Sunday 15 April 2018

यात्रेची उत्साहात सांगता

पटवर्धन कुरोली: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) ग्रामदैवत सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमीत्त् सासनकाठी व पालखी सवाद्य मिरवणूक काढताना भाविक.                                         पटवर्धन कुरोली, ता.१५: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) ग्रामदैवत सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा मोठया उत्साहात व शांततेत पार पडली.  यात्रेनिमीत्त् मंदिरावर विद्युत रो़षणाई करण्यात आली होती. मंदिरासमोर भव्य मंडप घालण्यात आला होता. शुक्रवार (ता.१३) रोजी सायंकाळी पाच वाजता सासनकाठी व पालखी वाजत गाजत मंदिराकडे नेण्यात आली. शनिवार (ता.१४) रोजी सकाळी देवाला अभिषेक घालण्यात आला.दुपारी आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर देवाच्या सासनकाठी व पालखी ची मिरवणूक मोठ्या उत्साहात तोफांच्या आतष बाजीत, नगार्याच्या सनई सुराच्या वाद्यात गावातून काढण्यात आली. सिध्दनाथाच चांगभले च्या गजरात, भंडारा व खोबर्याची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. गावात घरोघरी मोठ्या उत्साहात सासनकाठीचे व पालखीचे स्वागत करण्यात आले.मिरवणूक झाल्यानंतर मंदिरासमोर प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी दिवसभर भाविकानी मोठी गर्दी केली  होती. यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामस्थानी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...