Monday 4 September 2017

गरजू मुलांना मदत निधीचे वितरण

सुपे : जीवनात सुख व आनंदासाठी दुसऱ्यांना सुखी व आनंदी करा तरच जीवनात तुम्ही सुखी व आनंदी व्हाल. त्यासाठी गरिबांची सेवा करा कारण गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
पारनेर येथे व्हॉटसअपच्या माध्यामातून तयार झालेल्या पारनेरकर युवा विकास मंचाच्या वतीने गरीब व गरजू मुलांना मदत निधीचे वितरणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे, सहायक विक्रीकर आयुक्त मंजाभाऊ लंके, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया झावरे, श्रीरामपूरचे परिवहन अधिकारी पदमाकर भालेकर, अमोल धाडगे, बाळासाहेब पठारे, संजय वाघमारे, मुद्दसर सय्यद, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे, गट शिक्षणाधिकारी जयश्री कार्ले आदी मान्यवर ऊपस्थित होते.
यावेळी हजारे पुढे म्हणाले, अल्पावधीतच पारनेर युवा विकास मंचाने जनतेचा विश्वास संपादन केला आहे. या विकास मंचामुळे तरूणांना दिशा मिळाली आहे. जिवनात आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो याची जाणीव ठेवावी. विकास मंचाच्या वतीने मुलांना ऊपलब्ध करूण देण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा ऊपक्रमामुळे अनेक गरजू पारनेरकरांना मदत होणार आहे. त्या मुळे यातून तयार होणारे अधिकारी चारित्र्यावान तयार होतील असेही हजारे म्हणाले.
भोईटे म्हणाले, दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याचा या मंचाचा ऊपक्रम राज्यातील तरूणांसाठी आदर्श ऊपक्रम आहे. मंचाच्या वतीने ऊलब्ध करूण देण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेसाठीच्या सुविधांमुळे भविष्यात पारनेर तालुका प्रशासकिय अधिकारी बनविण्याचे केंद्र तयार होईल. येथील अभ्यासिकेचा फयदा तरूणांनी घ्यावा.ज्ञान मिळविण्याची साधने वाढली आहेत, मात्र त्याचा कसा वापर करावयाचा हे आपणावर आवलंबून आहे. पुढील काळात पोलीस भरतीसाठी पारनेर येथे केंद्र सुरू करू अेसेही भोईटे म्हणाले. या वेळी सुमारे 150 मुलांना शालेय साहित्य व आर्थिक मदत करण्यात आली. मुलांना मदत करण्याचे हे मंचाचे दुसरे वर्ष आहे. गतवर्षी दीड लाख रूपयांची मदत मुलांना करण्यात आली होती. या वेळी झावरे, लंके, धाडगे, वाघमारे, गोळे, आदींची भाषणे झाली. पपारनेर युवा विकास मंचाचे अध्यक्ष बाबुराव कदम यांनी प्रास्ताविक तर सुदाम दाते यांनी आभार मानले.
अण्णा हजारे यांनी पारनेर युवा विकास मंचच्या वतीने पारनेर येथे गरजू मुलांकरीता व स्पर्धा परीक्षेसाठी मोफत चालविण्यात येत असलेल्या वाचनालयासाठी साडेसात लाख रुपयांची पुस्तके व 10 लोखंडी कपाटे देण्याचे जाहीर केले. यापूर्वीही हजारे यांनी दीड लाख रूपयांची स्पर्धा परीक्षेसाठीची पुस्तके या वाचनालयास दिली आहेत.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...