Tuesday 10 October 2017

पटवर्धन कुरोली केंद्रातील टॅलेंट हंट स्पर्धा उत्साहात संपन्न

पटवर्धन कुरोली , सोमवार दिनांक नऊ रोजी पटवर्धन कुरोली पुनर्वसन शाळेमध्ये टॅलेंट हंट स्पर्धेच आयोजन करण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय दिनकरराव नाईकनवरे सभापती पंचायतसमिती पंढरपूर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पटवर्धन कुरोली  पुनर्वसन येथील सरपंच सौ. साखरे ,  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साहेबराव मोरे ,दादासाहेब साखरे , पंडित तवटे ,दत्तात्रेय कारंडे रोहिदास तेरवे ,रमेश जवळेकर ,पंडित तवटे ,सिकंदर शेख , सुनील पाटील, हरिदास कोळसे , नवनाथ नाईकनवरे ,आण्णा कोळी यांच्यासह केंद्रप्रमुख रंगनाथ घोडके साहेब आदी मान्यवर  उपस्थित होते .
   मुख्य परीक्षक म्हणून श्री नामदेव देशमुख सर कलाशिक्षक पटवर्धन कुरोली प्रशाला यांनी काम पाहिले .
*सदर स्पर्धेमध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धा , निबंधलेखन स्पर्धा , नृत्य स्पर्धा, गीतगायन स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा , वादन स्पर्धा कथाकथन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,एकपात्री नाट्य स्पर्धा हस्तकला स्पर्धा ,तसेच चित्रकला स्पर्धा व वादविवाद स्पर्धा तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा अनेक स्पर्धा यशस्वीपणे घेण्यात आल्या .
स्पर्धेसाठी मुख्य परीक्षकांसोबत श्री पांडरंग नाईकनवरे सर , श्री विठ्ठल गायकवाड सर , श्री विक्रम टरले सर,  श्री अमोल कांबळे सर , श्री भारत तोडसाम सर , श्री सतीश शिंदे सर , श्री संतोष काळे सर , श्री दिनकर अवघडे सर , श्री रामचंद्र केंगार सर , श्री कैलास सोनवणे सर, श्री संजय रेपाळ सर , श्री पांडरंग ठाकरे सर,  श्री सचिन बाबर सर , श्री अनिल धायगुडे सर , श्री विलास घाडगे सर  , सौ. सविता देठे मॅडम , शैलेजा म्हेत्रे मॅडम,  सरला वसावे मॅडम आदी सर्व सह शिक्षकांनी काम पाहिले.

याप्रसंगी सभापती दिनकरभाऊ नाईकनवरे यांनी माननीय सीईओ भारुड साहेब यांच्या उपक्रमाचा गौरोद्गार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा स्पर्धा आवश्यक असल्याचे नमूद केले .

सदर स्पर्धेचे नियोजन पटवर्धन कुरोली पुनर्वसन शाळेचे मुख्याध्यापक श्री सत्यवान वाघमारे सर  व व्यवस्थापन समिती यांनी उत्कृष्टपणे करून सर्व विद्यार्थी व पालक यांची सर्व सोय केली .
सदर टॅलेंट हंट स्पर्धेत सूत्रसंचालन श्री विजयकुमार जवळेकर सर व श्री धनाजी बोबडे सर यांनी उत्कृष्टपणे केले .
टॅलेंट हंट स्पर्धेचा निकाल       
पुढीलप्रमाणे
 सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
लहान गट
सानिका आयवळे शेवते प्रथम, सानिका     तरटगाव द्वितीय, राहुल जाधव देवडे तृतीय
मोठा गट
अश्विनी तुपसुंदर शेवते प्रथम, सपना नाईकनवरे अावे द्वितीय, अपर्णा उलभगत  शेवते तृतीय

निबंध लेखन स्पर्धा
लहान गट
ओम जाधव पाटील नांदोरे प्रथम, साजिद शिकलकर पट कुरोली द्वितीय, रितेश मोरे देवडे तृतीय
मोठा गट
अपर्णा उलभगत शेवते प्रथम, अश्विनी तुपसुंदर शेवते द्वितीय, साक्षी कदम नांदोरे तृतीय

नृत्य स्पर्धा सामूहिक
लहान गट
जि प प्रा शाळा नांदोरे प्रथम,जि प प्रा शाळा शेवते द्वितीय,जि प प्रा शाळा इंगोले नाईकनवरे वस्ती तृतीय
मोठा गट
जि प प्रा शाळा शेवते प्रथम,जि प प्रा शाळा नांदोरे द्वितीय, जि प प्रा शाळा आवे तृतीय
नृत्य स्पर्धा वैयक्तिक
लहान गट
गीतांजली बोबडे चिंचकर वस्ती प्रथम, सुजाता तुपसुंदर शेवते दितीय, संस्कार अंबुरे पट कुरोली पुनर्वसन तृतीय
मोठा गट
श्रृती भिंगारे नांदोरे प्रथम
समुहगीत गायन स्पर्धा
लहान गट
जि प प्रा शाळा चिंचकर वस्ती प्रथम, जि प पटवर्धन कुरोली केंद्र शाळा द्वितीय, जि प प्राथमिक शाळा नांदोरे तृतीय
मोठा गट
जि प प्रा शाळा शेवते प्रथम, जि प प्राथमिक शाळा नांदोरे द्वितीय, जि प  प्राथमिक शाळा आवे  तृतीय

वक्तृत्व स्पर्धा
लहान गट
साजिद शिकलकर पटवर्धन कुरोली केंद्रशाळा प्रथम, ओम जाधव पाटील नांदोरे द्वितीय, प्रीती लोखंडे शेवते तृतीय
मोठा गट
श्रुती भिंगारे नांदोरे प्रथम, अपर्णा उलभगत शेवते द्वितीय, साक्षी भिंगारे नांदोरे तृतीय
 वादन स्पर्धा
लहान गट
श्रीराम उपासे पटवर्धन कुरोली केंद्र शाळा प्रथम, समीर कांबळे नांदोरे द्वितीय
मोठा गट
संस्कार कांबळे नांदोरे प्रथम, सारंग हेगडे शेवते द्वितीय

कथाकथन स्पर्धा
लहान गट
संस्कृती भिंगारे पिंजारी वस्ती प्रथम, चंदना तोंडले शेवते द्वितीय, ओम जाधव पाटील नांदोरे तृतीय
मोठा गट
अपर्णा उलभगत शेवते प्रथम, साक्षी वाघ नांदोरे द्वितीय, प्रतीक्षा पिंजारी अावे तृतीय

एकपात्री नाटय़स्पर्धा
सानिका आवळे लहान गट शेवते  प्रथम,
शिवकन्या सदगर  आवे मोठा गट प्रथम
हस्तकला स्पर्धा
लहान गट दिव्या पवार शेवते प्रथम
मोठा गट प्रतिमा आयवळे शेवते प्रथम
चित्रकला स्पर्धा
लहान गट
प्रियांका तुपसुंदर शेवते प्रथम
उदय नाईकनवरे पटवर्धन कुरोली पुनर्वसन द्वितीय
पुनम बाबर नांदोरे तृतीय
मोठा गट
अश्विनी तुपसुंदर शेवते प्रथम, प्रियांका करांडे नांदोरे द्वितीय,
निकिता ननवरे नांदोरे तृतीय

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...