण्णासाहेब पवार,
खेडभोसे, प्रतिनिधी दै.पुढारी
मोबा. 9881 20 20 56

-----------------🅰✅🅿------------------

Thursday 7 September 2017

प्रितम करांडेची विभागीय स्पर्धेसाठी निवड

एस.पी.पब्लिक स्कूलचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये घवघवीत यश -                                         बुधवार दि . 06/09/2017 रोजी महाराष्ट्र राज्य क्रिडा विभागाअंतर्गत सोलापूर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धामध्ये एस.पी. पब्लिक स्कूल , नांदोरेचा विद्यार्थी प्रितम चांगदेव करांडे याने 35 ते40 किलो वजन गटातून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक  संपादन करून  पुणे होणाऱ्या विभागीय  स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला. त्याबद्दल त्याचा संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज सातुरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे,प्रकल्य संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरामधून त्याचे कौतुक होत आहे. यास कराटे प्रशिक्षक दिपक माने सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .

Wednesday 6 September 2017

‘व्हॉट्सअॅप’साठी पैसे मोजावे लागणार?

‘व्हॉट्सअॅप’साठी पैसे मोजावे लागणार?

नवी दिल्ली: लवकरच तुमच्यावर बापरे! म्हणण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. कारण लोकप्रिय मेसेजिंग अॅप्लिकेशन असलेले 'व्हॉट्सअॅप' वापरण्यासाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. सध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप असलेले 'व्हॉट्सअॅप'चे सुमारे 100 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी 'व्हॉट्सअॅप'साठी पैसे घेण्याची शक्यता आहे. 'व्हॉट्सअॅप'वर पैसे घेतल्यास कंपनीला म्हणजेच 'व्हॉट्सअॅप'ची पालक कंपनी असलेल्या 'फेसबुक'ला यातून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप रोज नवनवीन फिचर्स लोकांसाठी आणत असते. आता त्यात आणखी काही नवीन फिचर्सची चाचणी घेतली जात आहे. त्यानुसार 'व्हॉट्सअॅप' वापरणार्‍यांना थेट आवडत्या कंपन्यांबरोबर थेट संवाद साधता येणार आहे. शिवाय लहान कंपन्यांना मोफत व्हॉट्सअॅप बिझनेस अॅप्लिकेशन देणार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यामध्ये नव्या अॅपमध्ये व्यापार वाढवण्यासाठी कंपन्यांना खास टूल्स देण्यात येणार आहेत. कंपन्यांना देखील एकाच वेळेस लाखो लोकांशी संवाद साधता येणार आहे. याचा विमान कंपन्या आणि ई-कॉमर्स कंपन्याना एकाच वेळेस हजारो लोकांपर्यंत कमीत कमी वेळेत पोचता येणार आहे.

दिग्गजांना मागे टाकत प्रदीप नरवाल ठरला शतकवीर

दिग्गजांना मागे टाकत प्रदीप नरवाल ठरला शतकवीर

जयपूरविरुद्ध प्रदीपचे सामन्यात २१ गुण


प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात पाटणा पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालने चढाईच्या गुणांमध्ये आपलं शतक साजरं केलं आहे. काल झालेल्या सामन्यात जयपूरचा ४७-२१ असा धुव्वा उडवत पाटणाने सामन्यात बाजी मारली. या सामन्यात प्रदीप नरवालने धडाकेबाज खेळी करत चढाईमध्ये तब्बल २१ गुणांची कमाई केली. यासोबतच प्रदीप पाचव्या पर्वात चढाईत १०० गुण मिळवणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे राहुल चौधरी, रोहीत कुमार यासारख्या तरुण आणि अनुभवी खेळाडूंना मागे टाकत २० वर्षीय प्रदीप नरवालने ही कामगिरी केली. गेल्या काही सामन्यांमध्ये गतविजेत्या पाटणा पायरेट्सला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मात्र यामुळे हार न मानता प्रदीपने अष्टपैलू खेळ करत स्वतःच्या संघाला विजय तर मिळवून दिलाच, आणि स्वतःच्या नावावर एक विक्रमही नोंदवला.

शिक्षक दिनाचे ऒचित्य विद्यार्थी झाले शिक्षक

पटवर्धन कुरोली, ता. ०६: नांदोरे (ता.पंढरपूर) येथील एस.पी. पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक दिना  निमित्त विध्यार्थ्यानी दिवसभर शाळेचे सर्व कामकाज सांभाळले आणि स्वत: शिक्षकाची जबाबदारी घेऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

प्रारंभी माजी राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन आणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज सातुरे होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पत्रकार अण्णासाहेब पवार, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण उपस्थित होते.   यावेळी प्रशालेतील इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. तसेच शिक्षकांना सुट्टी देऊन दिवसभर शाळेचे कामकाज पहिले. यावेळी स्नेहा काळे, तेजस शिंदे, विशाल कोळी, सायली भुते, अभिषेक कांबळे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

यावेळी नितीन पवार, संतोष कांबळे यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन अपेक्षा सातुरे, सिद्धी भोसले यांनी केले. प्रास्ताविक युवराज चव्हाण याने केले. आभार हर्षदा भिंगारे हिने मानले.



आव्हेत शिक्षकांचा सत्कार

पटवर्धन कुरोली,ता.०६: आव्हे (ता.पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिनानिमीत्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच बिटु करवर, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चे अध्यक्ष राणु पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भिकू ननवरे,पांडुरंग ढोले,धनाजी कांबळे,नामदेव कांबळे,रेश्मा कांबळे, सरस्वती कांबळे,  मुख्याध्यापक आनंद कचरे,  बाळासाहेब पवार, विलास नाईकनवरे, पांडुरंग नाईकनवरे, प्रवीण कुलकर्णी,सतीश रणदिवे, विजय कुमरे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

Tuesday 5 September 2017

धैर्यशील पाटील यांचा सत्कार

धैर्यशील पाटील यांचा सत्कार.  पटवर्धन कुरोली ता.०६: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील महात्मा गांधी  तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील पाटील यांची तर रमेश जवळेकर यांची पंढरपूर तालुका भाजपा युवा मोर्चा च्या तालुका चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल पटवर्धन कुरोली शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष पंडित तवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पटवर्धन कुरोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चे व्हा.चेअरमन विजय काळे, सचिव भालचंद्र उपासे, नागेश तवटे, संजय काळे सर, सचिन तवटे उपस्थित होते

राज्यात गणेश विसर्जनादरम्यान नऊ जण बुडाले

गणेश विसर्जनाच्या मिरवणुका राज्याच्या विविध भागांत शिगेला पोहोचल्या असतानाच नदी, तलावांमध्ये बुडून वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या हाती आल्या आहेत.
मरण पावलेले बहुतांश वयाच्या विशीच्या आतील आहेत. नदीत, तलावात, बंधाऱयात पाण्याचा अंदाज न आल्याने या तरूणांचा बुडून मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील नंदाणे गावात शाळकरी मुलगा बंधाऱयाच्या गाळाचा अंदाज न आल्याने पाण्यात फसला आणि बुडून मरण पावला. अशीच घटना बीड जिल्ह्यातही घडली आहे. बंधाऱयातील गाळात रुतत गेल्याने माजलगाव (जि. बीड) येथे मुलगा बुडून मरण पावला.
पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवडमधील जगताप डेअरीजवळ संध्याकाळी दोनजण बुडाल्याचे वृत्त आहे. महापालिकेने नदीकाठावर दक्षता पथके नियुक्त केली आहेत. ही पथके बुडालेल्या दोघा तरूणांचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप त्यांच्याविषयी काहीही समजलेले नाही.
सातारा जिल्ह्यातील कुडाळ (ता. जावळी) गणपती विसर्जन करताना हेमंत वाघ (वय 18) या तरूणाचा बुडुन मृत्यू झाला आहे. नाशिकमधील नाशिकरोड येथे किशोर कैलास सोनार लोळगे (वय 20) याचा गणपती विसर्जन करताना नदीत बूडन मृत्यू झाला आहे.
सर्वात मोठी दुर्घटना औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन येथे घडली. तेथे शिवणी तळ्यात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला.
मृतांमधे सागर सुरेश तेलभाते (वय १३)  आदित्य ताराचंद किर्तिशाही (वय १२) आणि राजेश सुनील गायकवाड (वय १२) यांचा समावेश आहे. अर्जुन सुभाष पोपळघट (वय १२) याचे प्राण वाचले. सर्व मृतदेह औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवि

गणेश विसर्जनाला गालबोट, औरंगाबादेत तीन मुलांचा बुडून मृत्यू

05 सप्टेंबर : सर्वत्र गणेशोत्सव विसर्जन सुरुवात असताना औरंगाबाद जिल्ह्यात दुःखद घटना घडलीये. विसर्जनासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय.
औरंगाबाद येथील बिडकीन पासून काही अंतरावर असलेल्या शिवनाई तलावात घरगुती गणपती विसर्जनसाठी चार मुलं गेली होती. विसर्जनासाठी गेलेल्या चार मुलापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. आदर्श किर्तीशाई, सागर तेलभाते, राजेश गायकवाड अशी मृत्यू झालेले मुलाचं नाव असून हे सर्व मूल आठ ते दहा वर्षांचे आहेत.

Monday 4 September 2017

‘नारायण राणे काँग्रेसमध्येच’

नारायण राणे अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. ते कोठे जातील असे वाटत नाही. तशी काही चर्चा नाही. त्यामुळे या विषयावर बोलणे योग्य नाही,’ असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

गणेशोत्सवाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी ते शनिवारी रात्री खडकीत आले होते. खडकीतील काही गणेश मंडळांना भेटी दिल्यानंतर, खडकीचे माजी उपाध्यक्ष, नगरसेवक मनीष आनंद यांनी आयोजित केलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी राणेंबाबत मोजक्या शब्दांत भाष्य केले.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, शहर युवक अध्यक्ष विकास लांडगे, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, कँटोन्मेंटच्या नगससेविका पूजा आनंद, वैशाली पहिलवान आदी या वेळी उपस्थित होते.


चव्हाण म्हणाले, विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही तयारी सुरू केली आहे. जिल्हा आणि शहरपातळीवर विविध स्तरावर बैठका सुरू आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा, तसेच त्यापूर्वीच्या निवडणुकांच्या पराभवाची कारणे शोधण्यात येत आहे. त्याचा अभ्यास केला जात आहे. त्यातून पुढची दिशा ठरवली जाणार आहे.’ मनीष आनंद यांनी चव्हाण यांचे स्वागत केले. पूजा आनंद यांनी आभार मानले.

