Monday 11 September 2017

बसचालक व वाहकाला पिस्तूल दाखवून प्रवाशाचे अपहरण


करमाळा
प्रवाशी वाहतूक करणा-या करमाळा आगारातील बसचालक व वाहकाला पिस्तूल लाऊन बसमधील एका प्रवाशाचे अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. एस.पी. गुजांळ असे अपहरण झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ही घटना करमाळा कुर्डुवाडी रस्त्यावर आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, सकाळी कुर्डुवाडीवरून करमाळ्याकडे ही बस येत असताना प्रवाशी घेण्यासाठी बस थाबंली असता पाठीमागुन डस्टर वाहन (एमएच १३ ए एन ७८३९) व दुसरे वाहन इनिव्हा (एम एच १२, पुर्ण क्रमांक नाही) मधुन आलेल्या ८ ते १० लोकांनी सिनेस्टाईल इन्ट्री करत समोरून बी.एस. तळेकर चालकाला तर मागे वाहक एम.बी. पवार याच्या कानाला पिस्तूल लाऊन धाक दाखवत बसमधून प्रवास करत असलेल्या गुजांळला ताब्यात घेऊन वाहनातून निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थानी घटनास्थळी गर्दी केली असून करमाळा पोलीसही दाखल झाले आहेत.
दरम्यान, ही कारवाई कर्नाटक पोलीसांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. याची माहिती कुर्डुवाडी पोलीसांना कर्नाटक पोलिसांनी दिल्याचे कळते. करमाळा पोलीसांकडे मात्र याची माहिती नाही. पोलीसांनी चालक-वाहकांनी अडथळा करू नये म्हणून पिस्तूल दाखवल्याचे बोलले जात आहे. याला आगार प्रमुख संजय भोसले यांनीही दुजोरा दिला आहे. दरम्यान अपहरणकर्त्याची ओळख न पटल्याने अपहरणाचीच मोठी चर्चा चालु आहे.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...