Wednesday 20 February 2019

वैशाली डोळस यांचे शिवजयंती निमीत्त व्याख्यान

पटवर्धन कुरोली, ता.20: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे गुरुवार (ता.२१) रोजी सायंकाळी सात वाजता शिवजयंती निमीत्त अॅड.  वैशाली ताई डोळस यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवजयंती महोत्सव संयोजक समिती च्या वतीने देण्यात आली आहे. पटवर्धन कुरोली प्रशालेच्या भव्य प्रांगणात हे व्याख्यान आयोजित करण्यात आले असुन सर्वानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे

Saturday 16 February 2019

पुलवामा येथे शहीद झालेल्या 42 जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी   शिवप्रतिष्ठानसह विविध संघटना, कार्यकर्ते, नागरिकांनी दहशतवादी अजहर मसूदचा पुतळा जाळून पाकिस्तानचा निषेध व्यक्‍त केला.‘मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद,’ अशा घोषणा देत संतप्त जिल्हावासियांनी दुसर्‍या दिवशीही पुलवामा हल्ल्याचा निषेध केला. ठिकठिकाणी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. शहीद झालेल्या 42 जवानांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. दोन मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली मुस्लिम बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. 

पुलवामा येथे दोन दिवसांपूर्वी पाकने पोसलेल्या जैस ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आत्मघाती हल्ला केला होता. यात सीआरपीएफचे 42 जवान शहीद झाले. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. . त्यावेळी चेंबरचे अध्यक्ष -----------उपस्थित होते.  शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Friday 8 February 2019

पटवर्धनकुरोली,ता.०८: - पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर )येथील शेतकरी सोसायटी चे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह पाच जणांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवत पाचही जणांचे संचालक पद रद्द करण्याची कारवाई सहाय्यक निबंधक एस एम तांदळे यांनी केली आहे.
मागील दोन महिन्यांपूर्वी या सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती. मात्र त्यानंतर विद्यमान संचालक नंदकुमार उपासे यांनी अध्यक्ष रामकृष्ण जवळेकर, उपाध्यक्ष धनंजय नाईकनवरे, यांच्यासह संचालक प्रकाश नाईकनवरे, श्रीधर नाईकनवरे, गणपत मोरे यानी निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली असून त्यांची सखोल चौकशी व्हावी व त्यांचे पद रद्द करण्यात यावे अशी लेखी तक्रार सहायक निबंधक पंढरपूर यांचेकडे केली होती.
त्या तक्रारी नुसार सहाय्यक निबंधक एस. एम. तांदळे यांनी पाचही जणांना लेखी नोटीस काढुन आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र सुनावणी दरम्यान अध्यक्ष रामकृष्ण जवळेकर यांनी थकीत कर्जदार असल्याचे मान्य केले व शासनाच्या कर्जमाफी साठी  आपले नाव पाठवल्याचे सांगितले. मात्र कर्ज माफ झाल्याचे ते सिद्ध करू शकले नाहीत. तर उपाध्यक्ष धनंजय नाईकनवरे , संचालक श्रीधर नाईकनवरे, प्रकाश नाईकनवरे, गणपत मोरे यांनी यापूर्वी कधीही संस्थेचे कर्ज काढले नसतानाहीकर्जदार गटातुन निवडून आल्याचे सिद्ध झाले.
त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचेसह पाचही जणांना सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कअ 1 (एक) अ अन्वेय नियम मोडल्या प्रकरणी दोषी ठरवले व  या कलम 73 कअ 1(चार) व नियम 58 नुसार सदस्य म्हणून राहण्यास अपात्र असल्याचे सहायक निबंधकानी सांगितले म्हणून बेकायदेशीर रित्या प्रतिज्ञापत्र देऊन निवडून आल्याप्रकणी  कलम 78 अ (ब) नुसार विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष , पाच जणांना संचालक पदावरून काढुन टाकत असल्याचा निकाल 7 फेब्रुवारी रोजी सहाय्यक निबंधक एस एम तांदळे यांनी दिला आहे. सहकारी सोसायट्याच्या इतिहासात आनेक गैरव्यवहार, राजकीय नाट्य समोर आल्याचे अनेकदा निदर्शनास आले मात्र एवढी मोठी व जलद कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे


शेतकरी सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्षा सह पाच जणांचे पद रद्द
सहाययक निबंधकांचा निर्णय - पटवर्धन कुरोली शेतकरी सोसायटी निवडणूक चुकीची माहिती देणे महागात पडले
पटवर्धनकुरोली - पटवर्धन कुरोली ता पंढरपूर येथील शेतकरी सोसायटी चे अध्यक्ष रामकृष्ण जवळेकर उपाध्यक्ष धनंजय नाईकनवरे यांच्या सह पाच जणांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवत कलम 1960 चे 78 अ, (ब) नुसार या पाचही जणांचे संचालक पद रद्द करण्याची कारवाई सहाय्यक निबंधक एस एम तांदळे यांनी केली आहे.
 मागील दोन महिन्यांपूर्वी या सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती. मात्र त्यानंतर विधमान संचालक नंदकुमार उपासे यांनी अध्यक्ष रामकृष्ण जवळेकर, उपाध्यक्ष धनंजय नाईकनवरे, यांचे सह संचालक प्रकाश नाईकनवरे, श्रीधर नाईकनवरे, गणपत मोरे, आदी पाच जणांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली असून त्यांची सखोल चौकशीव्हावी व त्यांचे पद रद्द करण्यात यावे अशी लेखी तक्रार सहायक6निबंधक पंढरपूर यांचेकडे केली होती.
त्या तक्रारी नुसार सहाय्यक निबंधक एस एम तांदळे यांनी पाचही जणांना लेखी नोटीस काडून आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र सुनावणी दरम्यान अध्यक्ष रामकृष्ण जवळेकर यांनी थकीत कर्जदार आसल्याचे मान्य केले व शासनाच्या कर्जमाफी साठी  आपले नाव पाठवल्याचे सांगितले मात्र कर्ज माफ झाल्याचे ते सिद्ध करू शकले नाहीत. तर उपाध्यक्ष धनंजय नाईकनवरे , संचालक श्रीधर नाईकनवरे, प्रकाश नाईकनवरे, गणपत मोरे यांनी यापूर्वी कधीही संस्थेचे कर्ज काढले नसल्याचे मान्य केले तरीही कर्जदार सर्वसाधारण मतदारसंघातुन निवडणूक लढवून ते निवडून आल्याचे सिद्ध झाले. तरीही पुन्हा एकदा त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली मात्र ते आपल्यावरील आरोप चुकीचे आसल्याचे सिद्ध करू शकले नाहीत.
म्हणून अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचेसह पाचही जणांना सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कअ 1 (एक) अ अन्वेय नियम मोडल्या प्रकरणी दोषी ठरवले व  या कलम 73 कअ 1(चार) व नियम 58 नुसार सदस्य म्हणून राहण्यास अपात्र असल्याचे सहायक निबंधकानी सांगितले म्हणून बेकायदेशीर रित्या प्रतिज्ञापत्र देऊन निवडून आल्याप्रकणी  कलम 78 अ (ब) नुसार विधमान अध्यक्ष रामकृष्ण जवळेकर, उपाध्यक्ष धनंजय नाईकनवरे संचालक प्रकाश नाईकनवरे, श्रीधर नाईकनवरे, व गणपत मोरे यांना संचालक पदावरून काडून टाकत असल्याचा निकाल 7 फेब्रुवारी रोजी सहाय्यक निबंधक एस एम तांदळे यांनी दिला आहे. सहकारी सोसायट्याच्या इतिहासात आनेक गैरव्यवहार, राजकीय नाट्य समोर आल्याचे अनेकदा निदर्शनास आले मात्र एवडी मोठी व जलद कारवाई इतिसात प्रथमच झाल्याने खळबळ उडाली आहे

चौकट.......

या कारवाई मुळे सोसायट्या मध्ये होत असलेल्या गैरप्रकारांना आळा बसेल. असे आणखी काही प्रकार समोर आल्यास प्रसासनाची हीच भूमिका असेल ही सोसायटी आता बरखास्त करून नवीन निवडणूक कार्यक्रम घेतला जाऊ शकतो, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा अहवाल जिल्हा उपनिबंदकाना पाठवणार आहे. त्यांच्यवर काय कारवाई करायची ज निर्णय ते घेतील
एस एम तांदळे
सहययक निबंधक पंढरपूर

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...