Monday 4 March 2019

पायल फाउंडेशनच्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण

     पटवर्धन कुरोली, ता.०४ –   पायल फाउंडेशन च्या वतीने चालविण्यात येत असलेल्या एस.पी.पब्लिक स्कूल ला सी.बी.एस.ई. ची मान्यता मिळवण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य करु असे आश्वासन  आमदार शिंदे  यांनी दिले.
ते नांदोरे (ता.पंढरपूर) येथे पायल फाउंडेशन यांच्या वतीने कु.पायल संतोष वलगे हिच्या स्मृती पित्यर्थ  विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल  राज्यस्तरीय  पुरस्काराचे  वितरण आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते  करण्यात आले.यावेळी बोलत होते.
यावेळी  विठ्ठल चे संचालक भगिरथ भालके, पत्रकार शिवाजी शिंदे,  नवनाथ पोरे, पोपट चव्हाण, कांतीलाल भिंगारे,अॅड.जी.सी.काटकर,  संस्थेचे अध्यक्ष डाॅ.संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ,  खजिनदार विक्रम भिंगारे , नंदकुमार उपासे उपस्थित होते.
प्रारंभी  छत्रपती शिवाजी महाराज आणि  (कै.) पायल वलगे यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट पत्रकारिता, आदर्श समाजसेवक, आदर्श कुंटुंबवात्सल्य, आदर्श शाळा, आदर्श पालक अशा विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या गुणीजनांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. .  पुरस्काराचा वितरण सोेहळा हा खरोखरच तळागाळातील गुणीजनांचा सत्कार करणारा उत्कृष्ट कार्यक्रम असल्याचेे गौरवउद्गार आमदार शिंदे काढले. प्रास्ताविक संस्थेचे  अध्यक्ष संतोष वलगे  यांनी केले. यावेळी मारूती भिंगारे,हरिश्चंद्र तळेकर, नागेश उपासे, मोहन नलावडे, प्रताप चव्हाण सचिन लाडे, अमोल नलावडे, हरिदास भोसले,डाॅ. नंदकुमार होनराव,डाॅ. राहूल गायकवाड, बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.
सुत्रसंचालन स्वाती चव्हाण व अमोल कचरे यांनी केले.    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  प्रकल्प  संचालिका वासंती वलगे,मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण,  सोमनाथ वलगे , सहशिक्षिका पवार,देशमुख ,पिसे, जानकर,भोसले, मुलाणी,बोबडे,पांढरे, कोरके, माने व सह शिक्षक श्री.कचरे श्री.तेली,श्री.ढावरे,श्री.थिटे,श्री. अलगुडे,श्री.साठे ,श्री.पवार, श्री.टरले यांच्यासह वाहतुक विभागाचे शशिकांत वळेकर,योगेश व्यवहारे, बंडू शिरसट,बंडू मुटकुळे, सचिन कदम, आकाश शिंदे, बंडू कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले. . पुरस्कार प्राप्त   १)उत्कृष्ट पत्रकारिता - मोहन कोळी    २)आदर्श समाजसेवक - रंगनाथ थोडके  ३)आदर्श कुंटुबवात्सल्य- तात्यासो भोसले ४)आदर्श शाळा -अभिनव पब्लिक स्कूल वाशिंबे ता.करमाळा ५)पायल सर्वोकृष्ट विद्यार्थीनी -श्रेया उलभगत ६) पायल सर्वोकृष्ट विद्यार्थी -अनिकेत वाघ ७)बेस्ट अॅक्टर- शिवराम कोळी, बेस्ट अॅक्ट्रेस -कादंबरी कुंभार ८) आयडियल स्टुडंट- संचिता फाळके

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...