पंढरपूर, ता.१०: सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघाची बैठक पंढरपूर येथे पार पडली. पदवीधर संघात झालेली नाव नोंदणी व पुढे करण्यात येणाऱ्या नाव नोंदणी विषयी चर्चा करण्यात अाली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुग्रीव कोळी यांनी नाव नोंदणी साठी सहकार्य केलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निवडणूकीच्या अगोदर सहा महिने जाहीर करावा अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रीया सुळे यांच्याकडे करण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी पदवीधर चे जिल्हाध्यक्ष सुग्रीव कोळी, माढा विधानसभा अध्यक्ष संजय डुबल, सांगोला विधानसभा अध्यक्ष ओंदुबर डुबल यांनी विचार व्यक्त केले. यावेळी करमाळा अध्यक्ष दत्तात्रय मोरे, सांगोला अध्यक्ष अमोल सावंत, अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस जुबेर बागवान, यांच्यासह विक्रम वाघमारे, आबा नाईकनवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. अल्पसंख्यांक युवक चे कार्याध्यक्ष साजिद बागवान यांनी अाभार मानले.


Comments
Post a Comment