Monday 28 January 2019

खड्डे बुजविलेल्या रस्त्यांची दुरवस्था कायम

एक महिन्यांपूर्वी खड्डे बुजविण्याचा सोपस्कार पूर्ण केला. आलेला निधी खर्च केला; परंतु, खड्डे मात्र जैसे थे आहेत. . शहरी भागातील नागरिकांबरोबरच ग्रामस्थही खड्ड्यांमुळे जेरीस आले आहेत. एकाही गावाला जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघात वाढत असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तरीही प्रशासन गप्प आहेशहरातील विविध भागातील खड्डेयुक्त रस्त्यांमुळे वाहन चालकांची दमछाक होत आहे. संत सावतामाळी चौक ते वळण रस्त्यापर्यंत असलेल्या रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालक त्रस्त आहेत. याशिवाय तालुक्यातील मानोली गावाला जाणाऱ्या रस्त्यावर एवढे खड्डे झालेत की, रस्ता नेमका कुठे आहे? हेच समजत नाही. वर्षानूवर्षापासूनची ही स्थिती असून, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस दुरवस्थेत भर पडत आहे. परिणामी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेतपरभणी ते फाळेगाव या राज्य रस्त्यावर मुख्य बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. अनेक दिवसांपासून ही परिस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने ढुंकूनही पाहिले नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने रस्त्याच्या दुरवस्थेत भर पडली आहे. खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारक, पादचाऱ्यांना कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या खड्ड्यांची दुरुस्ती करावी,नुसार बहुतांश रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे कामही पूर्ण करण्यात आले; परंतु, कामाचा दर्जा समाधानकारक राहिला नसल्याने खड्डे बुजविलेल्या रस्त्यांवर आता जैसे थे स्थिती पहावयास मिळत आहे. परिणामी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. विशेष म्हणजे खड्डे बुजविण्याचे काम विशिष्ट कंत्राटदारांनाच देण्यात आले आहे. त्यामुळे केलेल्या कामांची पडताळणी काटेकोरपणे केली गेली नाही.कामाचा दर्जा समाधानकारक राहिला नसल्याने खड्डे बुजविलेल्या रस्त्यांवर आता जैसे थे स्थिती पहावयास मिळत आहे़ परिणामी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत़ विशेष म्हणजे खड्डे बुजविण्याचे काम विशिष्ट कंत्राटदारांनाच देण्यात आले आहे़ त्यामुळे केलेल्या कामांची पडताळणी काटेकोरपणे केली गेली नाही़ आता पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत़ त्यामुळे ज्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदाराला दिले होते़, त्या कंत्राटदाराने सदरील काम केले किंवा नाही? याबाबतही आता ठामपणे सांगता येत नाही़ परिणामी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी केलेला जवळपास २५ कोटी रुपयांचा खर्च वाया गेला आहे़

Saturday 26 January 2019



पटवर्धन कुरोली,ता.१६  पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूऱ) परीसरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा  करण्यात आला

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरसिंहवाडी
येथे ध्वजारोहण तंटामुक्ती अध्यक्ष मा. धैर्यशील नाईकनवरे यांच्या हस्ते  करण्यात आले. डिजिटल वर्गाचे उद्घाटन श्री.नाईकनवरे  यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी   नाईकनवरे ,उपाध्यक्ष मारुती मोरे ,सदस्य बापू मगर व हनुमंत  कौलगे ,तुकाराम नाईकनवरे,नागनाथ  नाईकनवरे  उपस्थित होते. दामोदर येरडलावार यांनी प्रास्ताविक केले. गणेश दिवे  यांनी आभार मानले

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचकरवस्ती
येथे ध्वजारोहन शुभांगी जवळेकर यांच्या  हस्ते करण्यात आले.  प्रास्तविक मुख्याध्यापक धनाजी बोबडे यांनी केले.यावेळी शिवाजी उपासे,  शहाजी कोळस ,गोपाळ नाईकनवरे, नागनाथ नाईकनवरे, नवनाथ नाईकनवरे, बाळू डावरे, फिरोज आतार उपस्थित होते. कैलास सोनवणे यांनी  आभार मानले

