Tuesday 22 September 2020

 देवडे येथे ७५ जणांकडून रक्तदान

पटवर्धन कुरोली, ता.२२:  आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत  देवडे आणि रेवनील ब्लड बँक, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने देवडे (ता. पंढरपूर) येथे रक्तदान शिबिराचे आयोजनकरण्यात आले होते. यावेळी गावातील ७५ रक्तदात्यांनी रक्तदानकेले. रक्तदान यशस्वी करण्यासाठी विठ्ठल कडलासकर, नारायण शिंदे, नेताजी कडलासकर, बाळू शिंदे, दत्तात्रय कडलासकर, सागर कडलासकर, रामा झांबरे, भास्कर शिंदे, रामा मोरे, दादा लांडे, तुकाराम झांबरे, दादा शिंदे यांनी प्रयत्न केले.

Tuesday 15 September 2020

मासेविक्री जोमात कोराना रुग्ण वाढण्याची भिती


 पटवर्धन कुरोली, ता. १५: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याने गेल्या पाच दिवसापासून गाव बंद ठेवण्यात आले असले तरी मच्छिमारी व्यवसाय जोमात सुरू असल्याने कोरोना रुग्ण वाढण्याची भीती ग्रामस्थातुन  व्यक्त होत आहे.   पटवर्धन कुरोली गावात सहा दिवसापूंर्वी पाच रुग्ण सापडले होते. त्यामुळे येथील कोरोना ग्रामस्तरीय समिती च्या वतीने गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेंव्हापासुन सर्व व्यवसायायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेऊन शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. मात्र पटवर्धन कुरोली येथील बंधार्याजवळ खुलेआम मासेविक्री जोरदार सुरू आहे. जे मासे विक्रेता आहेत त्यांच्या गावात या अगोदरच मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे त्याचा फैलाव अ्धिक प्रमाणात होण्याची भिती ग्रामस्थातुन होत आहे.  जर मासे विक्री बंद केली नाहि तर आंदोलन करु असा इशारा सामाजिक कार्यकर्ते बापूराव मगर यांनी दिला आहे.

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...