Thursday 14 September 2017

भीमा नदीत दोनजण वाहून गेले

मुंढेवाडी ते अजनसोंड दरम्यान भीमा नदीवर असलेल्या बंधार्‍यावरून निघालेले पतिपत्नी वाहून गेले आहेत. गुरूवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून पोलीसांनी मदत व शोध मोहिम हाती घेतली आहे.
 सुरेश विष्णू बनकर आणि वंदना सुरेश बनकर अशी वाहून गेलेल्या पती पत्नीची नावे आहेत.
उजनी धरणातून 40 हजार क्युसेक्सचा विसर्ग भीमा नदीला सोडला असल्यामुळे भीमा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. मुंढेवाडी येथील बंधार्‍यावर सुमारे दिड ते दोन फुट पाणी असतानाही सुरेश आणि वंदना बनकर हे पती पत्नी मोटार सायकलवरून नदी पार करण्याच्या प्रयत्नात असताना वाहून गेले आहेत. गुरूवारी सायंकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली आहे.
बनकर पतिपत्नी कडलास रोड सांगोला येथील रहिवासी आहेत. फुलचिंचोली ता पंढरपूर येथील वंदनाच्या आजारी मावशीला भेटण्यासाठी ते दोघे गेले होते, तेथून परत येत असताना अनवली ता पंढरपूर येथील वंदनाच्या माहेरी मुक्काम करण्याच्या हेतूने भीमा नदीवरील मुंढे वाडीच्या बांधाऱ्यावरून येत असताना ते वाहून गेले.
अजनसोंडच्या बाजुने मुंढेवाडी येथील बंधार्‍यावर आल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या स्थानिक लोकांनी त्यांना बंधार्‍यावरून पाणी वाहत असून पाण्याला वेग आहे. त्यामुळे तुम्ही जाऊ नका अशी सुचना केली होती. मात्र आम्हाला अनवली ( ता.पंढरपूर) येथे तातडीने जायचे आहे असे सांगून बंधार्‍यावरून जाण्यासाठी मोटार सायकल तशीच पुढे दामटली. बंधार्‍यावर थोडे पुढे गेल्यानंतर पाण्याच्या वेगामुळे मोटार सायकलसह दोघेही जण वाहून गेल्याचे प्रत्यक्ष घटना पाहणार्‍या लोकांनी सांगीतले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पंढरपूर तालुका पोलीस आणि महसुल विभागाकडे संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहीती दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली तर महसुल विभागाने तातडीने  मदत आणि शोध मोहिम हाती घेतली आहे.

-----------------------------------------

मदत आणि शोध मोहिम सुरू केली आहे

 मुंढेवाडी येथील बंधार्‍यावरून मोटार सायकलसह एक पुरूष आणि एक महिला वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस घटनास्थळी गेलेले आहेत आणि जीव रक्षक यंत्रणा मागवली असून मदत आणि शोध मोहिम हाती घेतलेली आहे.

- मधूसूदन बर्गे

तहसीलदार, पंढरपूर

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...