Friday 8 February 2019

पटवर्धनकुरोली,ता.०८: - पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर )येथील शेतकरी सोसायटी चे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह पाच जणांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवत पाचही जणांचे संचालक पद रद्द करण्याची कारवाई सहाय्यक निबंधक एस एम तांदळे यांनी केली आहे.
मागील दोन महिन्यांपूर्वी या सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती. मात्र त्यानंतर विद्यमान संचालक नंदकुमार उपासे यांनी अध्यक्ष रामकृष्ण जवळेकर, उपाध्यक्ष धनंजय नाईकनवरे, यांच्यासह संचालक प्रकाश नाईकनवरे, श्रीधर नाईकनवरे, गणपत मोरे यानी निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली असून त्यांची सखोल चौकशी व्हावी व त्यांचे पद रद्द करण्यात यावे अशी लेखी तक्रार सहायक निबंधक पंढरपूर यांचेकडे केली होती.
त्या तक्रारी नुसार सहाय्यक निबंधक एस. एम. तांदळे यांनी पाचही जणांना लेखी नोटीस काढुन आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र सुनावणी दरम्यान अध्यक्ष रामकृष्ण जवळेकर यांनी थकीत कर्जदार असल्याचे मान्य केले व शासनाच्या कर्जमाफी साठी  आपले नाव पाठवल्याचे सांगितले. मात्र कर्ज माफ झाल्याचे ते सिद्ध करू शकले नाहीत. तर उपाध्यक्ष धनंजय नाईकनवरे , संचालक श्रीधर नाईकनवरे, प्रकाश नाईकनवरे, गणपत मोरे यांनी यापूर्वी कधीही संस्थेचे कर्ज काढले नसतानाहीकर्जदार गटातुन निवडून आल्याचे सिद्ध झाले.
त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचेसह पाचही जणांना सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कअ 1 (एक) अ अन्वेय नियम मोडल्या प्रकरणी दोषी ठरवले व  या कलम 73 कअ 1(चार) व नियम 58 नुसार सदस्य म्हणून राहण्यास अपात्र असल्याचे सहायक निबंधकानी सांगितले म्हणून बेकायदेशीर रित्या प्रतिज्ञापत्र देऊन निवडून आल्याप्रकणी  कलम 78 अ (ब) नुसार विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष , पाच जणांना संचालक पदावरून काढुन टाकत असल्याचा निकाल 7 फेब्रुवारी रोजी सहाय्यक निबंधक एस एम तांदळे यांनी दिला आहे. सहकारी सोसायट्याच्या इतिहासात आनेक गैरव्यवहार, राजकीय नाट्य समोर आल्याचे अनेकदा निदर्शनास आले मात्र एवढी मोठी व जलद कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे


No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...