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरटगांव (भोसे)               येथे   ध्वजारोहण  संजय कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले .सदर कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी टिपरी कवायत ,भाषणे ,देशभक्ती गीते ,नृत्य यांचे सादरीकरण केले .प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री .संतोष काळे यांनी व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .विजयकुमार जवळेकर यानी केले .यावेळी धन्यवान पिंड,  नाना आयरे ,शरद हाके ,सर्जेराव पवार ,निखिल पवार यांनी आपले विचार मांडले .सदर कार्यक्रमासाठी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते .

एस.पी. पब्लिक स्कूल, नांदोरे

येथे  ध्वजारोहण आशा अलगुडे  यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून गीतांजली भोसले उपस्थित होत्या.   त्यानंतर सैनिक वेशामध्ये उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी संचलन सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले यानंतर विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेसह गावातून प्रभातफेरी काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी गीते व मनोगते सादर केली.            कार्यक्रमासाठी स्कूलचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, स्वाती वाघ, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक सुरज अलगुडे, माता पालक प्रतिनिधी रेश्मा शेवतकर यांच्यासह शिक्षक, पालक ,ग्रामस्थ व विद्यार्थी  उपस्थित होते.

आदर्श प्राथमिक व् माध्यमिक विद्यालय शेवते
येथे ध्वजरोहन गजानन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डाॅ .सौ.तळेकर, डॉ. श्री.औदुंबर तळेकर, संपत जवळेकर ,मुख्याध्यापक श्री.तोंडले  उपस्थित होते. क्रीड़ा मार्गदर्शक श्री.शंकर तोंडले यांचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.लोखंडे  यांनी तर श्री.लेंगरे यांनी  वार्षिक आढावा सादर केला. श्री.करपे आभार मानले. तर सूत्रसंचालन श्री.संतोष पाटील यानी केले

Saturday 19 January 2019

एस.पी स्कूलमध्ये भरला आनंद बाजार पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद

पटवर्धन कुरोली, ता.१९:  नांदोरे (ता.पंढरपूर) येथील एस.पी.पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्याच्या निमित्ताने आनंद बाजार भरविला. विद्यार्थ्यांनी विविध वस्तू व भाजीपाला विक्री करीत खरेदी-विक्रीचा अनुभव घेतला. भाजीपाला खरेदीसाठी पालक व गावकऱ्यांनी उत्साह दाखविला. विद्यार्थ्यांच्या बाजारात सर्वात जास्त गर्दी पहायला मिळत होती ती म्हणजे खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर. सर्व ग्रामस्थांनी या बाजाराला भेट देऊन वस्तू विकत घेत विद्यार्थ्यांना उत्तम प्रतिसाद दिला.  विशेष म्हणजे या आनंद बाजारात अवघ्या तीन तासात सुमारे  ५२४००रुपयांची उलाढाल झाली.
 यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी व्यवहार ज्ञानाचे धडे गिरविले. शाळेतील इयत्ता पहिली ते नववीच्या  विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला.  एकशे नव्वद विद्यार्थ्यानी भेंडी, वांगी, मेथी, कोथिंबीर, भोपळा, शेपू, पालक, टोमॅटो, आळुची पाने, लिंबू, आवळा अशा विविध प्रकारच्या भाज्या, गुलाबजाम, , ढोकळा, भजे, वडा, समोसे, भेळ  , इमिटेशन ज्वेलरी, शैक्षणिक साहित्य  विक्रीस आणले होते. या बाजाराचे उदघाटन विजय भिंगारे व प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध  खाद्य पदार्थ व भाजीपाला खरेदी करण्यासाठी पालक व गावकऱ्यांची झुंबड उडाली होती. पाच, दहा, वीस रूपयांत भाज्या मिळत असल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर खरेदीचा उत्साह पहावयास मिळाला. 
    आनंद बाजार संकल्पनेतून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाचे शिक्षण मिळाले. प्रकल्प  संचालिका वासंती वलगे,मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण ,  सहशिक्षिका पवार,देशमुख ,पिसे, जानकर, भोसले, मुलाणी,बोबडे,पांढरे, कोरके, माने व सह शिक्षक श्री.कचरे, श्री.तेली,श्री.ढावरे, श्री.थिटे,श्री.अलगुडे,श्री.साठे,श्री.पवार, श्री.टरले यांच्या संकल्पनेतून आनंद बाजार साकारला. या बाजारास भेट देत संस्थचे अध्यक्ष डाॅ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज सातुरे यांच्यासह ग्रामस्थ व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करीत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी   शशिकांत वळेकर,योगेश व्यवहारे, बंडू शिरसट, बंडू मुटकुळे, सचिन कदम, आकाश शिंदे, बंडू कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी संस्थेच्या वतीने माता पालकांसाठी हळदी कूंकू कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी दोनशेच्यावर मातापालक उपस्थित होत्या .

