Friday 20 April 2018

उज्वला दिवस साजरा

पटवर्धन कुरोली, ता. २०: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे ग्रामस्वराज्य मोहिमेच्या अंतर्गत उज्वला दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी निवासी नायब तहसीलदार श्री.तिटकोर,    पुरवठा अधिकारी श्री. भडंगे, वैनगंगा बँकेचे व्यवस्थापक श्री. भागवत,  शिवज्योती भारत गॅस वितरक मेघाली भारत थिटे,  पटवर्धन कुरोली च्या सरपंच महादेवी तवटे, उजनी वसाहत च्या सरपंच सोनाली साखरे, प्रमोद थिटे,शिवज्योती गॅस चे व्यवस्थापक श्री.जाधव उपस्थित होते.    यावेळी सुनिता सर्जे, सुमन लावर, सिंधू मोरे, मंगल  कारंडे,  या लाभाधिकार्याना  उज्वला गॅस योजनेअंतर्गत नवीन  गॅस साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी सॊ.थिटे यांनी  गॅस वापरण्याचे प्रात्यक्षिक महिलाना  देण्यात आले. तसेच शासनाकडून मिळणाऱ्या  उज्वला गॅस विषयी माहिती दिली. यावेळी   सिकंदर शेख दादासाहेब साखरे, रतीलाल बनसोडे, अनिल कारंडे, कुमार तोरणे, दत्तात्रय राऊत यांच्यासह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या

Sunday 15 April 2018

यात्रेची उत्साहात सांगता

पटवर्धन कुरोली: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) ग्रामदैवत सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमीत्त् सासनकाठी व पालखी सवाद्य मिरवणूक काढताना भाविक.                                         पटवर्धन कुरोली, ता.१५: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) ग्रामदैवत सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा मोठया उत्साहात व शांततेत पार पडली.  यात्रेनिमीत्त् मंदिरावर विद्युत रो़षणाई करण्यात आली होती. मंदिरासमोर भव्य मंडप घालण्यात आला होता. शुक्रवार (ता.१३) रोजी सायंकाळी पाच वाजता सासनकाठी व पालखी वाजत गाजत मंदिराकडे नेण्यात आली. शनिवार (ता.१४) रोजी सकाळी देवाला अभिषेक घालण्यात आला.दुपारी आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर देवाच्या सासनकाठी व पालखी ची मिरवणूक मोठ्या उत्साहात तोफांच्या आतष बाजीत, नगार्याच्या सनई सुराच्या वाद्यात गावातून काढण्यात आली. सिध्दनाथाच चांगभले च्या गजरात, भंडारा व खोबर्याची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. गावात घरोघरी मोठ्या उत्साहात सासनकाठीचे व पालखीचे स्वागत करण्यात आले.मिरवणूक झाल्यानंतर मंदिरासमोर प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी दिवसभर भाविकानी मोठी गर्दी केली  होती. यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामस्थानी परिश्रम घेतले.

Friday 13 April 2018

पटवर्धन कुरोली प्रशालेत डाॅ. बाबासाहेब अांबेडकर जयंती साजरी

पटवर्धन कुरोली, ता.१४: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर)  येथील पटवर्धन कुरोली प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी प्रतिमेचे पूजन प्रभारी प्राचार्य श्री. सुधाकर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.देशमुख, श्री.सुतार,श्री.तोरणे,श्री.साबळे,श्री.जवळेकर, श्री.बाबर,श्री.खेडेकर, यांच्यासह विठ्ठल नाईकनवरे, सिध्दार्थ चव्हाण, विजय कोळी, बजरंग माने, बाबू डावरे ,अतिश तवटे, मोहन कोळी यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Wednesday 11 April 2018

पटवर्धन कुरोलीत सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा

पटवर्धन कुरोली, ता.११: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर)  येथील सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा शुक्रवार (ता.१३) पासून होत असून यात्रेनिमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (ता.१३) रोजी सकाळी देवाला महाअभीषेक, नित्यनियमाने पूजा होणार केली जाईल. सायंकाळी पाच वाजता सासनकाठी व पालखी गावातून मंदिराकडे आणली जाणार आहे. रात्री नउ वाजता  सिद्धनाथ जोगेश्वरी यांच्यावरील गाण्याचा कार्यक्रम होईल. शनिवार (ता.१४) हा यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी दिवसभर देवाला नैवेद्य वाहण्याचा कार्यक्रम होईल.  दुपारी बारा वाजता आरती नंतर पालखी व सासन काठीची भव्य मिरवणूक सन ई सुराच्या वाद्यातील काढली जाणार आहे. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Tuesday 10 April 2018

मुंबई आझाद मैदानावर उपोषण सुरू

पटवर्धन कुरोली : करकंब (ता. पंढरपूर) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त नागरिकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. दीपक पाटील यांना निलंबीत करावे, ही प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांची आहे.