पंकजा, तुम्ही मुख्यमंत्री व्हा

‘देशात महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत असल्याने बहुजन समाजाच्या नेत्या म्हणून प्रगतीशील महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्यासाठी ही योग्य वेळ आहे’, अशा शब्दात काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भंडारा-गोंदिया येथील पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी शरसंधान केल्याची शाई वाळत नाही तोच आशिष देशमुख यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी ही योग्यवेळ असल्याच्या शुभेच्छा दिल्या. पार्टी विथ डिफरन्समधील सुप्त ‘डिफरन्सेस’ हळूहळू बाहेर येऊ लागले आहेत. पंकजा ​मुंडे यांना आशिष देशमुख यांनी दिलेल्या शुभेच्छांची लगेच राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.

‘काटोल फेस्टिव्हल’अंतर्गत काटोल व नरखेड तालुक्यातील महिलांचे बचत गट प्रशिक्षण शिबिर तालुका स्टेडियममध्ये सोमवारी आयोजित करण्यात आले होते. मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी निर्मला सीतारामन यांची संरक्षणमंत्रिपदी नियुक्ती झाल्याकडे लक्ष वेधून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांची माहिती दिली. हाच धागा पकडून आशिष देशमुख यांनी मुंडे यांना थेट मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्या. निर्मला सीतारामन संरक्षणमंत्री झाल्या. प्रगतीशील महाराष्ट्राचे नेतृत्वही महिलांनी करावे. पहिल्या मुख्यमंत्री होऊन आपण राज्याचे नेत्वृत्व करावे, असे देशमुख म्हणाले. यावर पंकजा मुंडे यांनी लगेच गणेशाला वंदन करून सदिच्छा स्वीकारल्या.

--बहुजन नेतृत्वाची चर्चा

वेगळा विदर्भ असो नाही तर, कर्जमाफी आशिष देशमुख यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी दिलेल्या शुभेच्छाही वादग्रस्त ठरण्याचे संकेत आहेत. राज्यात बहुजन समाजाला नेतृत्वाची संधी मिळावी, हा मुद्दा सरकार स्थापन होण्याच्या पूर्वीपासून चर्चेत आला. त्यावेळी फडणवीस यांच्यासह एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे अशी नावे चर्चेत होती.

मला मुख्यमंत्री होणे आवडेल, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते. सत्ता स्थापन झाल्यानंतर चिक्की घोटाळा, डिग्री घोटाळा गाजले. यानंतर अनेक इच्छुक शांत झाले. एमआयडीसीच्या भूखंड व्यवहारावरून खडसे यांना महसूल व कृषिमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर परत बहुजन नेतृत्व चर्चेत आले

एकाच लढतीत १६ विश्‍वविक्रम

पाचव्या आणि शेवटच्या वन-डेत टीम इंडियाने श्रीलंकेचा 6 विकेटने फडशा पाडत पाच लढतींची मालिका 5-0 ने जिंकली. या लढतीत तब्बल 16 विश्‍वविक्रमांची नोंद झाली. त्यासंदर्भातील ही रोचक आकडेवारी... 
6
भारतीय संघाने पाच किंवा त्यापेक्षा जास्त वन-डे लढतीत प्रतिस्पर्धी संघाला व्हाईटवॉश देण्याचीही सहावी वेळ आहे. सर्वाधिक व्हाईटवॉश देण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर जमा झाला. सहापैकी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली तीन, धोनीच्या नेतृत्वाखाली दोन आणि गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली एक व्हाईटवॉश टीम इंडियाने दिला आहे.
1
मायदेशातील द्विपक्षीय मालिकेत श्रीलंकेवर पहिल्यांदाच व्हाईटवॉशची नामुष्की ओढवली. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लढतीत लंकेला व्हाईटवॉश मिळण्याची ही एकूण तिसरी वेळ आहे. 
30
विराट कोहलीने कारकिर्दीतील 30 वे शतक साजरे केले आणि सर्वाधिक शतके ठोकणार्‍या फलंदाजांच्या यादीत रिकी पाँटिंगसह संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले. 
92.45
या वर्षातील विराटची सरासरी. 1 हजार धावा पूर्ण करताना ही सरासरी राखणारा विराट वन-डेतील एकमेव फलंदाज आहे. एकाच वर्षात 1 हजार धावा ठोकण्याची विराटची ही पाचवी वेळ आहे. 
843
गेल्या वर्षभरात विराटने धावांचा पाठलाग करताना 843 धावा ठोकल्या असून 10 वेळा टीम इंडियाने विजय साजरा केला आहे. यात त्याने चार शतके आणि चार अर्धशतके ठोकली. 
1
पाच लढतींच्या मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला तीन वेळा व्हाईटवॉश देणारा विराट पहिलाच कर्णधार ठरला आहे. 
15
जसप्रित बुमराहने या मालिकेत 15 विकेट घेतल्या. भारत-लंकेदरम्यान पाच लढतींच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाजही तो ठरला आहे. 
यजमानांना कसोटी आणि वन-डेतही व्हाईटवॉश देणारा भारत जगातील पहिलाच संघ ठरला. लंकेला घरच्या मैदानावर दोन मालिकेत व्हाईटवॉश देण्याची कामगिरी करणाराही भारत पहिलाच. 
2
भारतीय संघाने या मालिकेत दोन ‘रिस्ट स्पिनर्स’ खेळवले. भारताच्या 922 लढतीच्या वन-डे इतिहासात पहिल्यांदाच अशा फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आले आहे. 
5
भुवनेश्‍वरकुमारने  या लढतीत 5 विकेट घेतल्या. 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट मिळवण्याची भुवनेश्‍वर कुमारची ही पहिलीच वेळ ठरली. या मालिकेत 3 सामने खेळूनही भुवनेश्‍वरला एकही विकेट मिळवता आली नव्हती. मात्र, ही कमतरता त्याने अखेरच्या सामन्यात भरून काढली.
5
सलग दोन वन-डेत शतक ठोकण्याची कामगिरी विराटने पाचव्यांदा केली. द. आफ्रिकेच्या ए.बी. डिविलियर्सने अशी कामगिरी सहा वेळा केली आहे. 
8
श्रीलंकेविरुद्ध विराट कोहलीचं हे आठवं शतक ठरलं. यासोबत विराटने सचिनच्या श्रीलंकेविरुद्ध झळकावलेल्या शतकांशी बरोबरी केली. एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम अजूनही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. (ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 शतकं)
28
वयाच्या 28 व्या वर्षीच विराटने वन-डे कारकिर्दीतील शतकाची तिशी पूर्ण केली.

