Monday 4 September 2017

पंकजा, तुम्ही मुख्यमंत्री व्हा

‘देशात महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत असल्याने बहुजन समाजाच्या नेत्या म्हणून प्रगतीशील महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्यासाठी ही योग्य वेळ आहे’, अशा शब्दात काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भंडारा-गोंदिया येथील पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी शरसंधान केल्याची शाई वाळत नाही तोच आशिष देशमुख यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी ही योग्यवेळ असल्याच्या शुभेच्छा दिल्या. पार्टी विथ डिफरन्समधील सुप्त ‘डिफरन्सेस’ हळूहळू बाहेर येऊ लागले आहेत. पंकजा ​मुंडे यांना आशिष देशमुख यांनी दिलेल्या शुभेच्छांची लगेच राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.

‘काटोल फेस्टिव्हल’अंतर्गत काटोल व नरखेड तालुक्यातील महिलांचे बचत गट प्रशिक्षण शिबिर तालुका स्टेडियममध्ये सोमवारी आयोजित करण्यात आले होते. मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी निर्मला सीतारामन यांची संरक्षणमंत्रिपदी नियुक्ती झाल्याकडे लक्ष वेधून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांची माहिती दिली. हाच धागा पकडून आशिष देशमुख यांनी मुंडे यांना थेट मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्या. निर्मला सीतारामन संरक्षणमंत्री झाल्या. प्रगतीशील महाराष्ट्राचे नेतृत्वही महिलांनी करावे. पहिल्या मुख्यमंत्री होऊन आपण राज्याचे नेत्वृत्व करावे, असे देशमुख म्हणाले. यावर पंकजा मुंडे यांनी लगेच गणेशाला वंदन करून सदिच्छा स्वीकारल्या.

--बहुजन नेतृत्वाची चर्चा

वेगळा विदर्भ असो नाही तर, कर्जमाफी आशिष देशमुख यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी दिलेल्या शुभेच्छाही वादग्रस्त ठरण्याचे संकेत आहेत. राज्यात बहुजन समाजाला नेतृत्वाची संधी मिळावी, हा मुद्दा सरकार स्थापन होण्याच्या पूर्वीपासून चर्चेत आला. त्यावेळी फडणवीस यांच्यासह एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे अशी नावे चर्चेत होती.

मला मुख्यमंत्री होणे आवडेल, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते. सत्ता स्थापन झाल्यानंतर चिक्की घोटाळा, डिग्री घोटाळा गाजले. यानंतर अनेक इच्छुक शांत झाले. एमआयडीसीच्या भूखंड व्यवहारावरून खडसे यांना महसूल व कृषिमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर परत बहुजन नेतृत्व चर्चेत आले

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...