पटवर्धन कुरोली,ता.०३: उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .
येथील माजी सरपंच मनिषा मोरे यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पदासाठी अध्याशी अधिकारी श्री. ताटे यांनी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलाविली होती. यावेळी सोनाली साखरे, मनीषा मोरे, मनीषा कोयले, आरती गोसावी, भगवान सर्जे, उमेश गायकवाड ,.दत्तात्रय चव्हाण हे सात हि सदस्य उपस्थित होते. यावेळी मनिषा मोरे व सोनाली साखरे यांच्याकडुन सरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र मनिषा मोरे यांनी छाननीनंतर अर्ज माघार घेतल्याने सोनाली साखरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामसेवक चंद्रशेखर गिड्डे यांच्यासह दादासाहेब साखरे, भानुदास गायकवाड, संजय लावर,स्वप्निल राऊत, भैरवनाथ राऊत, शंकर साखरे, प्रतीक साखरे, ज्योतीराम रेडके, गफार शेख, रफिक शेख, कैलास मोरे, राहुल मोरे, रवींद्र मोरे, अभिमान मोरे, गोरख मोरे, सुरेश मोरे, बापू साखरे, माजी सरपंच अरविंद डावरे, समाधान उपासे, मंगेश डावरे, अक्षय इनामदार, औदुंबर गायकवाड, दिगंबर गायकवाड, प्रवीण गोसावी,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment