Tuesday 31 October 2017

आव्हे -जांबुड़ बंधारा लगत रस्ता करणेबाबत..

पटवर्धन कुरोली, ता. ३१:  आव्हे-जांबूड  भीमा नदीवरील असणाऱ्या कोल्हापूर पध्यतीच्या बंधाऱ्याचा भरावा वाहून गेल्याने वीस दिवसापासून वाहतूक बंद आहे.

या  बंधाऱ्यावरून आव्हे , तरटगाव , पटवर्धन कुरोली  , नांदोरे  , नेमतवाडी , करकंब , पेहे, भोसे , शेवते, जांबूड , खळवे ,  श्रीपूर , नेवारे , बोरगाव या  दहा ते बारा गावातील लोकांची वाहतूक सुरु असते. पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील अकलुज ही मोठी बाजारपेठ असल्याने या बंधाऱ्यावरून सतत दळणवळण सुरू असते. या रस्त्यावरून शिक्षणसाठी मुले श्रीपुर, अकलुज, बोरगाव  ये जा करतात 

वीस दिवसापूर्वी उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे  भिमा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते.  पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बंधाराची दारे टाकल्यामुळे भीमा नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती .  त्यामुळे या ठिकाणी पाण्याने अनेक शेतकऱ्यांची पाईप , विधुत मोटारी  पाण्यात वाहुन गेल्या होत्या. बंधाऱयाला दारे टाकल्यामुळे जांबूड च्या बाजूचा भरावा वाहून गेला आहे. त्यामुळे गेल्या वीस दिवसापासून येथील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या भागातील लोकांना दहा ते बारा किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. यामुळे पैसे आणि वेळ वाया जात आहे 



त्यामुळे या बंधाऱ्याचा भरावा लवकरात लवकर भरून हा रस्ता सुरु करावा  अशी मागणी येथील ग्रामस्थांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडे निवेदनांद्वारे करण्यात अली आहे. या वेळी भाजपचे सोलापुर जिल्हा सरचिटणीस अजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते दादा माने, भाजपचे पंढरपूर तालुका सरचिटणीस मारुती भुसनर,  जनसेवा विद्यार्थी संघटना पंढरपूर तालुकाध्यक्ष दिपक पिंजारे, तात्यासाहेब मुंडफणे, हरिदास रेडे पाटील,  यांच्या सह विविध संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ  मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Monday 30 October 2017

भोई समाज संघ फलकाचे उदघाटन

“भोई समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन एकोप्याने शासन दरबारी प्रयत्न केल्यास भोई समाजाचे प्रश्न मिटण्यास मदत होईल. मराठा समाजाप्रमाणे ओबीसी संघटनांनीही आपल्या हक्कासाठी रस्त्यावर येणे गरजेचे असल्याचे” मत ओबीसी फौंडेशनच्या प्रदेशाध्यक्षा स्वाती मोराळे यांनी व्यक्त केले.
पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथे ओबीसी फौंडेशन संचालित भोई समाज सेवा संघ शाखेचे उद्घाटन मोराळे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी भोई समाज सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश नगरे, बारामती पत्रकार संघाचे भरत मल्लाव, इंदापूर लोकशासनाचे अध्यक्ष दिलीप कदम, राज्य संघटक पांडुरंग जगताप, पुणे अध्यक्ष चंद्रकांत भोई, सोलापूर बंजारा समाजाचे विजय चव्हाण, जिल्हा संघटक बंडू भोई, बापू भोई, पिराची कुरोलीचे सरपंच कुलदीप कौलगे, पटवर्धन कुरोलीचे माजी उपसरपंच पांडुरंग नाईकनवरे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पंढरीनाथ लामकाने, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष परमेश्वर लामकाने, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कौलगे, सोपान कौलगे, माजी सदस्य तुकाराम कौलगे, गजानन भोई, धनाजी भोई, नंदकुमार भोई, तानाजी भोई, संतोष भोई, सीताराम भोई, अनिल भोई यांच्यासह भोई समाज संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Friday 20 October 2017

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे



चार दिवसांच्या खंडानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आज सकाळपासून एसटी बस रस्त्यावर धावतील. संप बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवत कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे भाऊबिजेदिवशी राज्यातील सर्वसामान्य प्रवाशी आणि जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर संपाची पुढची दिशा ठरविण्यासंदर्भात एसटी संघटनेची शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत कोर्टाच्या आदेशाचे पालन करून संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.  संप मागे घेत असल्याचे पत्रकच संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.


एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी. या समितीने कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढ किती द्यायची, याबाबत तीन आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत.