'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत नेमकं काय झालं ?

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरू केल्यांचं, भाजपने केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारातून दाखवून दिलंय. त्यामुळे आता शिवसेनेनं राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी जोर बैठका सुरू केल्यात.
भाजपच्या विस्तारवादी धोरणामुळे, शिवसेनेनं ही राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू केलंय. त्यासाठीच 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या उपस्थितीत सर्व नेते आणि जिल्हा संपर्कं प्रमुखांची महत्वाची बैठक झाली.
शिवसेना येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका जिल्हा आणि तालुका स्तरावरील संघटना पदाधिकार्यांमध्ये मोठे फेरबदल करणार असल्याचं समजतंय.
शिवसेना बैठकीत नेमकं काय झालं...? ,सूत्रांच्या माहिती नुसार
१) मातोश्रीवर आज झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्ष मजबूत करण्यासाठी २ तास मॅरेथाॅन बैठक घेतली. २) या बैठकीत पक्ष मजबूत करण्यासाठी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नारळ देण्याचे आदेश दिलेत. तर काम करणाऱ्या पदाधिकार्यांना मोठी जबाबदारी देण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी नेत्यांना दिलेत.
३) पक्ष मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे विभागीय मेळावे होणार
४) शिवसेनेच्या सर्व नेत्यांची आणि जिल्हा संपर्क प्रमुखांची आता दर महिन्याला बैठक होणार
५) बैठकीत केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार, एनडीए आणि भाजप युती या संदर्भात चर्चा झाली नाही.
'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार आणि एनडीए संदर्भात चर्चा झाली नसल्याचं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे.
एकूणच काय तर भाजपच्या विस्तारवादी धोरणाचा सामना कसा करायचा. आणि त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचसाठी ही बैठक होती. पण या बैठकीतून शिवसेनेला किती फायदा होणार हे येणाऱ्या निवडणुकी नंतरच स्पष्टं होईल.

सोलापूर: भाजपमधील गटबाजीचा बसला कर्मचाऱ्यांना फटका

सोलापूर : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ' या म्हणीला छेद देत "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचे नुकसान' ही नवीन म्हण प्रचलित करण्याचा प्रकार सोलापूर महापालिकेत झाला आहे. पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या समर्थकांतील गटबाजीमुळे महागाई भत्ता देण्याची कार्यवाही प्रशासनाला थांबवावी लागली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, भाजपने खरोखरच "गाजर' दाखवायला सुरवात केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. प्रशासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ कर्मचारी संघ'टना आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सहा टक्के महागाई व मानधन, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातही वाढ करण्याची घोषणा सहकारमंत्री समर्थक महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्वातंत्र्यदिनी केली. त्यानुसार प्रशासनाने परिपत्रक काढून कार्यवाहीही सुरु केली. दरम्यान हा विषय माहितीस्तव स्थायी समितीकडे आला. त्यावेळी पालकमंत्री समर्थक सभापती संजय कोळी यांनी या परिपत्रकास स्थगिती दिली आणि "आर्थिक अडचणी'चे कारण देत, चर्चेनंतर कार्यवाही करावी, असा ठराव स्थायी समितीच्या सभेत करून घेतला. त्यामुळे प्रशासनाने नाईलाजाने पूर्वीचे परिपत्रक रद्द केले असून, या संदर्भात नव्याने परिपत्रक काढण्यात येईल, असे सुधारीत आदेश काढले आहेत. महागाई लागू करण्यासंदर्भातील निर्णय रद्द करण्याची ही महापालिकेच्या इतिहासातील पहिली वेळ आहे. भाजप मंत्र्यांच्या गटबाजीमुळे हा फटका बसल्याचे सांगत, नगरसेवकांचे मानधन वाढविण्यास एकमताने मंजूर करताना परिपत्रक थांबविणाऱ्या सभापतींना पालिकेची आर्थिक स्थिती दिसली नाही का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
सोलापूरला दोन मंत्रिपद मिळाले आहेत त्याचा उपयोग विकासासाठी करण्याऐवजी गटबाजी वाढविण्यासाठी होत आहे. दोन्ही मंत्र्यांच्या समर्थकांच्या भांडणात अनेक विकास कामांचे प्रस्ताव रखडले आहेत. त्याची झळ आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही बसली आहे. सध्याचे एकमेकांवर कुरघोडीचे प्रकार पाहता या दोघांचेही मंत्रिपद काढून घेणे हेच सोलापूरच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे , अशी मागणी जाणकारांतून होत आहे.

