सोलापूर, ता. १७: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्ष पदी अॅडव्होकेट संतोष अरुण नाईकनवरे यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे पत्र सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी भगीरथ दादा भालके जिल्हा युवक अध्यक्ष गणेश पाटील पंढरपूर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ॲड. दीपक पवार जिल्हा संघटक नरसाप्पा देशमुख हे उपस्थित होते. पटवर्धन कुरोली परिसरात त्यांच्या चांगला जनसंपर्क असून लवकरच परिसरातील सर्व गावांमध्ये राष्ट्रवादीचे शाखा सुरू करणार असल्याची माहिती संतोष नाईकनवरे यांनी दिली. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

Comments
Post a Comment