पटवर्धन कुरोली, ता.२६: शासन स्तरावरील विविध विकास योजना तळागाळातल्या सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र भर ग्राहक प्रबोधन समिती कार्यरत असुन यापुढे गाव ते शाखा उपक्रम राबविणार असल्याचे ग्राहक प्रबोधन समितीचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख राज गायकवाड यांनी सांगितले. ते पंढरपूर येथे तालुका कार्यकारिणी निवडी वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुहास सिद, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख ज्योतीताई सुरवसे,जिल्हा अध्यक्ष गणेश नलावडे, तालुका अध्यक्ष महेष कवडे, जिल्हा सचिव शंकर गेजगे, महिला अाघाडी पंढरपूर तालुका उपाध्यक्ष शशिकला लोंढे,सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय खराडे,पंढरपूर शहर अध्यक्ष रमेश कांबळे, तालुका उपाध्यक्ष मारूती सुरवसे, अक्षय आठवले,दत्तात्रय घाडगे,ज्योतीताई घाडगे, अमोल लाळगे,पुणे जिल्हा अध्यक्षा आश्विनी कदम, किरण गेजगे, माढा तालुका अध्यक्ष सचिन डावरे, माढा तालुका प्रसिद्धी प्रमुख विजय डावरे, जोतीबा डावरे,पट कुरोली शाखा अध्यक्ष बापू डावरे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्तविक अण्णा हजारे यांनी तर आभार जिल्हा संपर्क प्रमुख संजय खराडे यानी मानले.

Comments
Post a Comment