एस.पी.पब्लिक स्कूलचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये घवघवीत यश - बुधवार दि . 06/09/2017 रोजी महाराष्ट्र राज्य क्रिडा विभागाअंतर्गत सोलापूर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धामध्ये एस.पी. पब्लिक स्कूल , नांदोरेचा विद्यार्थी प्रितम चांगदेव करांडे याने 35 ते40 किलो वजन गटातून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक संपादन करून पुणे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला. त्याबद्दल त्याचा संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज सातुरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे,प्रकल्य संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरामधून त्याचे कौतुक होत आहे. यास कराटे प्रशिक्षक दिपक माने सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .

Comments
Post a Comment