Saturday 6 January 2018

मेस्टाचा “आदर्श शाळा” पुरस्कार नांदोरेच्या एस. पी. पब्लिक स्कूलला प्रदान
भोसे (क.) : वार्ताहर,
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोशिएशन (मेस्टा), सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा “आदर्श शाळा” पुरस्कार आ. प्रणिती शिंदे, जि.प. सदस्या शैला गोडसे यांच्या हस्ते नांदोरे (ता. पंढरपूर) येथील एस. पी. पब्लिक स्कूलला प्रदान करण्यात आला.
मेस्टा ही राज्य पातळीवरील संस्था असून राज्यभरातील इंग्लिश माध्यमातील शिक्षक, शाळा आणि संस्था चालक यांची त्यांच्या शैक्षणिक कार्याच्या आधारावर आदर्श शिक्षक, आदर्श शाळा आणि आदर्श संस्था चालक म्हणून पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील पहिली आयएसओ मानांकन प्राप्त इंग्लिश मिडीयम शाळा ठरलेल्या “एस. पी. पब्लिक स्कूल” या शाळेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
गुरुवारी (दि. ४)  सोलापूरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे मेस्टाचे प्रदेश अध्यक्ष संजय तायडे पाटील, आ. प्रणिती शिंदे,  जि.प. सदस्या शैला गोडसे, मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनीलकुमार राठोड यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, संस्थेचे सचिव अश्वराज वाघ, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष युवराज सातुरे, उपाध्यक्ष अण्णासाहेब पवार, सोमनाथ भिंगारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी डॉ. नंदकुमार होनराव, संस्थेचे खजिनदार विक्रम भिंगारे, मेस्टाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हरीश शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश नीळ, जिल्हा सचिव विनोद कदम, पार्थ वलगे उपस्थित होते.   
नांदोरे सारख्या ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एस. पी. पब्लिक स्कूलला मानांकित मेस्टा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे आणि पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

फोटो ओळी : एस. पी. पब्लिक स्कूलला आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करताना आ. प्रणिती शिंदे, शैला गोडसे, यावेळी डॉ. संतोष वलगे, वासंती वलगे, स्वाती चव्हाण, अश्वराज वाघ, युवराज सातुरे, अण्णासाहेब पवार, सोमनाथ भिंगारे. 
 

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...