उच्चस्तरीय समितीमध्ये अर्थ सचिव, परिवहन सचिव (गृह), परिवहन आयुक्त, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक या चार जणांसह एकूण पाच जणांचा समावेश असेल, अशी माहिती यावेळी सरकारच्यावतीने हायकोर्टात देण्यात आली. पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती आपला प्राथमिक अहवाल 15 नाेव्हेंबरपर्यंत तर अंतिम अहवाल 21 डिसेंबर 2017 पर्यंत सादर करावा, असे सूचवले आहे.


Saturday 14 October 2017

ज्ञानेश्वर जवळेकर यांची निवड

पटवर्धन कुरोली, ता. १४: येथील ज्ञानेश्वर विलास जवळेकर यांची बळीराजा शेतकरी संघटनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा अध्यक्ष माउली हळनवर यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले या वेळी युवया आघाडीचे जिल्हाध्यक्ष  संतोष पवार महादेव नागटिळक, धनाजी मदने शहाजहान शेख , सोमनाथ भोसले उपस्थित होते

Thursday 12 October 2017

एस.पी.पब्लिक स्कुलचे यश

प्रितम करांडे  ने विभागात मिळविला द्वितीय क्रमांक.
 पटवर्धन कुरोली, ता. महाराष्ट्र  राज्य क्रिडा विभागामार्फत दि.10 ऑक्टोबर रोजी पुणे येथे घेण्यात आलेल्या विभागीय तायक्वान्दो स्पर्धेमध्ये एस. पी.पब्लिक स्कूल, नांदोरे या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये 32 ते 35 किलो वजन गटामध्ये प्रितम चांगदेव करांडे याने पुणे विभागामध्ये द्वितिय क्रमांक मिळवून यश संपादन केले तसेच संकेत विठ्ठल सातुरे व तेजस वसंत भिंगारे या विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग  नोंदविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन जिल्हा क्रिडा अधिकारी श्री.युवराज नाईक साहेब, संस्थेचे अध्यक्ष डॉ.संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ,केंद्रप्रमुख रं.ना. घोडके , सहसचिव बाळासाहेब चव्हाण, खजिनदार विक्रम भिंगारे यांनी केले यावेळी संस्थेच्या प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, चांगदेव करांडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कांतीलाल ढोले यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक दीपक माने यांचे मार्गदर्शन लाभले 

Tuesday 10 October 2017

पटवर्धन कुरोली केंद्रातील टॅलेंट हंट स्पर्धा उत्साहात संपन्न

पटवर्धन कुरोली , सोमवार दिनांक नऊ रोजी पटवर्धन कुरोली पुनर्वसन शाळेमध्ये टॅलेंट हंट स्पर्धेच आयोजन करण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय दिनकरराव नाईकनवरे सभापती पंचायतसमिती पंढरपूर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पटवर्धन कुरोली  पुनर्वसन येथील सरपंच सौ. साखरे ,  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साहेबराव मोरे ,दादासाहेब साखरे , पंडित तवटे ,दत्तात्रेय कारंडे रोहिदास तेरवे ,रमेश जवळेकर ,पंडित तवटे ,सिकंदर शेख , सुनील पाटील, हरिदास कोळसे , नवनाथ नाईकनवरे ,आण्णा कोळी यांच्यासह केंद्रप्रमुख रंगनाथ घोडके साहेब आदी मान्यवर  उपस्थित होते .
   मुख्य परीक्षक म्हणून श्री नामदेव देशमुख सर कलाशिक्षक पटवर्धन कुरोली प्रशाला यांनी काम पाहिले .
*सदर स्पर्धेमध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धा , निबंधलेखन स्पर्धा , नृत्य स्पर्धा, गीतगायन स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा , वादन स्पर्धा कथाकथन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,एकपात्री नाट्य स्पर्धा हस्तकला स्पर्धा ,तसेच चित्रकला स्पर्धा व वादविवाद स्पर्धा तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा अनेक स्पर्धा यशस्वीपणे घेण्यात आल्या .
स्पर्धेसाठी मुख्य परीक्षकांसोबत श्री पांडरंग नाईकनवरे सर , श्री विठ्ठल गायकवाड सर , श्री विक्रम टरले सर,  श्री अमोल कांबळे सर , श्री भारत तोडसाम सर , श्री सतीश शिंदे सर , श्री संतोष काळे सर , श्री दिनकर अवघडे सर , श्री रामचंद्र केंगार सर , श्री कैलास सोनवणे सर, श्री संजय रेपाळ सर , श्री पांडरंग ठाकरे सर,  श्री सचिन बाबर सर , श्री अनिल धायगुडे सर , श्री विलास घाडगे सर  , सौ. सविता देठे मॅडम , शैलेजा म्हेत्रे मॅडम,  सरला वसावे मॅडम आदी सर्व सह शिक्षकांनी काम पाहिले.

