Saturday 23 December 2017

पटवर्धन कुरोली प्रशाला येथे केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न.

नांदोरे शाळेला सर्वसाधारण विजेतेपद..
पटवर्धन कुरोली केंद्राची क्रीडा स्पर्धा प्रशालेमध्ये संपन्न झाली.यावेळी स्पर्धेचे उद् घाटन पंचायत समिती पंढरपूर चे सभापती मा.श्री.दिनकरभाऊ नाईकनवरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी सर्व संघाना शुभेच्छा दिल्या.यावेळी पटवर्धन कुरोली प्रशालेचे प्रभारी प्राचार्य सुधाकर जाधव सर ,नामदेव देशमुख सर ,क्रीडा शिक्षक सतीश बाबर सर व अन्य मान्यवर उपस्थित होते ..
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे ...
लहान गट--खो -खो मुले-नांदोरे विजेता,पटवर्धन कुरोली उपविजेता.खो-खो मुली-नांदोरे विजेता,पटवर्धन कुरोली उपविजेता. कबड्डी -मुले-नांदोरे विजेता,बनसोडे वस्ती उपविजेता.कबड्डी-मुली-आवे विजेता,शेवते उपविजेता.लंगडी मुले-नांदोरे विजेता,पटवर्धन कुरोली पुनः उपविजेता.लंगडी मुली-नांदोरे विजेता,आवे उपविजेता.
मोठा गट--खो-खो मुले-नांदोरे विजेता,शेवते उपविजेता.खो-खो-मुली-नांदोरे विजेता,आवे उपविजेता.कबड्डी- मुले-नांदोरे विजेता,आवे उपविजेता. कबड्डी मुली-आवे विजेता,नांदोरे उपविजेता.लंगडी मुले -नांदोरे विजेता,शेवते उपविजेता.लंगडी मुली-नांदोरे विजेता,शेवते उपविजेता.
सर्व साधारण विजेतेपद जि.प.शाळा नांदोरे शाळेने पटकावले.
वैयक्तीक स्पर्धा निकाल
लहान गट-100मीटर धावने मुले-शुभम करांडे नांदोरे प्रथम,प्रणव पाटील दुसरा,आदित्य काटकर तिसरा पटवर्धन कुरोली.मुली-तेजश्री करांडे प्रथम नांदोरे,धनश्री पाटील दूसरी कदम वस्ती,निरांजली शिंदे तिसरी देवडे.
200मीटर धावने मुले -शुभम करांडे प्रथम नांदोरे,समीर कदम दुसरा कदमवस्ती , राहूल जाधव तिसरा देवडे.मुली-तेजश्री करांडे प्रथम नांदोरे ,ऋतूजा शिंदे दूसरी देवडे
मोठा गट-100मीटर धावने-स्वप्निल कदम प्रथम नांदोरे,विश्वास चव्हाण दुसरा आवे.निकिता करांडे प्रथम नांदोरे ,शुभांगी रोडगे दुसरी आवे.200मीटर धावने वैभव गायकवाड नांदोरे प्रथम,कोमल कदम  प्रथम नांदोरे .
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पांडुरंग नाईकनवरे सर चेअरमन प्राथ.सोसायटी ,धनाजी बोबडे सर  व्हा .चेअरमन प्राथ.सोसायटी,रामचंद्र केंगार सर,आनंद कचरे सर ,बाळासाहेब पवार सर,शरयु कुलकर्णी मॅडम ,शिवाजी व्यवहारे सर,दिनकर अवघडे सर,सोमनाथ दबडे सर ,सतीश शिंदे सर ,दिलवरसिंग पावरा सर ,सचिन बाबर सर ,संतोष काळे सर,अनिल धायगुडे सर,विजयकुमार जवळेकर सर व पटवर्धन कुरोली प्रशालेमधील कर्मचारी माने,कोळी,चव्हाण  यांचे लाखमोलाचे सहकार्य मिळाले .....

