Monday 23 July 2018

नांदोरेत बालदिंडी सोहळा

नांदोरे . पंढरपूर येथील एस.पी. पब्लिक स्कूलच्यो प्रांगणामध्ये विद्यार्थ्यानी केलेला गोल रिंगण सोहळा                                     
पटवर्धन कुरोली, ता. २३ नांदोरे ता. पंढरपूर येथील पायल फाऊंडेशन संचलित एस.पी. पब्लिक स्कूलमध्ये बालदिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये काढण्यात आली. यावेळी बालचमूंनी  वारकऱ्यांचा वेश परिधान करुन हातात भगव्या झेंड्याबरोबरच जनजागृतीपर घोषणा देत गावातून पालखीसह फेरी मारली. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल- रखुमाई,
संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम, संत नामदेव, वासुदेव, संत मुक्ताबाई, संत जनाबाई यांचे वेश परिधान करुन पालखी सोहळ्याची शोभा वाढवली यावेळी या सोहळ्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक, पालक व परिसरातील अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखी मध्ये सर्वात आकर्षण ठरले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशामध्ये व मावळ्यांच्या वेशामध्ये असलेली क्र. १ ची दिंडी. यावेळी सर्व दिंड्यांना क्रमांक देण्यात आले होते.एकूण बारा दिंडया सहभागी असलेल्या या पालखी सोहळ्यामध्ये मधोमध फुलांची सजावट केलेली पालखी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सोहळा छत्रपती शिवाजी चौकामध्ये आल्यानंतर स्कूलची दिंडी, संत एकनाथ महाराज दिंडी व संत चौरंगीनाथ महाराज दिंडी या दिड्यांचा त्रिवेणी संगम झाला यावेळी सर्व परिसर विठ्ठल- विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम या गजराने विठ्ठलमय झाला होता. यानंतर बाल वारकरी, दिंडीतील वारकरी व जमलेले अबालवृद्ध विठ्ठलभक्त यांच्यामध्ये फुगडयांचा खेळ रंगला यावेळी सर्वजण भक्तीरसात न्हाऊन निघाले. सोहळा स्कूलच्या   प्रांगणामध्ये आल्यानंतर गोल रिंगण सोहळा पार पडला व नंतर बालवारकऱ्यांना अन्नदान करुन सोहळ्याची सांगता करण्यात आली. सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सूरज अलगुडे, अमोल तेली, अमरनाथ इंगोले, सोमनाथ ढावरे, अमोल कचरे, शहाजी साठे, अजित पवार, राहूल मिसाळ, सोमनाथ वलगे, हणुमंत टरले, शशिकांत वळेकर, योगेश व्यवहारे, बंडू शिरसट, सचिन कदम, बंडू मुटकुळे , आकाश शिंदे, बंडू कांबळे, आण्णा सावंत ,सौ. सिमा पिसे, रत्नमाला जानकर, विद्या कोरके, सुजाता पवार, ज्योती भोसले, मिना माने, विद्या पांढरे, सोनाली बोबडे, सोनाली देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...