Thursday 20 August 2020

परिसरातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी ज्युनिअर कॉलेज सुरु  करण्यात येत असल्याची माहिती एस.पी. पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.सतोष वलगे यांनी दिली . श्री.वलगे यांनी सांगितले की , नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात एस.पी. पब्लिक स्कूलने उल्लेखनीय यश मिळविले . पहिला विद्यार्थी 95 .40 टक्के ते शेवटचा विद्यार्थी 70 टक्के असा निकाल लागला . या भरघोस यशानंतर शाळेने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून तसेच शाळेतील पालक व नांदोरे परिसरातील पालकांच्या आग्रहास्तव एस.पी.परिवाराने उच्च माध्यमिक  विभाग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.पंढरपूर  तालुक्यातील सर्व पालकांना जाणवणारी शैक्षणिक पोकळी भरून काढण्यासाठी NEET, IIT-JEE, Entrance exam च्या पूर्व तयारी साठी पायल फाऊंडेशन संचलित एस.पी. उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात आले आहे.एस.पी. ज्युनिअर कॉलेजमध्ये अनुभवी प्राध्यापक वर्ग ,हैदराबाद, लातूर, पुणे, कोटा येथील गेस्ट लेक्चररची सोय उपलब्धहोणार आहे. तसेच सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मुलींसाठी सुरक्षित वातावरण, मुलींसाठी बस सुविधा, सीसीटिव्ही सुविधा यांसारख्या गोष्टींची पूर्तता केली जाणार आहे. एस.पी. ज्युनिअर कॉलेजला पालकांची प्रथम पसंती मिळेल व पालक व विद्यार्थी यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला जाईल, असा विश्वास संस्थापक अध्यक्षडॉ.वलगे यांनी व्यक्त केला.

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...