Friday 30 March 2018

पटवर्धन कुरोलीत व्यापारी गाळ्याचे उद्घाटन

पटवर्धन कुरोली, ता.३०:
पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या वतीने बांधण्यात आलेल्या व्यापारी गाळ्याचे उद्घाटन आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे होते.
यावेळी पंचायत समिती सभापती दिनकर नाईकनवरे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, वामन माने, जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब माळी, राजेंद्र पाटील, निखिलगीर गोसावी, विवेक कचरे, शिवाजी साळुंखे, राहुल पुरवत, मिलींद देशपांडे, पांडुरंग व्यवहारे, घनशाम काटकर, गणेश नाईकनवरे,पंढरीनाथ घुगे उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार श्री.परिचारक म्हणाले  की, भविष्याचा वेध घेऊन संस्थाना कारभार करावा लागेल.  .भविष्यकाळात कर्ज घेणे आणि देणे यावर संस्था सक्षम होणार नाहीत. त्यासाठी संस्थानी इतर व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे. जर पाच ते सहा वर्षानी कर्जमाफीची परिस्थिती निर्माण झाली तर संस्थेचा चांगला कर्जदार सुद्धा कर्ज भरणार नाही.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे म्हणाले की, या सोसायटी ने पन्नास लाख रुपये खर्च करुन व्यापारी गाळे बांधले आहेत. हा संस्थेने उत्पादन वाढीचा चांगला  निर्णय घेतला असून संस्थेने उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष समाधान नाईकनवरे उपाध्यक्ष विजय काळे, सचिव भालचंद्र उपासे, राजेंद्र तवटे, केशव पाटील, शंकर मलशेट्टी, नानासाहेब भांगे यांच्यासह माजी अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष, संचालक, सभासद, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक यांच्यासह शेवते, खेडभोसे, नांदोरे, आव्हे, तरटगाव, देवडे, खेडभोसे, पिराची कुरोली गावातील संस्थाचे अध्यक्ष, सचिव, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Thursday 29 March 2018

माणीक उपासे यांचा सत्कार


पटवर्धन कुरोली, ता.२९ : पटवर्धन कुरोली येथील शेतकरी माणीक बाबु उपासे यांना आदर्श गोपालक पुरस्कार मिळाल्याबद्दल पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी पंचायत समिती सभापती दिनकर नाईकनवरे, प्रणव परिचारक, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, माजी सदस्य  बाळासाहेब देशमुख, अॅड.सोमनाथ देशमुख उपस्थित होते. यावेळी डाॅ.पराग,  डाॅ. निंबाळकर, डाॅ. भिंगारे,  डाॅ. आसबे, डाॅ. होनराव, डाॅ. अनुसे, डाॅ. सुर्वे,  डाॅ. भापकर, डाॅ. काटकर,  डाॅ. देशमुख, डाॅ. मोहिते,  डाॅ. तांबडे, डाॅ. व्यवहारे, नितीन आसबे, धैर्यशील नाईकनवरे, राजेंद्र तवटे, केशव पाटील, कृष्णा उपासे, यासिन शिकलकर, धर्मराज खेडेकर, नागेश उपासे, धर्मराज काटकर, भिमराव काटकर, पंडित तवटे, महादेव नाईकनवरे, ज्ञानेश्वर नाईकनवरे यांच्यासह देवडे , खेडभोसे, आव्हे, पटवर्धन कुरोली,  तरटगाव या गावातील पशुपालक व ग्रामस्थ उपस्थित होते