आयपीएलचा खेळ आता स्टार स्पोर्टसवरून

मुंबई : केवळ भारतीय क्रिकेटमध्येच नव्हे तर क्रिकेट विश्‍वात प्रसिद्ध असलेल्या आयपीएल प्रसारणाचे पुढील पाच वर्षांचे हक्क स्टार स्पोर्टस या वाहिनीने मिळविले आहे. सोनीला मागे टाकत स्टार इंडियाने 16,347.50 कोटी रुपयांना हे हक्क विकत घेतले आहेत.
आयपीएलच्या प्रसारणासाठी भारतात प्रसिद्ध असलेल्या स्टार इंडिया, सोनी नेटवर्क या टीव्ही वाहिन्यांनी अंतिम बोली लावली होती. यामध्ये स्टार इंडियाने सर्वाधिक बोली लावत प्रसारणाचे हक्क मिळविले. 2018 ते 2022 या पाच वर्षांसाठी स्टार इंडियाकडे प्रसारणाचे हक्क असणार आहेत. तर ट्‌विटर आणि फेसबुकही हे हक्क मिळवण्यासाठी इच्छुक आहेत.
दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या लीगने भारतीय क्रिकेटला अधिक श्रीमंत केले. आता होणारा नवा करार मालामाल करणारा आहे. 20 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेला हे हक्क विकले जाण्याचा अंदाज बीसीसीआय करत होते. मात्र, प्रसारणाचे हक्क 16 हजारांहून अधिक कोटींना विकले गेले आहेत. आयपीएल सुरू झाल्यापासून म्हणजेच 2008 ते 2017 या 10 वर्षांसाठी सोनीने 8,200 कोटींना हे हक्क मिळवले होते. तर 2015 मध्ये तीन वर्षांसाठी ग्लोबल डिजिटल हक्क नोव्ही डिजिटलने 302.2 कोटींमध्ये मिळवले होते.
यंदा प्रसारणाचे हक्क प्रसारण आणि डिजिटल (इंटरनेट व मोबाईल) अशा दोन विभागांत होणार आहेत. भारतीय उपखंडासाठी वेगळे टीव्ही हक्क त्याच वेळी उपखंडासाठी वेगळे डिजिटल हक्क देण्यात येतील. आखाती देश, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अशा उपखंडाबाहेरील मार्केटसाठी वेगळे प्रसारण हक्क देण्यात येतील.
इच्छुक असलेल्या 18 दिग्गज कंपन्या
स्टार इंडिया, अमेझॉन सेलर सर्व्हिस, फॉलोवोन इंटरॅक्टिव्ह मीडिया, ताज टीव्ही इंडिया, सोनी पिक्‍चर्स नेटवर्क, टाइम्स इंटरनेट, सुपरस्पोर्ट इंटरनॅशनल, रिलायन्स जिओ डिजिटल, गल्फ डीटीएच, ग्रुप एम मीडिया, बेईन, इकोनेट मीडिया, स्काय यूके, ईएसपीएन डिजिटल मीडिया, बीटीजी लीगल सर्व्हिस, बीटी बीएलसी, ट्‌विटर, फेसबुक.

गरजू मुलांना मदत निधीचे वितरण

सुपे : जीवनात सुख व आनंदासाठी दुसऱ्यांना सुखी व आनंदी करा तरच जीवनात तुम्ही सुखी व आनंदी व्हाल. त्यासाठी गरिबांची सेवा करा कारण गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
पारनेर येथे व्हॉटसअपच्या माध्यामातून तयार झालेल्या पारनेरकर युवा विकास मंचाच्या वतीने गरीब व गरजू मुलांना मदत निधीचे वितरणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे, सहायक विक्रीकर आयुक्त मंजाभाऊ लंके, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया झावरे, श्रीरामपूरचे परिवहन अधिकारी पदमाकर भालेकर, अमोल धाडगे, बाळासाहेब पठारे, संजय वाघमारे, मुद्दसर सय्यद, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे, गट शिक्षणाधिकारी जयश्री कार्ले आदी मान्यवर ऊपस्थित होते.
यावेळी हजारे पुढे म्हणाले, अल्पावधीतच पारनेर युवा विकास मंचाने जनतेचा विश्वास संपादन केला आहे. या विकास मंचामुळे तरूणांना दिशा मिळाली आहे. जिवनात आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो याची जाणीव ठेवावी. विकास मंचाच्या वतीने मुलांना ऊपलब्ध करूण देण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा ऊपक्रमामुळे अनेक गरजू पारनेरकरांना मदत होणार आहे. त्या मुळे यातून तयार होणारे अधिकारी चारित्र्यावान तयार होतील असेही हजारे म्हणाले.
भोईटे म्हणाले, दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याचा या मंचाचा ऊपक्रम राज्यातील तरूणांसाठी आदर्श ऊपक्रम आहे. मंचाच्या वतीने ऊलब्ध करूण देण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेसाठीच्या सुविधांमुळे भविष्यात पारनेर तालुका प्रशासकिय अधिकारी बनविण्याचे केंद्र तयार होईल. येथील अभ्यासिकेचा फयदा तरूणांनी घ्यावा.ज्ञान मिळविण्याची साधने वाढली आहेत, मात्र त्याचा कसा वापर करावयाचा हे आपणावर आवलंबून आहे. पुढील काळात पोलीस भरतीसाठी पारनेर येथे केंद्र सुरू करू अेसेही भोईटे म्हणाले. या वेळी सुमारे 150 मुलांना शालेय साहित्य व आर्थिक मदत करण्यात आली. मुलांना मदत करण्याचे हे मंचाचे दुसरे वर्ष आहे. गतवर्षी दीड लाख रूपयांची मदत मुलांना करण्यात आली होती. या वेळी झावरे, लंके, धाडगे, वाघमारे, गोळे, आदींची भाषणे झाली. पपारनेर युवा विकास मंचाचे अध्यक्ष बाबुराव कदम यांनी प्रास्ताविक तर सुदाम दाते यांनी आभार मानले.
अण्णा हजारे यांनी पारनेर युवा विकास मंचच्या वतीने पारनेर येथे गरजू मुलांकरीता व स्पर्धा परीक्षेसाठी मोफत चालविण्यात येत असलेल्या वाचनालयासाठी साडेसात लाख रुपयांची पुस्तके व 10 लोखंडी कपाटे देण्याचे जाहीर केले. यापूर्वीही हजारे यांनी दीड लाख रूपयांची स्पर्धा परीक्षेसाठीची पुस्तके या वाचनालयास दिली आहेत.

उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक

उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला स्थान देण्याचं सोडाच; साधं विचारण्यातही न आल्यानं शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री' निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांसह राज्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्यामुळं त्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडं सध्या एक केंद्रीय मंत्रीपद आहे. लोकसभेतील संख्याबळानुसार दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद मिळावं, अशी शिवसेनेची मागणी आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या मागणीचा कुठलाही विचार करण्यात आला नाही. इतकंच नव्हे तर मंत्रिमंडळ विस्ताराआधी शिवसेनेच्या नेतृत्वाशी संपर्कही करण्यात आला नाही. त्यामुळं शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे. शिवसेना नेते संजय राऊत व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: ही नाराजी बोलून दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ही बैठक होत आहे.

शिवसेनेच्या नेत्यांसह राज्यभरातील संपर्कप्रमुख आणि संपर्क नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नुकताच एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनाही त्याच मार्गाने जाऊन भाजपला धक्का देईल, अशी चर्चा आहे. तसं झाल्यास राज्यातील भाजप सरकारवर दबाव टाकण्याची संधीही शिवसेनेला मिळेल, असंही बोललं जात आहे.

दंगलीची अफवा भोवली; व्यावसायिक कोठडीत

दंगलीची अफवा भोवली; व्यावसायिक कोठडीत

सांगलीत हिंदू आणि मुस्ल‌िम समाजात दंगल झाल्याची अफवा पेठवडगावमधील ‘गमजा ग्रुप’ ने पोस्ट केली. ही केलेली ‘गमजा’ बांधकाम व्यावसायिकांच्या चांगलीच अंगलट आली असून अफवेची पोस्ट फॉरवर्ड केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक शरद रामचंद्र दिंडे (वय ४२, रा. चौगुले गल्ली, कसबा बावडा) याला एक दिवस पोलिस कोठडीची हवा खावी लागली. गमजा ग्रुपचा अॅडमिन व ग्रुपमधील २७ सदस्यांकडे शाहूपुरी पोलिस चौकशी करत आहेत.

सांगली येथे हिंदू मुस्ल‌िमांची दंगल झाली आहे, अशी पोस्ट व व्हिडिओ बांधकाम व्यावसायिक दिंडे यांना शनिवारी सकाळी त्यांच्या मोबाइलवर आली. त्यांनी ती पोस्ट फॉरवर्ड केली. पोलिसांनी दिंडे यांना ताब्यात घेऊन जाती धर्मात तेढ माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. दिंडे यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे केले असताना कोर्टाने त्यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. एका पोस्टमुळे दिंडे यांना पोलिस कोठडीची हवा खावी लागत आहेत. या संदर्भात पोलिसांनी दिंडे यांच्याकडे चौकशी केली असता, २००८ मधील दंगलीचा व्हिडिओ यापुर्वी कधीही पाहिला नव्हता. त्यामुळे व्हिडिओ पाहून संतापाची लाट उसळल्याने तो व्हिडिओ पुढे फॉरवर्ड केला, असा जबाब दिला आहे. दिंडे हे जरी कसबा बावडा येथे रहात असले तरी पेठवडगावच्या ‘गमजा’ ग्रुपमध्ये त्यांना अडीच वर्षापूर्वी अॅड केले होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या ग्रुपच्या अॅडमिनशी पोलिसांनी संपर्क साधला असून अॅडमिनला पोलिसांनी चौकशीस बोलावले आहे. गमजा ग्रुपवर दंगलीच्या अफवेचा व्हिडिओ कुणी पाठवला हे स्पष्ट होणार आहे.

