ज्ञानेश्वर जवळेकर यांची निवड

पटवर्धन कुरोली, ता. १४: येथील ज्ञानेश्वर विलास जवळेकर यांची बळीराजा शेतकरी संघटनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा अध्यक्ष माउली हळनवर यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले या वेळी युवया आघाडीचे जिल्हाध्यक्ष  संतोष पवार महादेव नागटिळक, धनाजी मदने शहाजहान शेख , सोमनाथ भोसले उपस्थित होते

Comments