Friday 8 February 2019

शेतकरी सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्षा सह पाच जणांचे पद रद्द
सहाययक निबंधकांचा निर्णय - पटवर्धन कुरोली शेतकरी सोसायटी निवडणूक चुकीची माहिती देणे महागात पडले
पटवर्धनकुरोली - पटवर्धन कुरोली ता पंढरपूर येथील शेतकरी सोसायटी चे अध्यक्ष रामकृष्ण जवळेकर उपाध्यक्ष धनंजय नाईकनवरे यांच्या सह पाच जणांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवत कलम 1960 चे 78 अ, (ब) नुसार या पाचही जणांचे संचालक पद रद्द करण्याची कारवाई सहाय्यक निबंधक एस एम तांदळे यांनी केली आहे.
 मागील दोन महिन्यांपूर्वी या सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती. मात्र त्यानंतर विधमान संचालक नंदकुमार उपासे यांनी अध्यक्ष रामकृष्ण जवळेकर, उपाध्यक्ष धनंजय नाईकनवरे, यांचे सह संचालक प्रकाश नाईकनवरे, श्रीधर नाईकनवरे, गणपत मोरे, आदी पाच जणांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली असून त्यांची सखोल चौकशीव्हावी व त्यांचे पद रद्द करण्यात यावे अशी लेखी तक्रार सहायक6निबंधक पंढरपूर यांचेकडे केली होती.
त्या तक्रारी नुसार सहाय्यक निबंधक एस एम तांदळे यांनी पाचही जणांना लेखी नोटीस काडून आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र सुनावणी दरम्यान अध्यक्ष रामकृष्ण जवळेकर यांनी थकीत कर्जदार आसल्याचे मान्य केले व शासनाच्या कर्जमाफी साठी  आपले नाव पाठवल्याचे सांगितले मात्र कर्ज माफ झाल्याचे ते सिद्ध करू शकले नाहीत. तर उपाध्यक्ष धनंजय नाईकनवरे , संचालक श्रीधर नाईकनवरे, प्रकाश नाईकनवरे, गणपत मोरे यांनी यापूर्वी कधीही संस्थेचे कर्ज काढले नसल्याचे मान्य केले तरीही कर्जदार सर्वसाधारण मतदारसंघातुन निवडणूक लढवून ते निवडून आल्याचे सिद्ध झाले. तरीही पुन्हा एकदा त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली मात्र ते आपल्यावरील आरोप चुकीचे आसल्याचे सिद्ध करू शकले नाहीत.
म्हणून अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचेसह पाचही जणांना सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कअ 1 (एक) अ अन्वेय नियम मोडल्या प्रकरणी दोषी ठरवले व  या कलम 73 कअ 1(चार) व नियम 58 नुसार सदस्य म्हणून राहण्यास अपात्र असल्याचे सहायक निबंधकानी सांगितले म्हणून बेकायदेशीर रित्या प्रतिज्ञापत्र देऊन निवडून आल्याप्रकणी  कलम 78 अ (ब) नुसार विधमान अध्यक्ष रामकृष्ण जवळेकर, उपाध्यक्ष धनंजय नाईकनवरे संचालक प्रकाश नाईकनवरे, श्रीधर नाईकनवरे, व गणपत मोरे यांना संचालक पदावरून काडून टाकत असल्याचा निकाल 7 फेब्रुवारी रोजी सहाय्यक निबंधक एस एम तांदळे यांनी दिला आहे. सहकारी सोसायट्याच्या इतिहासात आनेक गैरव्यवहार, राजकीय नाट्य समोर आल्याचे अनेकदा निदर्शनास आले मात्र एवडी मोठी व जलद कारवाई इतिसात प्रथमच झाल्याने खळबळ उडाली आहे

चौकट.......

या कारवाई मुळे सोसायट्या मध्ये होत असलेल्या गैरप्रकारांना आळा बसेल. असे आणखी काही प्रकार समोर आल्यास प्रसासनाची हीच भूमिका असेल ही सोसायटी आता बरखास्त करून नवीन निवडणूक कार्यक्रम घेतला जाऊ शकतो, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा अहवाल जिल्हा उपनिबंदकाना पाठवणार आहे. त्यांच्यवर काय कारवाई करायची ज निर्णय ते घेतील
एस एम तांदळे
सहययक निबंधक पंढरपूर

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...