याप्रसंगी सभापती दिनकरभाऊ नाईकनवरे यांनी माननीय सीईओ भारुड साहेब यांच्या उपक्रमाचा गौरोद्गार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा स्पर्धा आवश्यक असल्याचे नमूद केले .

सदर स्पर्धेचे नियोजन पटवर्धन कुरोली पुनर्वसन शाळेचे मुख्याध्यापक श्री सत्यवान वाघमारे सर  व व्यवस्थापन समिती यांनी उत्कृष्टपणे करून सर्व विद्यार्थी व पालक यांची सर्व सोय केली .
सदर टॅलेंट हंट स्पर्धेत सूत्रसंचालन श्री विजयकुमार जवळेकर सर व श्री धनाजी बोबडे सर यांनी उत्कृष्टपणे केले .
टॅलेंट हंट स्पर्धेचा निकाल       
पुढीलप्रमाणे
 सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
लहान गट
सानिका आयवळे शेवते प्रथम, सानिका     तरटगाव द्वितीय, राहुल जाधव देवडे तृतीय
मोठा गट
अश्विनी तुपसुंदर शेवते प्रथम, सपना नाईकनवरे अावे द्वितीय, अपर्णा उलभगत  शेवते तृतीय

निबंध लेखन स्पर्धा
लहान गट
ओम जाधव पाटील नांदोरे प्रथम, साजिद शिकलकर पट कुरोली द्वितीय, रितेश मोरे देवडे तृतीय
मोठा गट
अपर्णा उलभगत शेवते प्रथम, अश्विनी तुपसुंदर शेवते द्वितीय, साक्षी कदम नांदोरे तृतीय

नृत्य स्पर्धा सामूहिक
लहान गट
जि प प्रा शाळा नांदोरे प्रथम,जि प प्रा शाळा शेवते द्वितीय,जि प प्रा शाळा इंगोले नाईकनवरे वस्ती तृतीय
मोठा गट
जि प प्रा शाळा शेवते प्रथम,जि प प्रा शाळा नांदोरे द्वितीय, जि प प्रा शाळा आवे तृतीय
नृत्य स्पर्धा वैयक्तिक
लहान गट
गीतांजली बोबडे चिंचकर वस्ती प्रथम, सुजाता तुपसुंदर शेवते दितीय, संस्कार अंबुरे पट कुरोली पुनर्वसन तृतीय
मोठा गट
श्रृती भिंगारे नांदोरे प्रथम
समुहगीत गायन स्पर्धा
लहान गट
जि प प्रा शाळा चिंचकर वस्ती प्रथम, जि प पटवर्धन कुरोली केंद्र शाळा द्वितीय, जि प प्राथमिक शाळा नांदोरे तृतीय
मोठा गट
जि प प्रा शाळा शेवते प्रथम, जि प प्राथमिक शाळा नांदोरे द्वितीय, जि प  प्राथमिक शाळा आवे  तृतीय

वक्तृत्व स्पर्धा
लहान गट
साजिद शिकलकर पटवर्धन कुरोली केंद्रशाळा प्रथम, ओम जाधव पाटील नांदोरे द्वितीय, प्रीती लोखंडे शेवते तृतीय
मोठा गट
श्रुती भिंगारे नांदोरे प्रथम, अपर्णा उलभगत शेवते द्वितीय, साक्षी भिंगारे नांदोरे तृतीय
 वादन स्पर्धा
लहान गट
श्रीराम उपासे पटवर्धन कुरोली केंद्र शाळा प्रथम, समीर कांबळे नांदोरे द्वितीय
मोठा गट
संस्कार कांबळे नांदोरे प्रथम, सारंग हेगडे शेवते द्वितीय

कथाकथन स्पर्धा
लहान गट
संस्कृती भिंगारे पिंजारी वस्ती प्रथम, चंदना तोंडले शेवते द्वितीय, ओम जाधव पाटील नांदोरे तृतीय
मोठा गट
अपर्णा उलभगत शेवते प्रथम, साक्षी वाघ नांदोरे द्वितीय, प्रतीक्षा पिंजारी अावे तृतीय

एकपात्री नाटय़स्पर्धा
सानिका आवळे लहान गट शेवते  प्रथम,
शिवकन्या सदगर  आवे मोठा गट प्रथम
हस्तकला स्पर्धा
लहान गट दिव्या पवार शेवते प्रथम
मोठा गट प्रतिमा आयवळे शेवते प्रथम
चित्रकला स्पर्धा
लहान गट
प्रियांका तुपसुंदर शेवते प्रथम
उदय नाईकनवरे पटवर्धन कुरोली पुनर्वसन द्वितीय
पुनम बाबर नांदोरे तृतीय
मोठा गट
अश्विनी तुपसुंदर शेवते प्रथम, प्रियांका करांडे नांदोरे द्वितीय,
निकिता ननवरे नांदोरे तृतीय

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...