Tuesday 23 February 2021

गाडगेबाबा यांची जयंती साजरी

 पटवर्धन कुरोली, ता.२३: उजनीवसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दादासाहेब साखरे, दशरथ पवार, युवराज गोसावी,  हरिदास मोरे,   उमेश गायकवाड,  गणेश गायकवाड,  भैय्या कोयले, शंकर साखरे, सचिन कोळी  उपस्थित होते.


Wednesday 17 February 2021

अॅड. संतोष नाईकनवरे यांची निवड


सोलापूर, ता. १७: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पंढरपूर  तालुका उपाध्यक्ष पदी अॅडव्होकेट संतोष अरुण नाईकनवरे  यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे पत्र सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी भगीरथ दादा भालके जिल्हा युवक अध्यक्ष गणेश पाटील पंढरपूर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ॲड. दीपक पवार जिल्हा संघटक नरसाप्पा देशमुख  हे उपस्थित होते. पटवर्धन कुरोली  परिसरात त्यांच्या चांगला जनसंपर्क असून लवकरच परिसरातील सर्व गावांमध्ये राष्ट्रवादीचे शाखा सुरू करणार असल्याची माहिती  संतोष नाईकनवरे  यांनी दिली. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...