Monday 4 September 2017

'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत नेमकं काय झालं ?

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरू केल्यांचं, भाजपने केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारातून दाखवून दिलंय. त्यामुळे आता शिवसेनेनं राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी जोर बैठका सुरू केल्यात.
भाजपच्या विस्तारवादी धोरणामुळे, शिवसेनेनं ही राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू केलंय. त्यासाठीच 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या उपस्थितीत सर्व नेते आणि जिल्हा संपर्कं प्रमुखांची महत्वाची बैठक झाली.
शिवसेना येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका जिल्हा आणि तालुका स्तरावरील संघटना पदाधिकार्यांमध्ये मोठे फेरबदल करणार असल्याचं समजतंय.
शिवसेना बैठकीत नेमकं काय झालं...? ,सूत्रांच्या माहिती नुसार
१) मातोश्रीवर आज झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्ष मजबूत करण्यासाठी २ तास मॅरेथाॅन बैठक घेतली. २) या बैठकीत पक्ष मजबूत करण्यासाठी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नारळ देण्याचे आदेश दिलेत. तर काम करणाऱ्या पदाधिकार्यांना मोठी जबाबदारी देण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी नेत्यांना दिलेत.
३) पक्ष मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे विभागीय मेळावे होणार
४) शिवसेनेच्या सर्व नेत्यांची आणि जिल्हा संपर्क प्रमुखांची आता दर महिन्याला बैठक होणार
५) बैठकीत केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार, एनडीए आणि भाजप युती या संदर्भात चर्चा झाली नाही.
'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार आणि एनडीए संदर्भात चर्चा झाली नसल्याचं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे.
एकूणच काय तर भाजपच्या विस्तारवादी धोरणाचा सामना कसा करायचा. आणि त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचसाठी ही बैठक होती. पण या बैठकीतून शिवसेनेला किती फायदा होणार हे येणाऱ्या निवडणुकी नंतरच स्पष्टं होईल.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...