Saturday 12 January 2019

खेडभोसेत जिजाऊ जयंती साजरी

खेडभोसे विद्यालय खेडभोसे मध्ये जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कुंडलिक पवार सर व प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव माने सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
विद्यार्थी भाषणा मध्ये ओम पवार, गौरी साळुंखे, गणेश पवार, सानिका पवार, मृणाली जमदाडे व प्रत्यंजा पवार इ.आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगतामध्ये श्री झांबरे सर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद आणि चार हुतात्मा याबद्दल अनमोल माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात श्री पवार सर यांनी कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने  राबविला त्याबद्दल इयत्ता आठवी चे वर्गशिक्षक ए.जी.भोसले सर व विद्यार्थ्यांचे 
अभिनंदन केले. आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मयुरी बंडू पवार व प्रत्यंजा बाळासाहेब पवार यांनी केले. अनुमोदन कु.वैष्णवी शंकर दिक्षीत हिने दिले.आभार प्रदर्शन कु.सृष्टी सुनिल चव्हाण हिने सुरेख शब्दांमध्ये केले.
वन्देमातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Tuesday 8 January 2019

पाणीपुरवठा योजनेच काम निकृष्ठ.

पटवर्धन कुरोली - पटवर्धनकुरोली ता पंढरपूर येथील दलित वस्ती मध्ये सुरू असलेले पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असून ठेकेदारावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

पटवर्धनकुरोली येथील दलित वस्ती मध्ये  पाणी पुरवठा योजनेच काम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या वर्षांपासून दलित वस्तीमध्ये पाण्याची सोय नव्हती. ग्रामपंचायत व जिल्हापरिषद प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा देताच पाणी पुरवठा योजनेच काम सुरू झाले. मात्र ते ही निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. .
पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात येत असलेले साहित्य कमी प्रतीच वापरून नागरिकांची दिशाभूल सुरू आहे. या योजनेच्या पाईपलाईन दोनफुट खोल चारीतून घेणे बंधनकारक आसताना ती चारी अर्धा फूट ही खोल घेतली जात नाही, ग्रामपंचायतीची  विकास कामे विद्यमान पदाधिकारीच करीत असल्याने कामाचा दर्जा घसरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
पंचायत समिती प्रशासनाने या सर्व कामाची चैकशी करावी, बोगस काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा 26 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा रिपाई चे लक्ष्मण डावरे, नामदेव डावरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदव्दारे दिला आहे
चॊकट--
या बाबत आपण स्वता कामाची पाहणी करू, या योजनेचे काम स्वता ग्रामपंचायत करत आहे बिलं आजून काढलेली नाहीत कुणाच्या तक्रारी असतील तर त्यांच्या समक्ष त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू
- सुधीर गोरे
शाखा अभियंता पाणीपुरवठा विभाग पंढरपूर

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...