Tuesday 31 October 2017

आव्हे -जांबुड़ बंधारा लगत रस्ता करणेबाबत..

पटवर्धन कुरोली, ता. ३१:  आव्हे-जांबूड  भीमा नदीवरील असणाऱ्या कोल्हापूर पध्यतीच्या बंधाऱ्याचा भरावा वाहून गेल्याने वीस दिवसापासून वाहतूक बंद आहे.

या  बंधाऱ्यावरून आव्हे , तरटगाव , पटवर्धन कुरोली  , नांदोरे  , नेमतवाडी , करकंब , पेहे, भोसे , शेवते, जांबूड , खळवे ,  श्रीपूर , नेवारे , बोरगाव या  दहा ते बारा गावातील लोकांची वाहतूक सुरु असते. पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील अकलुज ही मोठी बाजारपेठ असल्याने या बंधाऱ्यावरून सतत दळणवळण सुरू असते. या रस्त्यावरून शिक्षणसाठी मुले श्रीपुर, अकलुज, बोरगाव  ये जा करतात 

वीस दिवसापूर्वी उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे  भिमा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते.  पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बंधाराची दारे टाकल्यामुळे भीमा नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती .  त्यामुळे या ठिकाणी पाण्याने अनेक शेतकऱ्यांची पाईप , विधुत मोटारी  पाण्यात वाहुन गेल्या होत्या. बंधाऱयाला दारे टाकल्यामुळे जांबूड च्या बाजूचा भरावा वाहून गेला आहे. त्यामुळे गेल्या वीस दिवसापासून येथील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या भागातील लोकांना दहा ते बारा किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. यामुळे पैसे आणि वेळ वाया जात आहे 



त्यामुळे या बंधाऱ्याचा भरावा लवकरात लवकर भरून हा रस्ता सुरु करावा  अशी मागणी येथील ग्रामस्थांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडे निवेदनांद्वारे करण्यात अली आहे. या वेळी भाजपचे सोलापुर जिल्हा सरचिटणीस अजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते दादा माने, भाजपचे पंढरपूर तालुका सरचिटणीस मारुती भुसनर,  जनसेवा विद्यार्थी संघटना पंढरपूर तालुकाध्यक्ष दिपक पिंजारे, तात्यासाहेब मुंडफणे, हरिदास रेडे पाटील,  यांच्या सह विविध संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ  मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...