Monday 4 September 2017

दंगलीची अफवा भोवली; व्यावसायिक कोठडीत

दंगलीची अफवा भोवली; व्यावसायिक कोठडीत

सांगलीत हिंदू आणि मुस्ल‌िम समाजात दंगल झाल्याची अफवा पेठवडगावमधील ‘गमजा ग्रुप’ ने पोस्ट केली. ही केलेली ‘गमजा’ बांधकाम व्यावसायिकांच्या चांगलीच अंगलट आली असून अफवेची पोस्ट फॉरवर्ड केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक शरद रामचंद्र दिंडे (वय ४२, रा. चौगुले गल्ली, कसबा बावडा) याला एक दिवस पोलिस कोठडीची हवा खावी लागली. गमजा ग्रुपचा अॅडमिन व ग्रुपमधील २७ सदस्यांकडे शाहूपुरी पोलिस चौकशी करत आहेत.

सांगली येथे हिंदू मुस्ल‌िमांची दंगल झाली आहे, अशी पोस्ट व व्हिडिओ बांधकाम व्यावसायिक दिंडे यांना शनिवारी सकाळी त्यांच्या मोबाइलवर आली. त्यांनी ती पोस्ट फॉरवर्ड केली. पोलिसांनी दिंडे यांना ताब्यात घेऊन जाती धर्मात तेढ माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. दिंडे यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे केले असताना कोर्टाने त्यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. एका पोस्टमुळे दिंडे यांना पोलिस कोठडीची हवा खावी लागत आहेत. या संदर्भात पोलिसांनी दिंडे यांच्याकडे चौकशी केली असता, २००८ मधील दंगलीचा व्हिडिओ यापुर्वी कधीही पाहिला नव्हता. त्यामुळे व्हिडिओ पाहून संतापाची लाट उसळल्याने तो व्हिडिओ पुढे फॉरवर्ड केला, असा जबाब दिला आहे. दिंडे हे जरी कसबा बावडा येथे रहात असले तरी पेठवडगावच्या ‘गमजा’ ग्रुपमध्ये त्यांना अडीच वर्षापूर्वी अॅड केले होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या ग्रुपच्या अॅडमिनशी पोलिसांनी संपर्क साधला असून अॅडमिनला पोलिसांनी चौकशीस बोलावले आहे. गमजा ग्रुपवर दंगलीच्या अफवेचा व्हिडिओ कुणी पाठवला हे स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...