Sunday 3 September 2017

चैताली फाळके मृत्यू --सासूचा जामीन अर्ज फेटाळला

चैताली फाळके मृत्यु प्रकरण… उच्च न्यायालयानेही फेटाळला चैतालीच्या सासुचा अटकपुर्व जामीन अर्ज..!

पंढरपूर (प्रतिनिधी):- दि. 13/07/2017 रोजी पंढरपूरमधील मयत चैताली अभिजीत फाळके हिचा तिरंगा नगर येथील राहत्या घरी संशयास्पद मृत्यु झाला होता. या प्रकरणात आरोपी असलेल्या चैतालीच्या सासुचा अटकपुर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे . घटना घडून दोन महिने उलटत आले. पंढरपूर सत्र न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला तरी पंढरपूर शहर पोलिसांना हुंडाबळी सारख्या गंभीर गुन्हयातील आरोपी सापडत नाही . आता तर उच्च न्यायालयाने देखिल जामीन अर्ज फेटाळल्याने पंढरपूर पोलिस कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे .
याप्रकरणी मयताचे वडील यांनी पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे पती अभिजीत वसंत फाळके व सासु शोभा वसंत फाळके यांच्या विरुध्द फिर्याद दिली होती. तद्नंतर दि.28/07/2017 रोजी त्यांनी पुरवणी जबाबामध्ये सासरा वसंत नरहरी फाळके, दीर विश्‍वजीत वसंत फाळके व नणंद ऐश्‍वर्या उर्फ स्नेहल वसंत फाळके हे ही माहेरहून पैसे आणण्यासाठी चैतालीचा छळ करत होते. व सारखा मानसीक व शारिरीक छळ करीत होते. अशा स्वरुपाचा पुरवणी जबाब त्यांनी दिला होता. याप्रकरणी सदर आरोपींवरती हुंडाबळी या कलमाची नव्याने वाढ झाली होती.
याप्रकरणी यातील आरोपी क्रमांक दोन शोभा वसंत फाळके हिने पंढरपूर येथील सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनासाठी वकीलांमार्फत अर्ज दाखल केला होता. सरकारी वकील अ‍ॅड.सारंग वांगीकर यांनी हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. यातील आरोपी शोभा वसंत फाळके ही गुन्हा घडला तेंव्हा घटनास्थळी होती.’’ व इ. युक्तीवाद केला. तर मुळ फिर्यादीचे वकील अ‍ॅड. शशी कुलकर्णी व अ‍ॅड. ओंकार बुरकुल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, चैतालीची आत्महत्या नसून शांत डोक्याने तिची पुर्वनियोजित हत्या झालेली आहे. राजकीय दबावापोटी ही हत्या अतिशय हुशारीने आत्महत्या आहे असा बनाव केलेला आहे.’’ यावेळी मुळ फिर्यार्दीचे वकिलांनी कांही महत्वाची कागदपत्रे सादर करुन आरोपीच्या अटकपूर्व जामीनास तीव्र विरोध केला. व वेळोवेळी मयताच्या वडीलांनी अभिजीत फाळके यांच्या खात्यावर पैसे भरल्याच्या पावत्या मे. कोर्टाच्या रेकॉर्डवर आलेल्या आहेत. या प्रकरणी मे.कोर्टाने या सर्व बाबींचा विचार करुन व सरकारी वकील अ‍ॅड. सारंग वांगीकर व मुळ फिर्यादीचे वकील अ‍ॅड. शशी कुलकर्णी व अ‍ॅड. ओंकार बुरकुल अ‍ॅड. स्वप्नील सरवदे यांचा युक्क्तीवाद ग्राह्य धरुन पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिनंदन पाटांगणकर यांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. या निकालाच्या विरोधात मयत चैतालीची सासु आरोपी शोभा फाळके हिने अ‍ॅड. एम.एस. मोहिते यांच्या वतीने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो जामीन अर्ज सरकारी वकील एस.एस. कौशीक यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
या प्रकरणी सासु शोभा वसंत फाळके, सासरा वसंत नरहरी फाळके, नणंद ऐश्‍वर्या उर्फ स्नेहल वसंत फाळके हे तिघेही अद्याप फरार आहेत. मयताच्या कुटूंबियांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सोलापूर ग्रामीण चे पोलिस अधिक्षक विरेश प्रभु व पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पिंगळे यांचेकडे केली आहे. या प्रकरणाच्या बर्‍याचशा बाबी संशयास्पद आहेत.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...