Saturday 28 August 2021

ग्रामीण कृषी जागरुकता कार्यक्रम


 पटवर्धन कुरोली, ता. २८: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम २०२१-२२ चे आयोजन करण्यात आले होते.                                                                            यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्ण श्रीराम कृषी महाविद्यालय पाणीव (ता.माळशिरस) येथील चतुर्थ वर्षात शिकणारी विद्यार्थिनी  शुभांगी मुंगुसकर यांनी या कार्यक्रमा अंतर्गत येथील शेतकऱ्यांना ज्वारी पिकासाठी  रासायनिक व जीवाणू संवर्धनाचा वापर करुन बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. शेतकर्यांनी ज्वारी पेरणी करताना बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहण शुभांगी मुंगुसकर हिने यावेळी उपस्थित  शेतकर्याना केले.ज्वारीची उगवण क्षमता वाढावी, पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढावी, हेक्टरी उत्पादन वाढीस मदत व्हावी यासाठी बियाणावर प्रथम सल्फर पावडर २० ग्रॅम प्रति किलो बियाणास लावून त्यानंतर स्युडोमोनास फ्लोरोसेन्स ५० मिली प्रती पाच किलो बियाणासाठी बीज प्रक्रिया करण्याची गरज असते. शिवाय अशा पिकाचे रोगापासून संरक्षण होते. व उत्पादनात भरघोस वाढ होते. त्यासाठी बीजप्रक्रिया हि अत्यावश्यक असल्याची माहिती मुंगुसकर हिने यावेळी दिली. यासाठी तिला श्रीराम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. हरी हाके, कार्यक्रम अधिकारी डाॅ. जबिना शेख, विषयतज्ञ प्रो. वाघ सर यांनी विविध उपक्रमांत मार्गदर्शन केले.

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...