Friday 17 January 2020

पंचरत्नमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
फोटोओळी:  पंढरपूर येथील पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ.प.वा.ना.उत्पात व इतर.
पंढरपूर ,ता.१७ : तामिळनाडू-चेन्नई येथे झालेल्या १५ व्या राष्ट्रीय अबॅकस चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये पंढरपूर येथील पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूलमधील चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे विश्वस्त ह.भ.प. वा. ना. उत्पात यांच्या हस्ते करण्यात आला.
तामिळनाडू येथे झालेल्या १५ व्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये देशभरातून तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये पंढरपूरच्या पंचरत्न इंग्लिश मिडियमच्या ओमराज सतीश घंटे (प्रथम), वैष्णवी मोहन डावरे (द्वितीय), सृष्टी सतीश घंटे (तृतीय) तर समर्थ कलाप्पा जमादार (चतुर्थ) यांनी राष्ट्रीय स्तरावर शाळेचे नाव उज्वल केले आहे. त्यामुळे संस्थेचे विश्वस्त ह.भ.प. वा. ना. उत्पात यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी वा. ना. उत्पात यांनी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये संस्थेसह पालकांची जबाबदारी महत्त्वाची असते, ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्याचे सांगितले. भविष्यात विद्यार्थ्यांना आणखी स्पर्धेमध्ये यश संपादन करण्यासाठी शाळेच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी एम. सी. पाठक, व्ही. जी. भाळवणकर, एस. आर. पटवर्धन, मुख्याध्यापिका सुनिता मोहोळकर, माजी नगरसेवक सतीश घंटे, सहशिक्षिका शिल्पा कुलकर्णी, सुचिता हजारे, श्रीवल्लभ उपळकर, कलाप्पा जमादार, गीता घंटे, रोहिणी डावरे आदी उपस्थित होते.

वसंत थिटे यांचे निधन

पटवर्धन कुरोली, ता. १७: भोसे (ता.पंढरपूर) येथील वसंत दगडु थिटे (वय ८०) यांचे शुक्रवारी (ता.१७) पहाटे तीन वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात दोन मुले, एक विवाहित मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. भोसे येथील  ठेकेदार व भारत गॅस कंपनी चे वितरक भारत थिटे व परमेश्वर थिटे यांचे ते  वडील होते. तिसरा दिवस रविवारी (ता.१९) सकाळी सात वाजता भोसे येथे होणार आहे.

Friday 10 January 2020

राष्ट्रवादी पदवीधर संघाची बैठक

पंढरपूर, ता.१०:   सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघाची बैठक पंढरपूर येथे पार पडली.   पदवीधर संघात झालेली नाव नोंदणी व पुढे करण्यात येणाऱ्या नाव नोंदणी विषयी चर्चा करण्यात अाली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुग्रीव कोळी यांनी नाव नोंदणी साठी सहकार्य केलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निवडणूकीच्या अगोदर  सहा महिने जाहीर करावा अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,  खासदार सुप्रीया सुळे यांच्याकडे करण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी पदवीधर चे जिल्हाध्यक्ष सुग्रीव कोळी,  माढा विधानसभा अध्यक्ष संजय डुबल,  सांगोला विधानसभा अध्यक्ष ओंदुबर डुबल यांनी विचार व्यक्त केले. यावेळी करमाळा अध्यक्ष दत्तात्रय मोरे, सांगोला अध्यक्ष अमोल सावंत, अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस जुबेर बागवान, यांच्यासह विक्रम वाघमारे, आबा नाईकनवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.  अल्पसंख्यांक  युवक चे कार्याध्यक्ष साजिद बागवान यांनी अाभार मानले.

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...