Monday 4 September 2017

उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक

उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला स्थान देण्याचं सोडाच; साधं विचारण्यातही न आल्यानं शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री' निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांसह राज्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्यामुळं त्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडं सध्या एक केंद्रीय मंत्रीपद आहे. लोकसभेतील संख्याबळानुसार दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद मिळावं, अशी शिवसेनेची मागणी आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या मागणीचा कुठलाही विचार करण्यात आला नाही. इतकंच नव्हे तर मंत्रिमंडळ विस्ताराआधी शिवसेनेच्या नेतृत्वाशी संपर्कही करण्यात आला नाही. त्यामुळं शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे. शिवसेना नेते संजय राऊत व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: ही नाराजी बोलून दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ही बैठक होत आहे.

शिवसेनेच्या नेत्यांसह राज्यभरातील संपर्कप्रमुख आणि संपर्क नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नुकताच एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनाही त्याच मार्गाने जाऊन भाजपला धक्का देईल, अशी चर्चा आहे. तसं झाल्यास राज्यातील भाजप सरकारवर दबाव टाकण्याची संधीही शिवसेनेला मिळेल, असंही बोललं जात आहे.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...