Friday 17 January 2020

पंचरत्नमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
फोटोओळी:  पंढरपूर येथील पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ.प.वा.ना.उत्पात व इतर.
पंढरपूर ,ता.१७ : तामिळनाडू-चेन्नई येथे झालेल्या १५ व्या राष्ट्रीय अबॅकस चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये पंढरपूर येथील पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूलमधील चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे विश्वस्त ह.भ.प. वा. ना. उत्पात यांच्या हस्ते करण्यात आला.
तामिळनाडू येथे झालेल्या १५ व्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये देशभरातून तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये पंढरपूरच्या पंचरत्न इंग्लिश मिडियमच्या ओमराज सतीश घंटे (प्रथम), वैष्णवी मोहन डावरे (द्वितीय), सृष्टी सतीश घंटे (तृतीय) तर समर्थ कलाप्पा जमादार (चतुर्थ) यांनी राष्ट्रीय स्तरावर शाळेचे नाव उज्वल केले आहे. त्यामुळे संस्थेचे विश्वस्त ह.भ.प. वा. ना. उत्पात यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी वा. ना. उत्पात यांनी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये संस्थेसह पालकांची जबाबदारी महत्त्वाची असते, ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्याचे सांगितले. भविष्यात विद्यार्थ्यांना आणखी स्पर्धेमध्ये यश संपादन करण्यासाठी शाळेच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी एम. सी. पाठक, व्ही. जी. भाळवणकर, एस. आर. पटवर्धन, मुख्याध्यापिका सुनिता मोहोळकर, माजी नगरसेवक सतीश घंटे, सहशिक्षिका शिल्पा कुलकर्णी, सुचिता हजारे, श्रीवल्लभ उपळकर, कलाप्पा जमादार, गीता घंटे, रोहिणी डावरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...