मोहन कोळी-पटवर्धन कुरोली
पटवर्धन कुरोली, ता. २७: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील पटवर्धन कुरोली प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.
प्रारंभी सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य एच.यु.लामकाने यांच्यासह श्री.तोरणे, श्री.सुतार, श्री.विभुते, श्री.वगरे, श्री. पाटील उपस्थित होते. या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या प्रशालेतील शिक्षकांचा शाल व श्रीफळ देेऊन यावेळी सत्कार करण्यात आला. या प्रशालेमध्ये १९९२ ते १९९८ या कालावधील पाचवी ते दहावी पर्यत शिक्षण घेतलेले ७० माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते. यावेळी शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शाळेचा माजी विद्यार्थी संग्राम डावरे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुंटुबाला आर्थिक मदत केली. व यापुढील काळातही मदत करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांनी दिले. विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमठविणारे अनेक माजी विद्यार्थी पंचवीस वर्षानंतर एकमेकांना भेटले. त्यामुळे शाळेतील जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. यामधील सर्वच माजी विद्यार्थी आज शिक्षक डाॅक्टर, वकील, राजकारण, समाजकारण तर काहि शेती व इतर व्यवसायात आपल्या कामाचा ठसा उमठवित आहेत.
अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र भेटल्यामुळे चेहर्यावरील आनंद दिसून येत होता. यावेळी अनेकांनी हि भेट आणी या आठवणी पुढील आयुष्यात प्रेरणा देत राहतील असे मनोगत व्यक्त केले. या वेळी उपस्थित शिक्षकांनी या स्नेहमेळाव्या बद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर संदीप काटकर, कृष्णा कुलकर्णी, मोहन शिंदे, डाॅ. श्रीकांत अवद्युतराव , सचिन बाबर, मंगेश पासले, सतीश मोरे, अनिल जवळेकर, रामदास नाईकनवरे, एडवोकेट मधुकर नाईकनवरे, सुरेश डावरे, सतीश डावरे, नवनाथ जवळेकर, दत्ता उपासे, सुधीर पाटील, सचिन नाईक नवरे, प्रकाश मोरे, शेखर कदम, सुकेशनी पाटील देशमुख, उषा तवटे भादुले, सुंदर नाईक नवरे, सुलताना शिकलकर, सुलभा रोडगे, राणी जाधव बागल, शकुंतला नाईकनवरे, चंदनकर, गंगू नाईकनवरे, पासले,किरण भिंगारे, ब्रम्हदेव जाधव, मारुती पिंजारी यांच्यासह विजय कोळी, बजरंग माने, विठ्ठल नाईकनवरे, सिध्दार्थ चव्हाण यानी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment