पटवर्धन कुरोली, ता.०५: पिराची कुरोली (ता.पंढरपूर) येथील रणजित पांडुरंग लामकाने यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या पंढरपूर तालुका संघटकपदि निवड करण्यात आली आहे. त्यांना सांगोला येथे दिपक आबा साळूंखे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला ताई गायकवाड, तालुकाध्यक्ष दीपक दादा पवार, प्रफुल गायकवाड, समाधान सुरवार, बापू भागवत,सुरेश लामकाने, कुमार लामकाने, नितीन कॊलगे उपस्थित होते. यावेळी रणजित लामकाने यांचा सत्कार दिपक आबा साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला.

Comments
Post a Comment