Monday 4 September 2017

एकाच लढतीत १६ विश्‍वविक्रम

पाचव्या आणि शेवटच्या वन-डेत टीम इंडियाने श्रीलंकेचा 6 विकेटने फडशा पाडत पाच लढतींची मालिका 5-0 ने जिंकली. या लढतीत तब्बल 16 विश्‍वविक्रमांची नोंद झाली. त्यासंदर्भातील ही रोचक आकडेवारी... 
6
भारतीय संघाने पाच किंवा त्यापेक्षा जास्त वन-डे लढतीत प्रतिस्पर्धी संघाला व्हाईटवॉश देण्याचीही सहावी वेळ आहे. सर्वाधिक व्हाईटवॉश देण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर जमा झाला. सहापैकी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली तीन, धोनीच्या नेतृत्वाखाली दोन आणि गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली एक व्हाईटवॉश टीम इंडियाने दिला आहे.
1
मायदेशातील द्विपक्षीय मालिकेत श्रीलंकेवर पहिल्यांदाच व्हाईटवॉशची नामुष्की ओढवली. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लढतीत लंकेला व्हाईटवॉश मिळण्याची ही एकूण तिसरी वेळ आहे. 
30
विराट कोहलीने कारकिर्दीतील 30 वे शतक साजरे केले आणि सर्वाधिक शतके ठोकणार्‍या फलंदाजांच्या यादीत रिकी पाँटिंगसह संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले. 
92.45
या वर्षातील विराटची सरासरी. 1 हजार धावा पूर्ण करताना ही सरासरी राखणारा विराट वन-डेतील एकमेव फलंदाज आहे. एकाच वर्षात 1 हजार धावा ठोकण्याची विराटची ही पाचवी वेळ आहे. 
843
गेल्या वर्षभरात विराटने धावांचा पाठलाग करताना 843 धावा ठोकल्या असून 10 वेळा टीम इंडियाने विजय साजरा केला आहे. यात त्याने चार शतके आणि चार अर्धशतके ठोकली. 
1
पाच लढतींच्या मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला तीन वेळा व्हाईटवॉश देणारा विराट पहिलाच कर्णधार ठरला आहे. 
15
जसप्रित बुमराहने या मालिकेत 15 विकेट घेतल्या. भारत-लंकेदरम्यान पाच लढतींच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाजही तो ठरला आहे. 
यजमानांना कसोटी आणि वन-डेतही व्हाईटवॉश देणारा भारत जगातील पहिलाच संघ ठरला. लंकेला घरच्या मैदानावर दोन मालिकेत व्हाईटवॉश देण्याची कामगिरी करणाराही भारत पहिलाच. 
2
भारतीय संघाने या मालिकेत दोन ‘रिस्ट स्पिनर्स’ खेळवले. भारताच्या 922 लढतीच्या वन-डे इतिहासात पहिल्यांदाच अशा फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आले आहे. 
5
भुवनेश्‍वरकुमारने  या लढतीत 5 विकेट घेतल्या. 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट मिळवण्याची भुवनेश्‍वर कुमारची ही पहिलीच वेळ ठरली. या मालिकेत 3 सामने खेळूनही भुवनेश्‍वरला एकही विकेट मिळवता आली नव्हती. मात्र, ही कमतरता त्याने अखेरच्या सामन्यात भरून काढली.
5
सलग दोन वन-डेत शतक ठोकण्याची कामगिरी विराटने पाचव्यांदा केली. द. आफ्रिकेच्या ए.बी. डिविलियर्सने अशी कामगिरी सहा वेळा केली आहे. 
8
श्रीलंकेविरुद्ध विराट कोहलीचं हे आठवं शतक ठरलं. यासोबत विराटने सचिनच्या श्रीलंकेविरुद्ध झळकावलेल्या शतकांशी बरोबरी केली. एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम अजूनही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. (ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 शतकं)
28
वयाच्या 28 व्या वर्षीच विराटने वन-डे कारकिर्दीतील शतकाची तिशी पूर्ण केली.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...