Sunday 11 November 2018

उचेठान येथे महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी

उचेठान ता.१२ . भविष्यामध्ये कोळी समाजाच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द राहू असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्या शैलाताई गोडसे यांनी दिले. 
उचेठान (ता.मंगळवेढा) येथे महर्षी वाल्मीकी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी होते.यावेळी महर्षी वाल्मीकी संघाचे संस्थापक गणेश अंकुशराव, अण्णासाहेब कोळी, दादा करकमकर,परमेश्वर कोळी, राजेंद्र कोळी, तानाजी खरात,महावीर ठेंगील,राजाराम कोळी, महादेव यादव, भारत कोळी, कमलाकर कदम,सोमनाथ अतकरे,दत्तात्रय गडदे, निलेश माने,ज्ञानेश्वर बळवंतराव, नागन्नाथ कोळी उपस्थित होते


यावेळी आद्यकवी महर्षी वाल्मीकी च्या प्रतिमेची स्थापना दत्तात्रय गडदे (सरपंच उचेठाण),संजय बळवंतराव (सरपंच बठाण) यांच्या हस्ते करण्यात आली. प्रतिमेचे पूजन उत्तमभाऊ कोळी व उत्तरेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन जिल्हा परिषद सदस्या शैलाताई गोडसे व वाल्मीकी संघ महिला आघाडी तालुका प्रमुख दुर्गाताई माने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना  जिल्हा परिषद सदस्या शैलाताई गोडसे यानी महर्षी वाल्मीकी यांच्या जीवनावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच  भविष्यात होणाऱ्या पाण्यात टंचाई वर मात करण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना महत्वाची असल्याचे त्यानी यावेळी सांगितले
कार्यक्रम पार पाडण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मदन कोळी,उपाध्यक्ष मल्हारी बळवंतराव, सचिव गोरख कोळी, सह सचिव नितीन कोळी,खजिनदार दिगंबर कोळी व ग्रामस्थानी परिश्रम घेतले.यावेळी प्रश्न मंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात अाले होते. या कार्यक्रमाचे नियोजन सुरज कोळी, निखील कोळी, जयसिंह माने यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महर्षी वाल्मीकी संघाचे तालुका अध्यक्ष रमेश अण्णा कोळी यांनी केले.तर प्रास्ताविक संजय कोळी यांनी केले

Wednesday 7 November 2018

देवडेत गोरगरीबांची दिवाळी केली गोड

पटवर्धन कुरोली, ता.०६: सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष  मा.कल्याणराव काळे यांच्या संकल्पनेतुन व  आमदार मा.भारत नाना भालके यांच्या मार्गदर्शनाखाली आज देवडे (ता.पंढरपूर) येथे विठ्ठल परिवार ,  समाधान दादा काळे मित्रमंडळ व युवा गर्जना ग्रुप देवडे यांच्या वतीने  दिवाळी गोड करण्यासाठी गावातील गोर-गरीब लोकांना मोफत साखर वाटप करण्यात आली,या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा नेते मा.नारायण शिंदे,प्रमुख पाहुणे म्हणून सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे संचालक   मा.सुधाकर काका कवडे उपस्थित होते. यावेळी
 मा.जगन्नाथ शिंदे,परमेश्वर झांबरे,ज्ञानेश्वर कडलासकर,अरून नलवडे,हरीभाऊ शिंदे,तुकाराम झांबरे,रामभाऊ मोरे,जोतीराम झांबरे,दत्तात्रय      कडलासकर,बाळासो शिंदे,दत्तात्रय झांबरे,लक्ष्मण शिंदे,मोहन झांबरे,शिवराज शिंदे,विलास पाटील,विलास शिंदे,सचिन शिंदे,नागेश लांडे,जोतीराम शिंदे,बाळासो कडलासकर व आदि मान्यवर उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ झांबरे सर व आभार सागर कडलासकर यांनी मांडले.

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...