मारूती भुसनर यांची निवड

पंढरपूर, ता: आव्हे(ता.पंढरपूर) मारूती भारत भुसनर यांची भारतीय
जनता पा्र्टी युवा मोर्चा तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी पंढरपूर पंचायत समितीचे सभापती दिनकररावजी नाईकनवरे,  तालुकाध्यक्ष लक्ष्मण वंजारी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Sunday 3 September 2017

फिर्यादीला चांगली वागणूक द्या

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिस ठाण्यात फिर्यादिला योग्य वागणूक देणे आवश्यक आहे. मात्र त्याचा विसर पोलिसांना पडला आहे. पुणे जिल्ह्यात आता फिर्यादिला चांगली वागणूक देण्यासाठीचे धोरण पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी ठरविले आहे. तसे न करणाऱ्यांना थेट निलंबित करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

 फिर्याद नोंदविण्यासाठी आलेल्या नागरिकाला चांगली वागणूक दिल्यास पारितोषिक व वाईट वागणूक दिल्यास निलंबन या प्रयोगाची अंमलबजावणी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी सुरु केली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी बारामतीत बोलताना ही माहिती दिली. पोलिस ठाण्यामध्ये फिर्यादी आल्यानंतर त्याच्याशी सौजन्याने बोलणे, त्याची फिर्याद लिहून घेणे, एफआयआरची प्रत त्याला विनामूल्य देणे या बाबींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने फिर्यादीचे जे हक्क निश्‍चित केले आहेत, त्याची अंमलबजावणी होण्याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी याबाबत पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयातील 40 विद्यार्थ्यांच्या मदतीने पोलिस ठाण्यांची पाहणी करण्यात आली. या विद्यार्थ्यांना डमी फिर्यादी बनवून पाठविण्यात आले. या फिर्यादिंना आलेल्या अनुभवाच्या आधारे संबंधित पोलिस ठाण्यातील अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले. चांगली वागणूक देणाऱ्यांना बक्षिसे देण्यात आल्याचे हक यांनी सांगितले.

कंट्रोल रूम' कडून घेणार माहिती

यापुढे आता संबंधित पोलिस ठाण्यातील प्रत्येक फिर्यादिला आता "कंट्रोल रूम' मधून फोन केला जाईल. पोलिस ठाण्यात वागणूक कशी मिळाली? फिर्याद नोंदवून घेताना त्रास झाला का? पैशाची मागणी कोणी केली का? फिर्यादिची प्रत मिळाली का, या प्रश्‍नांच्या आधारे फिर्यादीकडे माहिती घेतली जाईल. यानुसार संबंधित पोलिस अंमलदाराचे "रॅंकिंग' केले जाईल. योग्य असलेल्यांना बक्षिसे, अयोग्य असलेल्यांना शिक्षा असे धोरण असेल. त्यामुळे याचा योग्य परिणाम साधला जाईल, असा विश्‍वास हक यांनी व्यक्त केला.

महिलांच्या गुन्ह्यांबाबत संवेदनशीलतेने काम कसे करावे, याचे प्रशिक्षण पोलिसांना देण्यासठी एका कंपनीने सहयोग देऊ केला आहे. यानुसार जिल्ह्यातील पोलिसांचे बॅचनुसार प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रात मोठे फेरबदल

केंद्रात मोठे फेरबदल, दिग्गजांची खाती बदलली! पहा कुणाला कोणतं मंत्रालय?
केंद्रात मोठे फेरबदल, दिग्गजांची खाती बदलली!

नवी दिल्ली :  केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर अगदी काही वेळातच खातेवाटपालाही सुरुवात झाली आहे. दिग्गजांची खाती बदलल्याचे खातेवाटपावरुन समोर आले आहे. विशेष म्हणजे इंदिरा गांधीनंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेची वर्णी लागली आहे. निर्मला सीतारमन यांच्या खांद्यावर संरक्षणमंत्रिपदाच्या धुरा सोपवण्यात आली आहे.

2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोदींनी मंत्रिमंडळात सर्वात मोठा फेरबदल केला आहे. मंत्रिमंडळातील 4 राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती दिली, तर 9 नव्या चेहऱ्यांचा समावेश केला आहे. त्यानंतर मोदी थेट चीनला रवाना झाले. पण त्यापूर्वी खातेवाटपात सर्वात महत्वाचं असं संरक्षण मंत्रिपद त्यांनी निर्मला सीतारमन यांची वर्णी लावली. इंदिरा गांधींनंतर संरक्षण खातं सांभाळणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरतील.

कुणाला कोणतं मंत्रालय?

कॅबिनेट मंत्री
सुरेश प्रभू - वाणिज्य पियुष गोयल - रेल्वे उमा भारती - पेयजल आणि स्वच्छता धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम आणि कौशल्यविकास नितीन गडकरी - रस्ते वाहतूकसह गंगा स्वच्छता अभियानचा अतिरिक्त भार स्मृती इराणी - माहिती प्रसारण आणि वस्त्रोद्योग राज्यवर्धन राठोड - क्रीडामंत्री

राज्यमंत्री
सत्यपाल सिंग - शिक्षण राज्यमंत्री गजेंद्र शेखावत - कृषी राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी - नगरविकास राज्यमंत्री नरेंद्र तोमर - ग्रामविकास राज्यमंत्री अल्फोन्स कन्ननाथनम् - पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा - संस्कृती आणि पर्यावरण राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल - अर्थ राज्यमंत्री

चैताली फाळके मृत्यू --सासूचा जामीन अर्ज फेटाळला

चैताली फाळके मृत्यु प्रकरण… उच्च न्यायालयानेही फेटाळला चैतालीच्या सासुचा अटकपुर्व जामीन अर्ज..!

