Friday 30 March 2018

पटवर्धन कुरोलीत व्यापारी गाळ्याचे उद्घाटन

पटवर्धन कुरोली, ता.३०:
पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या वतीने बांधण्यात आलेल्या व्यापारी गाळ्याचे उद्घाटन आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे होते.
यावेळी पंचायत समिती सभापती दिनकर नाईकनवरे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, वामन माने, जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब माळी, राजेंद्र पाटील, निखिलगीर गोसावी, विवेक कचरे, शिवाजी साळुंखे, राहुल पुरवत, मिलींद देशपांडे, पांडुरंग व्यवहारे, घनशाम काटकर, गणेश नाईकनवरे,पंढरीनाथ घुगे उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार श्री.परिचारक म्हणाले  की, भविष्याचा वेध घेऊन संस्थाना कारभार करावा लागेल.  .भविष्यकाळात कर्ज घेणे आणि देणे यावर संस्था सक्षम होणार नाहीत. त्यासाठी संस्थानी इतर व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे. जर पाच ते सहा वर्षानी कर्जमाफीची परिस्थिती निर्माण झाली तर संस्थेचा चांगला कर्जदार सुद्धा कर्ज भरणार नाही.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे म्हणाले की, या सोसायटी ने पन्नास लाख रुपये खर्च करुन व्यापारी गाळे बांधले आहेत. हा संस्थेने उत्पादन वाढीचा चांगला  निर्णय घेतला असून संस्थेने उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष समाधान नाईकनवरे उपाध्यक्ष विजय काळे, सचिव भालचंद्र उपासे, राजेंद्र तवटे, केशव पाटील, शंकर मलशेट्टी, नानासाहेब भांगे यांच्यासह माजी अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष, संचालक, सभासद, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक यांच्यासह शेवते, खेडभोसे, नांदोरे, आव्हे, तरटगाव, देवडे, खेडभोसे, पिराची कुरोली गावातील संस्थाचे अध्यक्ष, सचिव, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...