ग्रामपंचायत ने केला जि.प.शाळेचा गौरव



 पटवर्धन कुरोली,ता. २३:  नांदोरे (ता.पंढरपूर ) येथील ज़िल्हा परिषद शाळेने केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत सर्व साधारण विजेते पद मिळविल्या बद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 पटवर्धन कुरोली प्रशाला येथे पटवर्धन कुरोली केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या  स्पर्धेत जि.प.नांदोरे शाळेने लहान गटात मुलांनी खो-खो ,लंगडी ,कबड्डी मध्ये विजेतेपद तसेच खो -खो,लंगडी मध्ये मुलींनी विजेतेपद पटकाविले .मोठ्या गटातही मुलांनी खो-खो,कबड्डी ,लंगडी मध्ये विजेतेपद आणि खो-खो, लंगडी मध्ये मुलींनी विजेतेपद पटकावले.वैयक्तीक स्पर्धेतही लहान गट मुले १०० व २००मी धावणे शुभम करांडे प्रथम ,बुद्धिबळ ओम जाधवपाटील प्रथम.लहान गट मुली१०० व२०० मी धावणे तेजश्री करांडे प्रथम ..मोठा गट मुले १००मी धावणे स्वप्नील कदम प्रथम ,२०० मी धावणे वैभव गायकवाड प्रथम .मोठा गट मुली १०० मी धावणे निकिता करांडे प्रथम ,२०० मी धावणे कोमल कदम प्रथम,बुद्धिबळ साक्षी वाघ प्रथम क्रमांक अशी सर्व मिळून२०  विजेतेपद पटकावले .
तसेच प्रोत्साहन म्हणून अध्यक्ष विजयदादा भिंगारे यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत नांदोरे कडून सर्व स्पर्धक व शिक्षक यांना छापील टी-शर्ट चे वाटप करण्यात आले .यावेळी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कांबळे , समाधान व्हनमाने ,तंटामुक्ती समिती अध्यक्ष सचिन कदम ,आजिनाथ भिंगारे ,नामदेव कदम ,ग्रामसेवक प्रशांत कुंभार ,कर्मचारी बापू कांबळे,नूतन पोलीस पाटील प्रा.सचिन पुजारी ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजयदादा भिंगारे ,मुख्याध्यापक चंद्रकांत रसाळ ,विलास घाडगे ,अनिल धायगुडे ,सोमनाथ जाधव पाटील , विजयकुमार जवळेकर शिक्षक व अन्य मान्यवर उपस्थित होते .यावेळी जि.प.शाळेला उपस्थित मान्यवरांनी पुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन देवून सर्व विजेते मुलांचे अभिनंदन केले .रसाळ सरांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले ....

Tuesday 19 December 2017

वंचिताना न्याय देण्यासाठी एकत्र यावे : स्वाती मोराळे

● वंचितांना न्याय देण्यासाठी एकत्र यावे:स्वाती मोराळे यांचे ओबीसी बांधवांना आवाहन ●
नांदेड,दि.२०(प्रतिनिधी):- वंचित घटकाला नेहमीच विकासापासून डावलले जात असून त्यांच्यावर अन्याय होत आहे तो अन्याय दूर करून त्यांना न्याय देण्यासाठी ओबीसी बांधवांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असे आवाहन ओबीसी फाऊंडेशन इंडिया च्या संस्थापिका व राष्ट्रीय अध्यक्षा सौ.स्वातीताई मोराळे यांनी नांदेड दौर्या दरम्यान रेणुका माता माहूरगड येथे  कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले.तर निलय नाईक यांनी ओबीसी समाज ने एकत्र येण्याचे आव्हान केले. मी सतत स्वातीताई यांच्या पाठीशी उभा आहे. एक महिला एवढी पुढे येऊन काम करत आहे हे अतिशय कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले.माहूर गडाचा ही आणखी विकास करू असे माहुरच्या सभापती यांनी सांगितले.या कर्यक्रमास  यवतमाळ चे ओबीसी फौंडेशन चे अध्यक्ष गणपतराव पोतगंटवार,नांदेडचे अमित साळवी, माहूर गडचे अशोक पोलगांटीवर ,माहूर चे सभापती व मराठवाडा विभाग प्रमुख लक्ष्मण लटपटे, लातूर महिला अध्यक्ष
 गयादेवी सिरसाट, नांदेडच्या सुनंदा फड संतोष साळवी, गजानन गोरे श्याम खांडरे ही उपस्थित होते. तसेच त्यांच्यासोबत ओबीसी फाऊंडेशन इंडिया चे राष्ट्रीय सचिव मा.रत्नाकर मोराळे,मा.सुदर्शन सानप,तसेच मा.वसंतराव नाईक (माजी मुख्यमंत्री) यांचे नातू मा.निलय नाईक यांच्या कुटुंबास पुसद जि.यवतमाळ येथे मोराळे यांनी भेट दिली.

