“भोई समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन एकोप्याने शासन दरबारी प्रयत्न केल्यास भोई समाजाचे प्रश्न मिटण्यास मदत होईल. मराठा समाजाप्रमाणे ओबीसी संघटनांनीही आपल्या हक्कासाठी रस्त्यावर येणे गरजेचे असल्याचे” मत ओबीसी फौंडेशनच्या प्रदेशाध्यक्षा स्वाती मोराळे यांनी व्यक्त केले.
पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथे ओबीसी फौंडेशन संचालित भोई समाज सेवा संघ शाखेचे उद्घाटन मोराळे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी भोई समाज सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश नगरे, बारामती पत्रकार संघाचे भरत मल्लाव, इंदापूर लोकशासनाचे अध्यक्ष दिलीप कदम, राज्य संघटक पांडुरंग जगताप, पुणे अध्यक्ष चंद्रकांत भोई, सोलापूर बंजारा समाजाचे विजय चव्हाण, जिल्हा संघटक बंडू भोई, बापू भोई, पिराची कुरोलीचे सरपंच कुलदीप कौलगे, पटवर्धन कुरोलीचे माजी उपसरपंच पांडुरंग नाईकनवरे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पंढरीनाथ लामकाने, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष परमेश्वर लामकाने, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कौलगे, सोपान कौलगे, माजी सदस्य तुकाराम कौलगे, गजानन भोई, धनाजी भोई, नंदकुमार भोई, तानाजी भोई, संतोष भोई, सीताराम भोई, अनिल भोई यांच्यासह भोई समाज संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments
Post a Comment