पंढरपूर (प्रतिनिधी):- दि. 13/07/2017 रोजी पंढरपूरमधील मयत चैताली अभिजीत फाळके हिचा तिरंगा नगर येथील राहत्या घरी संशयास्पद मृत्यु झाला होता. या प्रकरणात आरोपी असलेल्या चैतालीच्या सासुचा अटकपुर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे . घटना घडून दोन महिने उलटत आले. पंढरपूर सत्र न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला तरी पंढरपूर शहर पोलिसांना हुंडाबळी सारख्या गंभीर गुन्हयातील आरोपी सापडत नाही . आता तर उच्च न्यायालयाने देखिल जामीन अर्ज फेटाळल्याने पंढरपूर पोलिस कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे .
याप्रकरणी मयताचे वडील यांनी पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे पती अभिजीत वसंत फाळके व सासु शोभा वसंत फाळके यांच्या विरुध्द फिर्याद दिली होती. तद्नंतर दि.28/07/2017 रोजी त्यांनी पुरवणी जबाबामध्ये सासरा वसंत नरहरी फाळके, दीर विश्‍वजीत वसंत फाळके व नणंद ऐश्‍वर्या उर्फ स्नेहल वसंत फाळके हे ही माहेरहून पैसे आणण्यासाठी चैतालीचा छळ करत होते. व सारखा मानसीक व शारिरीक छळ करीत होते. अशा स्वरुपाचा पुरवणी जबाब त्यांनी दिला होता. याप्रकरणी सदर आरोपींवरती हुंडाबळी या कलमाची नव्याने वाढ झाली होती.
याप्रकरणी यातील आरोपी क्रमांक दोन शोभा वसंत फाळके हिने पंढरपूर येथील सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनासाठी वकीलांमार्फत अर्ज दाखल केला होता. सरकारी वकील अ‍ॅड.सारंग वांगीकर यांनी हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. यातील आरोपी शोभा वसंत फाळके ही गुन्हा घडला तेंव्हा घटनास्थळी होती.’’ व इ. युक्तीवाद केला. तर मुळ फिर्यादीचे वकील अ‍ॅड. शशी कुलकर्णी व अ‍ॅड. ओंकार बुरकुल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, चैतालीची आत्महत्या नसून शांत डोक्याने तिची पुर्वनियोजित हत्या झालेली आहे. राजकीय दबावापोटी ही हत्या अतिशय हुशारीने आत्महत्या आहे असा बनाव केलेला आहे.’’ यावेळी मुळ फिर्यार्दीचे वकिलांनी कांही महत्वाची कागदपत्रे सादर करुन आरोपीच्या अटकपूर्व जामीनास तीव्र विरोध केला. व वेळोवेळी मयताच्या वडीलांनी अभिजीत फाळके यांच्या खात्यावर पैसे भरल्याच्या पावत्या मे. कोर्टाच्या रेकॉर्डवर आलेल्या आहेत. या प्रकरणी मे.कोर्टाने या सर्व बाबींचा विचार करुन व सरकारी वकील अ‍ॅड. सारंग वांगीकर व मुळ फिर्यादीचे वकील अ‍ॅड. शशी कुलकर्णी व अ‍ॅड. ओंकार बुरकुल अ‍ॅड. स्वप्नील सरवदे यांचा युक्क्तीवाद ग्राह्य धरुन पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिनंदन पाटांगणकर यांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. या निकालाच्या विरोधात मयत चैतालीची सासु आरोपी शोभा फाळके हिने अ‍ॅड. एम.एस. मोहिते यांच्या वतीने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो जामीन अर्ज सरकारी वकील एस.एस. कौशीक यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
या प्रकरणी सासु शोभा वसंत फाळके, सासरा वसंत नरहरी फाळके, नणंद ऐश्‍वर्या उर्फ स्नेहल वसंत फाळके हे तिघेही अद्याप फरार आहेत. मयताच्या कुटूंबियांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सोलापूर ग्रामीण चे पोलिस अधिक्षक विरेश प्रभु व पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पिंगळे यांचेकडे केली आहे. या प्रकरणाच्या बर्‍याचशा बाबी संशयास्पद आहेत.

चंद्रभागा नदीपात्रात बुडणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण

चंद्रभागा नदीपात्रात बुडणार्‍या महिलेचे वाचले प्राण

पंढरपूर : प्रतिनिधी

चंद्रभागा नदीपात्रात रात्री 9.30 च्या सुमारास बुडत असलेल्या महिलेला नगरपरिषद आपातकालीन व्यवस्थेच्या मदतीने वाचविण्यात आले.

पंढरपूर येथील जुना दगडी पुलावरून रात्री 9.30 च्या सुमारास महिला चालत जात असताना ती अजानक नदी पात्रात पडली. महिला पाण्यात पडल्याचे कळताच परिसरातील नागरीकांनी नगरसेवक विक्रम शिरसट यांना फोन वरून संपर्क साधला. त्यावेळी पंढरपूर नगरपरिषदेची आपत्तीव्यवस्थापनाचे पथक ताबडतोब तेथे पोहोचले. पथकातील कर्मचारी महावीर कांबळे व तानाजी कांबळे यांनी सदर बुडत असलेल्या महिलेला पाण्याच्या बाहेर काढले व त्या महिलेस तिचे नाव विचारले असता तिने तिचे नाव गुणम्मा हणमंत (वय-60), रा. जायफळ, नारायणपूर, राज्य अंधप्रदेश असे सांगितले. उजनी  धरणातून भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामगिरीमुळे सदरची महिला बजावली.

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...