पटवर्धन कुरोली, ता. १५: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याने गेल्या पाच दिवसापासून गाव बंद ठेवण्यात आले असले तरी मच्छिमारी व्यवसाय जोमात सुरू असल्याने कोरोना रुग्ण वाढण्याची भीती ग्रामस्थातुन व्यक्त होत आहे. पटवर्धन कुरोली गावात सहा दिवसापूंर्वी पाच रुग्ण सापडले होते. त्यामुळे येथील कोरोना ग्रामस्तरीय समिती च्या वतीने गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेंव्हापासुन सर्व व्यवसायायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेऊन शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. मात्र पटवर्धन कुरोली येथील बंधार्याजवळ खुलेआम मासेविक्री जोरदार सुरू आहे. जे मासे विक्रेता आहेत त्यांच्या गावात या अगोदरच मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे त्याचा फैलाव अ्धिक प्रमाणात होण्याची भिती ग्रामस्थातुन होत आहे. जर मासे विक्री बंद केली नाहि तर आंदोलन करु असा इशारा सामाजिक कार्यकर्ते बापूराव मगर यांनी दिला आहे.

Comments
Post a Comment