Tuesday 10 April 2018

मुंबई आझाद मैदानावर उपोषण सुरू

पटवर्धन कुरोली : करकंब (ता. पंढरपूर) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त नागरिकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. दीपक पाटील यांना निलंबीत करावे, ही प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांची आहे.

करकंब पोलीस ठाण्याचे स.पो.नि. दीपक पाटील यांच्या विरोधात जिल्हा पोलीस प्रमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर यांच्याकडे हेतुपुरस्सर गुन्हे दाखल करणे, सावकारकीच्या तक्रारी, हप्ता घेणे, सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणे, अवैध धंद्यांना अभय देणे, करकंब पोलीस ठाण्यात मागील अनेक वर्षापासून ठाण मांडूनही बदली केल्यानंतर मॅटमध्ये जाऊन अनेकदा बदली रद्द करणे, करकंब पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी गोळा केलेली बेहिशोबी मालमत्ता याची सीबीआयमार्फत चौकशी करणे आदी विषयांच्या तक्रारी राज्याचे पोलीस प्रमुख, गृहमंत्री, गृहराज्यमंत्री यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. याशिवाय आव्हे (ता. पंढरपूर) येथील पाटबंधारे विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे झालेले शेतकºयांचे नुकसान पंढरपूर-टेंभुर्णी महामार्गाचे सुरू असलेले निकृष्ठ दर्जाचे काम याबाबत चौकशी करण्याची मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे.

मंगळवार दि. १० एप्रिल पासून मुंबई आझाद मैदानावर आर. आर. पाटील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोपट कडलासकर, महंमद पठाण, अतुल भोसले आदी नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. करकंबसारख्या पोलीस ठाण्याचा विषय मुंबई आझाद मैदानातील उपोषणापर्यंत पोहोचल्याने मुंबईसह सोलापुरात एपीआय दीपक पाटील यांच्या कारभाराविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...