करकंब पोलीस ठाण्याचे स.पो.नि. दीपक पाटील यांच्या विरोधात जिल्हा पोलीस प्रमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर यांच्याकडे हेतुपुरस्सर गुन्हे दाखल करणे, सावकारकीच्या तक्रारी, हप्ता घेणे, सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणे, अवैध धंद्यांना अभय देणे, करकंब पोलीस ठाण्यात मागील अनेक वर्षापासून ठाण मांडूनही बदली केल्यानंतर मॅटमध्ये जाऊन अनेकदा बदली रद्द करणे, करकंब पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी गोळा केलेली बेहिशोबी मालमत्ता याची सीबीआयमार्फत चौकशी करणे आदी विषयांच्या तक्रारी राज्याचे पोलीस प्रमुख, गृहमंत्री, गृहराज्यमंत्री यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. याशिवाय आव्हे (ता. पंढरपूर) येथील पाटबंधारे विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे झालेले शेतकºयांचे नुकसान पंढरपूर-टेंभुर्णी महामार्गाचे सुरू असलेले निकृष्ठ दर्जाचे काम याबाबत चौकशी करण्याची मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे.

मंगळवार दि. १० एप्रिल पासून मुंबई आझाद मैदानावर आर. आर. पाटील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोपट कडलासकर, महंमद पठाण, अतुल भोसले आदी नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. करकंबसारख्या पोलीस ठाण्याचा विषय मुंबई आझाद मैदानातील उपोषणापर्यंत पोहोचल्याने मुंबईसह सोलापुरात एपीआय दीपक पाटील यांच्या कारभाराविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Thursday 5 April 2018

चेअरमन पदी पांडुरंग नाईकनवरे तर व्हा.चेअरमन पदी दत्तात्रय साळुंखे

पंढरपूर, ता. ०६: पंढरपूर येथील पंढरपूर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पांडुरंग उत्तम  नाईकनवरे यांची तर उपाध्यक्ष पदी दत्तात्रय विठ्ठल  साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली.  नुकतीच पंढरपूर नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध निवड झाली होतीनवीन अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक पी.टी.घुगे यांनी नुतन संचालकाची बैठक बोलाविली होती.  यावेळी सुधाकर कवडे, सिद्धेश्वर उपासे, मोहन कोळी, दत्तात्रय मोरे, अनिल कारंडे,पांडुरंग नाईकनवरे, दत्तात्रय साळुंखे, रोहिणी डावरे, सुनिता जाधव हे उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष पदासाठी पांडुरंग नाईकनवरे तर उपाध्यक्ष पदासाठी दत्तात्रय साळुंखे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. घुगे यांनी जाहीर केले. यावेळी नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष,  संचालक यांचा सत्कार श्री. घुगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यवस्थापक मोहन डावरे, अॅड. संतोष नाईकनवरे,  अविनाश ठोंबरे, अजय जवारे, मनोहर नारायण उपासे उपस्थित होते.

रणजित लामकाने यांची निवड

पटवर्धन कुरोली, ता.०५: पिराची कुरोली (ता.पंढरपूर) येथील रणजित पांडुरंग लामकाने यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या पंढरपूर तालुका संघटकपदि निवड करण्यात आली आहे. त्यांना  सांगोला येथे दिपक आबा साळूंखे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला ताई गायकवाड, तालुकाध्यक्ष दीपक दादा पवार, प्रफुल गायकवाड, समाधान सुरवार, बापू भागवत,सुरेश लामकाने,  कुमार लामकाने, नितीन कॊलगे  उपस्थित होते.  यावेळी रणजित लामकाने यांचा सत्कार दिपक आबा साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला.

चित्रकला स्पर्धेत यश

पटवर्धन कुरोली, ता.०५: दैनिक सकाळ-गोमंतक आयोजित राज्य पातळीवरील चित्रकला स्पर्धा २०१७ चे बक्षीस वितरण पटवर्धन कुरोली प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले. यावेळी विभागीय स्तरावरील उत्तेजनार्थ बक्षीस प्राजक्ता तोंडले,  केंद्र स्तरावरील प्रथम पारितोषिक प्राजक्ता तोंडले, दिशा तवटे, दिव्या नाईकनवरे, प्रगती भोई या विद्यार्थ्यांना रोख रक्कम तसेच प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी प्रभारी प्राचार्य श्री.जाधव, शिक्षक साबळे,श्री. देशमुख सर, श्री.बाबर, बजरंग माने, सकाळ चे पत्रकार मोहन कोळी उपस्थित होते.

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...