भोसे येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक

भोसे (क. ), 

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक  पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३० व्या जयंती निमित्त भोसे (ता. पंढरपूर)  येथील यशवंत माध्यमिक व् उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन गावातून मिरवणूक काढण्यात आली. 

सकाळी आठ वाजता विद्यालयाचे प्राचार्य एल. एम. कोरे , उपमुख्याध्यापक टी. के. शिंदे, पर्यवेक्षक एस. एस. जगदाळे, माजी मुख्याध्यापक नागनाथ काळे यांच्या हस्ते कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम , टिपरी नृत्य, बाल  नाटिका, ग्रंथ  दिंडी आदी उपक्रमांसह झाडे लावा, झाडे जगवा  हा संदेश ग्रामस्थांना दिला. समतेचा व मानवतेचा संदेश देणारी वारकऱ्यांच्या वेशातील आध्यात्मिक दिंडी काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी मेजर चांगदेव गावडे यांनी बैलगाडी, समाधान सरडे  आणि दशरथ गावडे यांनी ट्रकटर देऊन सहकार्य केल्याबद्दल प्राचार्य एल. एम. कोरे यांनी त्यांचे आभार मानले. मिरवणुकीच्या समारोपानंतर विध्यार्थ्यांना यशवंतभाऊ पाटील पतसंस्थेच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी उच्च माध्यमिक विभागाचे एस. डी. जाधव, एस. एन. सपाटे, के. सी. कोकणी,  पी. डी. घोडके, एम. एस. कारंडे, यु. एस. पावले, पी. आर. मोरे, आर. बी. मुलाणी, के. डी. शिंदे, एस. ए. शिंदे,  एम. व्ही.  भोसले,  डी. एन. अवघडे, [ई. एच. शेडगे, आर. एस. बनाळे , आर. एन. कनाके  यांनी परिश्रम घेतले.

Comments