पटवर्धन कुरोलीत दवाखान्याच्या नुतन इमारतीचे उदघाटन


पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ या दवाखान्याच्या नुतन इमारतीचे उदघाटन पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती दिनकर नाईकनवरेप्रणव परिचारकमाजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष मानेमाजी सदस्य  बाळासाहेब देशमुखअॅड.सोमनाथ देशमुख उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना २०१५-१६ मधून हि इमारत बांधण्यात आलीआहे. यावेळी बोलताना श्री.जानकर म्हणाले कीशेतकऱ्यांना जलद गतीने पशुसेवा मिळण्यासाठी शासनाच्या वतीने  पशुसंवर्धन विभागाची पशुसेवा रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.  तसेच यावेळी त्यांनी चारायुक्त शिवारे राबविण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डाॅ.पराग,  डाॅ. निंबाळकरडाॅ. भिंगारे,  डाॅ. आसबे, डाॅ. होनराव, डाॅ. अनुसेडाॅ. सुर्वे,  डाॅ. भापकर, डाॅ. काटकर डाॅ. देशमुखडाॅ. मोहिते डाॅ. तांबडे, डाॅ. व्यवहारेनितीन आसबेधैर्यशील नाईकनवरेराजेंद्र तवटे, केशव पाटीलकृष्णा उपासेयासिन शिकलकर, धर्मराज खेडेकरनागेश उपासेधर्मराज काटकरभिमराव काटकरपंडित तवटेमहादेव नाईकनवरेमाणिक उपासेज्ञानेश्वर नाईकनवरे यांच्यासह देवडे , खेडभोसे, आव्हे, पटवर्धन कुरोली,  तरटगाव या गावातील पशुपालक व ग्रामस्थ उपस्थित होते

फोटो अोळी: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ या दवाखान्याच्या नुतन इमारतीचे उदघाटन करताना पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यावेळी पंचायत समिती सभापती दिनकर नाईकनवरेप्रणव परिचारकमाजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष मानेमाजी सदस्य  बाळासाहेब देशमुख व ईतर

Sunday 25 March 2018

सचिन डावरे यांची निवड

पटवर्धन कुरोली, ता.२६:  ग्राहक प्रबोधन समिती
माढा तालुका अध्यक्ष  पदी सचिन बाबु डावरे यांची निवड करण्यात आली.  पंढरपूर येथे निवडीचे पत्र देताना ग्राहक समितीचे 
संस्थापक सुहास  सिदसर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख  राज गायकवाड,  महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख ज्योतीताई सुरवसे,जिल्हा अध्यक्ष गणेश नलावडे, तालुका अध्यक्ष महेष कवडे, जिल्हा सचिव शंकर गेजगे, महिला अाघाडी पंढरपूर तालुका उपाध्यक्ष शशिकला लोंढे,सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय खराडे,पंढरपूर शहर अध्यक्ष रमेश कांबळे, तालुका उपाध्यक्ष मारूती सुरवसे, अक्षय आठवले,दत्तात्रय घाडगे,ज्योतीताई घाडगे, अमोल लाळगे,पुणे जिल्हा अध्यक्षा आश्विनी कदम, किरण गेजगे, माढा तालुका प्रसिद्धी प्रमुख विजय डावरे, जोतीबा डावरे,पट कुरोली शाखा अध्यक्ष बापू डावरे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ग्राहक प्रबोधन समिती गाव येथे शाखा उपक्रम राबविणार : राज गायकवाड

पटवर्धन कुरोली, ता.२६: शासन स्तरावरील विविध विकास  योजना तळागाळातल्या सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र भर ग्राहक प्रबोधन समिती कार्यरत असुन यापुढे गाव ते शाखा उपक्रम राबविणार असल्याचे ग्राहक प्रबोधन समितीचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख राज गायकवाड यांनी  सांगितले. ते  पंढरपूर येथे तालुका कार्यकारिणी निवडी वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते  यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुहास सिद,  महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख ज्योतीताई सुरवसे,जिल्हा अध्यक्ष गणेश नलावडे, तालुका अध्यक्ष महेष कवडे, जिल्हा सचिव शंकर गेजगे, महिला अाघाडी पंढरपूर तालुका उपाध्यक्ष शशिकला लोंढे,सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय खराडे,पंढरपूर शहर अध्यक्ष रमेश कांबळे, तालुका उपाध्यक्ष मारूती सुरवसे, अक्षय आठवले,दत्तात्रय घाडगे,ज्योतीताई घाडगे, अमोल लाळगे,पुणे जिल्हा अध्यक्षा आश्विनी कदम, किरण गेजगे, माढा तालुका अध्यक्ष सचिन डावरे, माढा तालुका प्रसिद्धी प्रमुख विजय डावरे, जोतीबा डावरे,पट कुरोली शाखा अध्यक्ष बापू डावरे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्तविक अण्णा हजारे यांनी तर आभार जिल्हा संपर्क प्रमुख संजय खराडे यानी मानले.

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...