Monday 4 December 2017

लग्नाचा वाढदिवस साजरा केला अंधशाळेत

पंढरपूर : लग्नाचा वाढदिवस म्हटले की पत्नीला खुष करण्यासाठी महागडे गिफ्ट, केक, थंड हवेचे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी फिरायला जाणे, महागड्या हॉटेलमध्ये जेवण, सेलिब्रेशन आदी प्रकार सर्वपरिचित आहेत. मात्र पाश्चात्य परंपरेला फाटा देत पटवर्धन कुरोलीत नंदकुमार व कांचन या नवदांम्पत्यांनी पंढरपूर येथील अंध व अपंग विद्यालयात अंधांना अन्नदान करत आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यामुळे अंधही काही काळ भारावून गेले.
पटवर्धन कुरोली येथील नंदकुमार नाईकनवरे व कांचन यांचा विवाह ४ डिसेंबर २०१६ रोजी झाला होता. त्याच्या अगोदर काही दिवस पंढरपूर (वाखरी) चा वीर सुपूत्र मेजर कुणाल गोसावी अतिरेक्यांशी लढताना शहीद झाला होता. त्यावेळीही नंदकुमार याने लग्न घटीका मुहूर्ताला फाटा देत भर लग्नात शहीदाला श्रद्धांजली वाहून आगळ्यावेगळ्या पद्धतीने लग्न केले होते. त्याचीही जिल्हाभर चर्चा झाली होती. स्वत: हॉटेल व्यवसाय करणाºया व त्यातून मिळणाºया मोजक्या रक्कमेतून नंदकुमार याने आत्तापर्यंत अंध, अपंग, वृद्ध यांना मदत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. गावातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणे, गरजू मुलींच्या पालकांना लग्नासाठी मदत करणे आदी स्तुत्य उपक्रम राबविले आहेत.
याच उपक्रमाची पुढे वाटचाल करीत असताना आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस त्याने लायन्स क्लब संचलित अंध व अपंग विद्यालयातील अंधांना अन्नदान करून व शाळेला देणगी देऊन साजरा केला. हे अंध विद्यालय गेल्या २७ वर्षापासून पंढरपुरात कार्यरत आहे. पहिली ते आठवीपर्यंत शिकणाºया या अंध विद्यार्थ्यांना हस्तकला, व्यवसाय, संगीत, संगणक प्रशिक्षण देऊन घडविले जात आहे. ३० विद्यार्थ्यांसाठी शासन अनुदान देत असले तरी या विद्यालयात शिकणाºया अतिरिक्त २० विद्यार्थ्यांना देणगीतून मोफत भोजन व शिक्षण दिले जाते. याच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडा व स्पर्धा परीक्षेत मोठे यश प्राप्त करत स्पर्धा
परीक्षांमध्ये अव्वल येत पाच विद्यार्थी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत आहेत. भविष्यातही अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या परीने जमेल तेवढी मदत करणार असल्याचे नंदकुमार नाईकनवरे यांनी सांगितले. नंदकुमारने केलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने अंधशाळेतील अंध विद्यार्थी, पालकही काहीकाळ भारावून गेले होते.
यावेळी मुख्याध्यापिका रोहिणी घोडके, संतोष बाराहाते, महेश म्हेत्रे, नितीन कटप, सुनील व्यवहारे, मोहन डावरेगणेश जाधव, नवनाथ नाईकनवरे, रघुनाथ नाईकनवरे, मोहन कोळी, पांडुरंग नाईकनवरे, गणेश गिड्डे, शशिकांत गिड्डे आदी उपस्थित होते.
नंदकुमारच्या मदतीमुळे अनेकांना उभारी
स्वत: हॉटेल व्यावसायिक असलेल्या नंदकुमार याने आजपर्यंत वृद्ध, अपंग, मतीमंद, शालेय विद्यार्थ्यांना मदतीचे धोरण अवलंबले आहे. वेळोवेळी केलेल्या मदतीने अनेकांचे शिक्षण, संसार, वृद्धांना उभारी मिळाल्याची अनेक उदाहरणे ताजी असताना लग्नाच्या कार्यक्रमात शहीद मेजर कुणाल गोसावी यांना वाहिलेली श्रद्धांजली व लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी आपल्या पत्नीसोबत अंधशाळेत अंधांना अन्नदान करून दिलेली देणगी याची चर्चा तालुकाभर आहे.

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...