Friday 8 September 2017

ज्ञानदीप मध्ये शिक्षक दिन

ज्ञानदीप” मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा....

देशाला महासत्ता बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये शिक्षकांचे मोठे योगदान राहणार आहे, त्यांच्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यामुळेच सक्षम विध्यार्थी आणि सुजाण नागरिक घडत असल्याचे प्रतिपादन प्रा. सचिन पुजारी यांनी केले.

नांदोरे (ता. पंढरपूर) येथील ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात प्रा. पुजारी बोलत होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष किरण भिंगारे, तुकाराम शिंदे, मुख्याध्यापक तांबोळी, विध्यार्थी मुख्याध्यापक रुपाली कदम, अभिजित भिंगारे, अक्षय कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी किरण भिंगारे, शरद भिंगारे, नागेश इंगोले यांच्यासह विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण शालेय कामकाज आणि अध्यापनाचे कार्य व्यवस्थित पार पाडले. या कार्यक्रमासाठी मस्के सर, कौलगे सर, माळी सर, पुजारी सर, गायकवाड, वाघमारे, साबळे, भिंगारे, शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक, विध्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...