Saturday 28 July 2018

पटवर्धन कुरोलीत कायदेविषयक शिबीर

पटवर्धन कुरोली,ता. पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे  पंढरपूर विधी सेवा समिती,पंढरपूर अधिवक्ता संघ व ग्रामपंचायत पटवर्धन कुरोली यांच्या  वतीने  मोफत कायदेविषयक साक्षरता शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा सत्र  न्यायाधीश अ.ज.पारंगणकर, जिल्हा सत्र  न्यायाधीश एन.पी.कापुरे, जिल्हा सत्र  न्यायाधीश सी.एस.बाविसकर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड भगवान मुळे, उपाध्यक्ष ॲड सुकेशनी शिर्के, सचिव ॲड  संदीप सुरवशे, सहसचिव ॲड संतोष नाईकनवरे,ॲड सी.एस.बनसोडे, ॲड सिध्देश्वर चव्हाण, ॲड सागर गाजरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकॲड भगवान मुळे व सुत्रसंचालन ॲड संतोष नाईकनवरे व ॲड संदीप सुरवशे   यांनी केले तर आभार ॲड. बाळकृष्ण लामकाने यांनी मानले

Wednesday 25 July 2018

तेजस्वीनी मगर हिची निवड



पटवर्धन कुरोली, ता.२१: शेवते (ता.पंढरपूर)  येथील आदर्श प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थीनी तेजस्वीनी दादासाहेब मगर हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. २०१८-१९ या वर्षाकरिता केंद्रिय जवाहर नवोदय विद्यालया मार्फत घेण्यात आलेल्या या पात्रता प्रवेश परीक्षेमध्ये तिने हे उज्ज्वल यश मिळवले आहे. तिची जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गासाठी निवड झाली आहे. तिला शिक्षक  अमर पाटिल  व श्री. लेंगरे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्रीमती वाठारे, केंद्रप्रमुख श्री.घोडके,मुख्याध्यापक श्री.तोंडले यानी अभिनंदन केले

Monday 23 July 2018

पटवर्धन कुरोली त कडकडीत बंद

पटवर्धन कुरोली,ता.२४ ंं   मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंद चा ईशारा दिला होता. या आंदोलनाला प्रतिसाद देत  पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला


मराठा समाजाला आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या या आंदोलना दरम्यान काकासाहेब शिंदे युवकाने गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेतली होती. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंद ची हाक  दिली होती.  या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पटवर्धन कुरोली ग्रामस्थाच्या वतीने गावबंदचे आवाहन केले
होते  त्यानुसार मंगळवारी सकाळी मराठा समाजातील बांधव व ग्रामस्थानी एकत्र येत  काकासाहेब शिंदे या युवकाला श्रध्दांजली वाहीली.  त्यानंतर ग्रामस्थाच्या अवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी बांधवांनी कडकडीत बंद पाळला जोपर्यंत मराठा क्रांती मोर्चातील मागण्या शासन मान्य करीत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. 

नांदोरेत बालदिंडी सोहळा

नांदोरे . पंढरपूर येथील एस.पी. पब्लिक स्कूलच्यो प्रांगणामध्ये विद्यार्थ्यानी केलेला गोल रिंगण सोहळा                                     
पटवर्धन कुरोली, ता. २३ नांदोरे ता. पंढरपूर येथील पायल फाऊंडेशन संचलित एस.पी. पब्लिक स्कूलमध्ये बालदिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये काढण्यात आली. यावेळी बालचमूंनी  वारकऱ्यांचा वेश परिधान करुन हातात भगव्या झेंड्याबरोबरच जनजागृतीपर घोषणा देत गावातून पालखीसह फेरी मारली. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल- रखुमाई,
संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम, संत नामदेव, वासुदेव, संत मुक्ताबाई, संत जनाबाई यांचे वेश परिधान करुन पालखी सोहळ्याची शोभा वाढवली यावेळी या सोहळ्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक, पालक व परिसरातील अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखी मध्ये सर्वात आकर्षण ठरले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशामध्ये व मावळ्यांच्या वेशामध्ये असलेली क्र. १ ची दिंडी. यावेळी सर्व दिंड्यांना क्रमांक देण्यात आले होते.एकूण बारा दिंडया सहभागी असलेल्या या पालखी सोहळ्यामध्ये मधोमध फुलांची सजावट केलेली पालखी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सोहळा छत्रपती शिवाजी चौकामध्ये आल्यानंतर स्कूलची दिंडी, संत एकनाथ महाराज दिंडी व संत चौरंगीनाथ महाराज दिंडी या दिड्यांचा त्रिवेणी संगम झाला यावेळी सर्व परिसर विठ्ठल- विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम या गजराने विठ्ठलमय झाला होता. यानंतर बाल वारकरी, दिंडीतील वारकरी व जमलेले अबालवृद्ध विठ्ठलभक्त यांच्यामध्ये फुगडयांचा खेळ रंगला यावेळी सर्वजण भक्तीरसात न्हाऊन निघाले. सोहळा स्कूलच्या   प्रांगणामध्ये आल्यानंतर गोल रिंगण सोहळा पार पडला व नंतर बालवारकऱ्यांना अन्नदान करुन सोहळ्याची सांगता करण्यात आली. सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सूरज अलगुडे, अमोल तेली, अमरनाथ इंगोले, सोमनाथ ढावरे, अमोल कचरे, शहाजी साठे, अजित पवार, राहूल मिसाळ, सोमनाथ वलगे, हणुमंत टरले, शशिकांत वळेकर, योगेश व्यवहारे, बंडू शिरसट, सचिन कदम, बंडू मुटकुळे , आकाश शिंदे, बंडू कांबळे, आण्णा सावंत ,सौ. सिमा पिसे, रत्नमाला जानकर, विद्या कोरके, सुजाता पवार, ज्योती भोसले, मिना माने, विद्या पांढरे, सोनाली बोबडे, सोनाली देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले.

Friday 20 July 2018

सोहळ्यातील वारकर्याना जेवण

पटवर्धन कुरोली, ता.२०: पिराची कुरोली (ता.पंढरपूर) येथे जगद््गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्याना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पंढरीनाथ लामकाने यांच्या कडून

जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. .  प्रारंभी  पालखी सोहळ्याबरोबर आलेल्या वारकर्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.   गेल्या पंधरा वर्षापासुन श्री.लामकाने यांच्याकडून वारकर्यासाठी प्रत्येक वर्षी जेवणाची व्यवस्था करण्यात येते. यावेळी ही सर्व वारकर्याना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.  यावेळी विठ्ठल चे माजी संचालक पंढरीनाथ लामकाने, माजी सरपंच तुकाराम माने, गणपत लामकाने,बापूसाहेब लामकाने, केरबा लामकाने उपस्थित होते. राजे ग्रुपच्या कार्यकर्त्यानी जेवण वाढण्याचे परिश्रम घेतले.

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...